लेख-समिक्षण
  • 20 september 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

August, 2026

  • 9 August

    आता पेरु येणार वेलींवर

    जर तुम्हाला एखाद्या बागेत पेरूच्या झाडाच्या फांद्या कारल्याच्या वेलीसारख्या तारांवर गुंडाळलेल्या दिसल्या, तर आश्चर्यचकित होऊ नका. ही पेरूची कोणतीही नवीन प्रजाती नसून, बागायती शेतीचे हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, जे उत्पादन दुप्पट करून बागायतदारांच्या उत्पन्नात वाढ करेल. प्रयागराजसह उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून यावर काम सुरू झाले आहे. पेरूच्या उत्पादनासाठीच्या या नवीन तंत्रज्ञानाला ‌‘इस्पेलियर सघाई प्रणाली‌’ असे म्हणतात. …

    Read More »
  • 9 August

    पर्यावरणपूरक यशोगाथा

    दरवर्षी टिश्यू पेपर, स्वयंपाकघरातील कागदी पुसणी आणि इतर कागदी वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड केली जाते. वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण लक्षात घेता पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारे पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचारातून 2019 मध्ये अलय पटेल आणि अनिरुद्ध शर्मा या दोन मित्रांनी ‌‘बेको‌’ या उद्योगाची स्थापना केली. त्यांचे उद्दिष्ट केवळ नवा उद्योग उभारणे नव्हते, तर …

    Read More »
  • 9 August

    पीडितेला न्याय कधी?

    भारतीय कुस्ती महासंघाराचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या न्यायालयाने महिला मल्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातून निर्दोष मुक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या या निकालामुळे आरोपी पक्षाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी न्याय मागणाऱ्या पीडित महिलांचा संघर्ष संपलेला नाही. या प्रकरणी इतर पीडितांनी आता उच्च न्यायालयात अपील करण्याचा …

    Read More »
  • 9 August

    निकाल लागला,पण…

    राजकारणात एखाद्या नेत्याची प्रतिमा कशी मलिन होते आणि न्यायाचा प्रकाश पडून ती पुन्हा उजळ होण्यास किती काळ जावा लागतो, याचे ताजे आणि सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत दिलेला ऐतिहासिक निर्णय. 2012 च्या सुमारास ज्या ‌’कोलगेट (कोळसा खाणी वाटप) घोटाळ्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते आणि ‌’इंडिया अगेन्स्ट करप्शन‌’च्या नाऱ्याने दिल्ली तापली होती, …

    Read More »
  • 9 August

    शिंदेंचे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर

    शिवसेना कुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच नेता म्हणून नियुक्त केले होते. शिंदे यांना ठाकरेंनीच आपल्या कॅबिनेटमध्ये मंत्री केले होते. ठाकरेंनीच शिंदेंना निवडणूक लढवण्यासाठी एबी फॉर्म दिले होते, मग उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष नाहीत, …

    Read More »
  • 9 August

    पोटनिवडणूक निकालांचा सांगावा

    राजकारणात विजयाचा अहंकार आणि पराभवाचा झटका दोन्ही सोबतच चालत असतात. स्थिती बदलण्यास फार वेळ लागत नाही. काही पराभव असे असतात जे केवळ एखाद्या पक्षाचे गणित बिघडवत नाहीत, तर त्यांच्या अहंकारालाच सुरूंग लावतात. तीन राज्यांतील तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल नेमके हेच सांगणारे आहेत. भाजपसाठी मांजलपूरचा (गुजरात) विजय ही अगदी कोरडी मलमपट्टी ठरली आहे, कारण बांकीपूर (बिहार) आणि दतिया (मध्य प्रदेश) …

    Read More »
  • 9 August

    दुसरी बाजू

    राजधानी नवी दिल्लीत जंतरमंतर येथे झालेल्या ‌’जेन झी‌’च्या आंदोलनाचे पडसाद आणि प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. संसदेचे सध्या सुरू असलेले अधिवेशनही याच विषयावरून गाजत आहे आणि या आंदोलनावेळी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, ही मागणीही जोर धरत आहे. अशा प्रकारे या आंदोलनाची पहिली एक बाजू समोर येत असतानाच आंदोलनाची दुसरी बाजूसुद्धा समोर आली. …

    Read More »
  • 2 August

    विक्रांतने आटोपले ‌‘व्हाईट‌’चे डबिंग

    अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेसस्सी सध्या त्याच्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‌‘प्रीतम अँड पेड्रो‌’ आणि ‌‘मुसाफिर कॅफे‌’ यांसारख्या प्रोजेक्टस्‌‍नंतर आता तो ‌‘व्हाईट‌’या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या डबिंगचे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाबाबत बोलताना निर्माते महावीर जैन म्हणाले की, आजच्या काळात जेव्हा जग युद्ध आणि संघर्षांवर उपाय शोधत …

    Read More »
  • 2 August

    रुपेरी पडद्यावरची विद्यार्थी आंदोलने

    भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर मतभिन्नता स्वीकारण्याच्या आणि शांततापूर्ण विरोधाला स्थान देण्याच्या संस्कृतीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आंदोलने ही केवळ शैक्षणिक परिसरातील घटना नसून समाजातील बदलाची चाहूल देणारी शक्ती मानली जाते. जेव्हा तरुण पिढी शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, भ्रष्टाचार किंवा सार्वजनिक धोरणांविषयी प्रश्न उपस्थित करते, तेव्हा त्या प्रश्नांचे प्रतिबिंब साहित्य, नाटक आणि चित्रपटांमध्येही उमटते. हिंदी चित्रपटसृष्टीनेही विविध काळात …

    Read More »
  • 2 August

    कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यशास्त्राचा संगम

    महाराष्ट्रात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई, येथे बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधित आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधनाला विशेष महत्त्व दिले जाते. याशिवाय विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ, पुणे, भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ, पुणे आणि डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, अकोर्डी (पुणे) येथेही बायोमेडिकल इंजिनीअरिंगचे अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचे या स्रोतामध्ये नमूद करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यशास्त्राचा संगम काही वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या …

    Read More »