लेख-समिक्षण

कासव गडद रंगांना घाबरतं?

आणत्याही प्राण्याला जर कोणत्या गोष्टीपासून धोका असेल, तर लगेचच ते प्रतिकार करण्याच्या मोडमध्ये येतात. असंच कासवाचंदेखील आहे; पण कासव गडद रंगांच्या गोष्टींना का घाबरते जाणून घ्या. कासवांपासून काळ्या किंवा इतर गडद रंगाच्या वस्तू दूर ठेवल्या पाहिजेत.
तलाव, नदी किंवा कोणत्याही जलाशयाच्या आजूबाजूला तुम्ही कासवे पाहिली असतील; पण तुम्हाला माहीत आहे की, कासवांचे काळ्या रंगाबद्दल एक वेगळेच वर्तन असते. ज्यामुळे ते आक्रमक होऊ शकतात. सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल की, कासवाला समोर काळ्या रंगाच्या वस्तू दिसल्या की ते लगेच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. काळे शूज असो किंवा इतर कोणत्याही काळ्या वस्तू दिसल्या की कासव आक्रमक होते. संशोधनात असे समोर आले आहे की, कासवांना काळ्या रंगाचा तिरस्कार नसतो. काळा रंग ते त्यांच्या भक्षकांशी जोडतात. काळा रंग हा त्यांच्यासाठी संभाव्य धोका दर्शवितो. ज्यामुळे ते सावध होतात. जेव्हा-जेव्हा त्यांना काळ्या रंगाचे काही दिसते, ते त्याच्याकडे शिकारी असल्यासारखे पाहतात. आपल्या शैलीने ते त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा भाग असतो. कासवांना केवळ काळाच नाही, तर इतर रंगदेखील ओळखता येतात. लाल, हिरवा, निळा, केशरी, पिवळा असे रंग ते ओळखण्याची क्षमता ठेवतात. काही कासव जे समुद्रात असतात किंवा स्लाइडर कासवं जे हिरव्या आणि निळ्या रंगांकडे अधिक आकर्षित होतात, कारण ते त्यांच्या सागरी वातावरणाच्या जवळ असतात; परंतु गडद रंगाचा, विशेषत: काळा ते बऱ्याचदा विरोध करतात. जंगलात गडद रंग हे धोकादायक शिकारींचे प्रतीक मानले जातात. कासव त्यांच्या नैसर्गिक वातावरणात अशा रंगांना भक्षकांशी जोडतात. उदाहरणार्थ, कावळे आणि साप यांसारखे शिकारीही गडद रंगाचे असतात. या कारणास्तव, कासव काळा रंग पाहून सावध होतात आणि आक्रमक प्रतिक्रिया देतात.

Check Also

शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम

आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक …