अटार्क्टिका खंडातून शास्त्रज्ञांनी 60 लाख वर्षांपूर्वीचा बर्फाचा एक तुकडा बाहेर काढला आहे. हा बर्फ थेट कालमापन केलेला आतापर्यंतचा सर्वात जुना बर्फ आहे. या शोधातून शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या प्राचीन हवामानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. नुकत्याच ‘पीएनएएस’या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, हा विक्रम मोडणारा बर्फ आणि त्यात अडकलेले हवेचे बुडबुडे, सुमारे 27 लाख वर्षेजुन्या असलेल्या पूर्वीच्या सर्वात जुन्या ज्ञात बर्फाच्या …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
शेतीतून उभारला कोट्यवधीचा ब्रँड!
उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे आणि शहरात स्थिरस्थावर होणे, हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील दोन भावांनी याच्या अगदी उलट मार्ग निवडला. बँकेतील चांगल्या नोकऱ्या सोडून त्यांनी गावाकडच्या शेतीची वाट धरली. पारंपरिक शेतीला आधुनिक व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड देत त्यांनी आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला ब्रँड उभा केला आहे. ही यशोगाथा आहे सत्यजित आणि अजिंक्य हंगे या दोन …
Read More »समृद्धीच्या दिशेने भक्कम पाऊल
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची सुरुवात. या सणाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे आयुष्यातील महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतात. त्यामध्ये स्वतःच्या घराची खरेदी किंवा स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दिले जाते. घर ही कुटुंबाच्या सुरक्षिततेची आणि स्थैर्याची गरज आहेच; त्याचबरोबर भविष्यातील आर्थिक संपत्ती निर्माण करण्याचे एक महत्त्वाचे साधनही आहे. देशातील वेगवान शहरीकरण, वाढते उत्पन्न, आधुनिक पायाभूत सुविधा आणि देशी-विदेशी गुंतवणूकदारांचा …
Read More »धूम गाढविणीच्या दुधाच्या साबणाची!
आतापर्यंत तुम्ही चंदन, कोरफड, कडूनिंब, गुलाब अशा अनेक सुगंधी साबणांचा वापर केला असेल. पण, तुम्ही कधी गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाने आंघोळ केली आहे का? हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण हे सत्य आहे! जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या गाढविणीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोक हा साबण मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत आणि वापरत आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि …
Read More »मातीविना शेतीची यशोगाथा
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश तरुणांची पावले बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील सुरक्षित नोकऱ्यांकडे वळतात. मात्र, या पारंपरिक वाटेला फाटा देत केल्विन अरान्हा आणि फरीश अनफाल या दोन युवा अभियंत्यांनी कृषी क्षेत्रातील आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या बळावर मात करण्याचा निश्चय केला. हवामानातील तीव्र बदल, पाण्याची वाढती टंचाई आणि उत्पादन खर्चातील भरमसाठ वाढ यांमुळे संकटात सापडलेल्या शेतीला शाश्वत पर्याय देण्यासाठी त्यांनी क्रॉप एआय या कृषी-तंत्रज्ञान उपक्रमाची …
Read More »गुन्हेगारीचा थरार
अभिनेता टायगर श्रॉफवर अलीकडेच तो कारमध्ये असताना गोळ्या झाडल्या गेल्या. सुदैवाने टायगर थोडक्यात बचावला, पण त्याचा ड्रायव्हर आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच राजस्थानच्या कोटा स्थानकावरून तीन संशयितांना जेरबंद केले. देशातील अथवा अन्य कुठल्याही पारंपरिक गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर लपून राहतात, जेणेकरून पोलिसांच्या हाती पुरावे लागणार नाहीत. पण आजच्या …
Read More »कहाणी ‘योद्धा मगर’ ची
यनासोरच्या युगापूर्वी, सुमारे 240 दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रयासिक कालखंडात, ब्राझीलमध्ये वावरणाऱ्या एका महाकाय ‘योद्धा सरड्याचा’ शोध संशोधकांनी लावला आहे. हा शोध डायनासोर पृथ्वीवर वर्चस्व गाजवण्यासाठी येण्यापूर्वीच्या काळातील माहितीतील अंतर भरून काढतो आणि आता आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील संबंधांवर अधिक प्रकाश टाकतो. हा चिलखतधारी सरपटणारा प्राणी डायनासोरसारखा दिसत असला, तरी तो प्रत्यक्षात आधुनिक मगरींचा पूर्वज आहे. शास्त्रज्ञांनी या प्राण्याला टी. बेलॅटॉर …
Read More »उकिरड्यावरच्या कोरफडीतून कोट्यवधींची भरारी
संकटातच संधी शोधण्याची दृष्टी ज्याच्याकडे असते, तो मातीचेही सोने करू शकतो, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील पाडळी गावचे तरुण उद्योजक ऋषिकेश जयसिंग ढाणे यांच्या यशोगाथेतून दिसून येतो. सुमारे दोन दशकांपूर्वी पाडळी परिसरातील शेतकऱ्यांना कोरफडीच्या शेतीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष एका व्यापाऱ्याने दाखवले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने लागवड केली खरी, परंतु खरेदीचे आश्वासन देणारा व्यापारी गायब झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. हताश …
Read More »स्वागतार्ह पाऊल; पण…
कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करणाऱ्या असहाय रुग्णांकडून आणि त्यांच्या हतबल कुटुंबीयांकडून औषधांच्या नावाखाली मनमानी नफेखोरी करणे, हे निव्वळ आर्थिक शोषण नसून एक अमानुष कृत्य आहे. या महाभयंकर व्याधीचा मुकाबला करताना रुग्णाला केवळ औषधेच नव्हे, तर निदान, शस्त्रक्रिया, प्रारणोपचार अशा विविध पातळ्यांवर अमाप पैसा खर्च करावा लागतो. अशा स्थितीत निदान औषधांच्या अवाजवी किमतींवर तरी लगाम लावला जावा, ही अनेक वर्षांची …
Read More »मेंदूविषयीच्या समजांना नवे वळण
तरुणपणी मेंदू तीक्ष्ण असतो, असे म्हटले जाते. तसेच ’साठी आणि बुद्धी नाठी’ अशीही एक म्हण आपल्याकडे आहे; पण हे काही खरे नाही! आजवर आपण सतत ऐकत आलो आहोत की, वेगाने शिकण्याची आणि विचार करण्याची क्षमता फक्त तारुण्यापर्यंतच मर्यादित असते आणि जसजसे वय वाढते, तसतशी आपली बुद्धी कमकुवत होऊ लागते. परंतु, आता विज्ञानाच्या दुनियेतून या विचाराला एक धक्का देणारा ’यूटर्न’ मिळाला …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र