४ जानेवारी, १८०९ रोजी सायमन आणि माणिक ह्या दांपत्याला चौथे मूल झाले. हे मूल जन्मत:च खूप अशक्त होते. सायमन हा चामड्याचा व्यापार करायचा. हे कुटूंब खाऊनपिऊन सुखी होते. त्यांनी आपल्या चौथ्या मुलाचे नाव लुईस ठेवले.
तीन वर्षाचा लुईस आपल्या वडिलांच्या हत्यारांपर्यंत नकळत जायचा. एकदा त्याचे वडील घरात नव्हते. आई जेवण बनवण्यात मग्न होती. जेव्हा लहान लुईस वडिलांच्या जागेवर गेला. तेव्हा त्याला चामडे शिवणारे टोकदार हत्यार मिळाले. खेळाच्या नादात ते टोकदार हत्यार त्याच्या डोळ्यात गेले व संसर्ग होऊन लुईसच्या दोन्ही डोळ्यांना अंधत्व आले. लुईसला शिक्षणाची आवड असल्याने पुढील शिक्षणासाठी त्याला अंधांच्या शाळेत दाखल करण्यात आले. तेव्हा शिक्षकांनी त्याला ग्रंथालयात नेले व अंधांसाठी उपलब्ध असलेली १४ पुस्तके हाताळायला दिली. ती पुस्तके खूपच मोठी होती आणि त्यांचे वजनही खूप होते. लुईसने ती १४ पुस्तके वाचून काढली.
पुस्तके वाचताना त्याला एका गोष्टीची जाणीव झाली की, ती पुस्तके वाचायला बराच वेळ लागतो. वायाच्या शेवटी पोहोचेपर्यंत वायाची सुरुवात काय होती, हे विसरायला होते, हे लुईसला जाणवले. अंधांच्या वाचनासाठी काहीतरी चांगला शोध लावलाच पाहिजे, असे लुईसने त्या दिवशी ठरवले. पुढे सुट्टी सुरु झाल्यावर लुईस अंधांसाठी पुस्तक निर्मितीच्या कामाला लागला.
त्याने १८२९ साली अंधांसाठी पहिली ब्रेललिपी शोधून काढली. १८३७ साली त्याने गणित व संगीत ह्या दोन विषयांसाठी सुध्दा ब्रेललिपी शोधून काढली. लुईस ब्रेलची ही लिपी त्यांची अंधांची शाळा स्वीकारायला तयार नव्हती, कारण एका विद्यार्थ्याने शोध लावलेली ही लिपी स्वीकारण्यात शाळेला कमीपणा वाटत होता.
वयाच्या विसाव्या वर्षी लुईसला त्याच्याच अंधशाळेत शिक्षक म्हणून नेमण्यात आले. लुईस ब्रेलने विकसित केलेली लिपी देशातील व देशाबाहेरील अन्य अंधशाळा स्वीकारत होते. ब्रेल लिपीमुळे पुस्तकांना कमी जागा लागू लागली. पुस्तकांच्या दोन्ही बाजूला ब्रेल लिपी सादर करता येऊ लागली. ब्रेल लिपीमुळे अंध व्यक्ती सहजरित्या स्वतंत्रपणे जगाशी संपर्क करु शकत होते.
एकीकडे ब्रेल लिपी जगप्रसिध्द होत होती तर दुसरीकडे लुईसच्या शरीरात क्षयरोग बळावत होता. अखेर ६ जानेवारी, १९५२ रोजी आपला ४३ वा वाढदिवस साजरा करुन दोन दिवसांतच लुईस ब्रेलचे दु:खद निधन झाले. लुईस ब्रेलच्या निधनानंतर त्याच्या शाळेने ब्रेल लिपीचा स्वीकार केला.
कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं आणि कसं यशस्वी व्हावं, हे वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …
पांचजन्य वृत्तपत्र