काळाच्या ओघात शस्त्रास्त्रांचेही स्वरूप बदलत गेले. आधुनिक काळात अनेक प्रकारची शस्त्रे व अस्त्रे पाहायला मिळतात. जागतिक स्थरावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी बहुतांश देश अद्ययावत शस्त्रांची निर्मिती करीत आहेत. अनेक देश बजेट सादर करतानाच शस्त्र निर्मितीसाठी मोठी आर्थिक तरतूद करत आहेत. जगात एक असं हत्यार आहे ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये तब्बल 5 अब्जांपेक्षा अधिक रुपये आहे. हे पृथ्वीवरील सगळ्यात महागडं हत्यार आहे. जाणून घेऊया ते कोणत्या देशाकडे आहे.
अमेरिका, रशिया, चीन आणि भारतासह जगभरातील शक्तिशाली देश एकमेकांपेक्षा जास्त शक्तिशाली शस्त्रांची निर्मिती करत आहेत. या शस्त्रांची किंमतही खूप जास्त आहे. जगातील सर्वात महाग शस्त्र कोणते आहे आणि त्याची किंमत काय आहे हे समजल्यावर तुम्ही शॉक व्हाल. जगातील सर्वात महागड्या क्षेपणास्त्राचे नाव ट्रायडंट आहे. ट्रायडंट क्षेपणास्त्र अमेरिकेकडे आहे. शत्रास्त्र निर्माता लॉकहीड मार्टिनने हे क्षेपणास्त्र बनवले आहे. एका ट्रायडंट क्षेपणास्त्राची अंदाजे किंमत भारतीय चलनात ही रक्कम 5,45,81,37,300 रुपये इतकी आहे. ट्रायडंट क्षेपणास्त्र हे पाणबुडीवरून प्रक्षेपित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ट्रायडंट क्षेपणास्त्र थर्मोन्यूक्लियर वॉरहेडसह सुसज्ज आहे. आण्विक-शक्तीवर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्यांमधून प्रक्षेपित केले जाते. सध्या जगातील फक्त दोनच देशांकडे ट्रायडंट क्षेपणास्त्र आहे. अमेरिका आणि ब्रिटन हे दोनच देश या क्षेपणास्त्राचा वापर करतात. अमेरिकेने हे क्षेपणास्त्र अद्याप कोणत्याही देशाला विकलेले नाही. ट्रायडंट क्षेपणास्त्रे 12 यूएस ओहायो-क्लास पाणबुड्या तसेच चार रॉयल नेव्ही व्हॅनगार्ड-क्लास पाणबुड्यांवर तैनात करण्यात आले आहे. 80 टन वजनाचे ट्रायडंट क्षेपणास्त्र 44 फूट लांब आहे. ट्रायडंट डी 5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता 12,000 किलोमीटर इतकी आहे. ट्रायडेंट-2 डी 5 क्षेपणास्त्र प्रथम 1990 मध्ये तैनात करण्यात आले.
Check Also
धोका चीनच्या महाकाय धरणाचा
जगातील सर्वात मोठे धरण हे चीनमध्ये आहे. ‘थ्री गॉर्जेस डॅम’ असे या धरणाचे नाव आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र