अब्राहम लिंकन तरुण असताना एका चहा व्यापार्याच्या दुकानावर नोकरी करत होते. एकदा जवळच्याच गावात राहणारी एक महिला त्यांच्याकडे चहा खरेदी करण्यासाठी आली. तिने त्यांच्याकडे अर्धा किलो चहा मागितला. कामाच्या गडबडीत लिंकन यांनी त्या महिलेला पावकिलोच चहा दिला. जरा वेळाने आपण या महिलेला पावकिलोच चहा दिला आणि पैसे मात्र अर्धा किलोचे घेतले. ही गोष्ट लिंकन यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांना रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठताच त्यांनी दुकानातून पावकिलो चहा घेतला आणि ते तडक त्या महिलेच्या घरी गेले. तिचे घर तीन मैल अंतरावर होते. परंतु, त्यांनी आपल्याला होणार्या त्रासाचा विचार केला नाही. घरी गेल्यावर त्या महिलेच्या पतीने दार उघडले. तो चिडलेला होता. त्याने ओरडून आपल्या पत्नीला बोलावले. तिने लिंकनला ओळखले. तिने त्याला विचारले एवढ्या सकाळी कसे आलात. त्यावर लिंकन म्हणाले, तुम्ही काल अर्धा किलो चहाचे पैसे दिले, पण मी तुम्हाला चुकून पावकिलोच चहा दिला. उरलेला पावकिलो चहा देण्यासाठी मी आलो होतो. त्याचा प्रामाणिकपणा पाहून महिलेचे डोळे भरून आले. ती भावनावश होऊन म्हणाली, तू नकीच खूप मोठा होशील. त्यानंतर काही वषार्र्ंनंतर लिंकन खरोखरच खूप मोठे झाले आणि अमेरिकेचे अध्यक्ष बनले.
लहानपणाच्या स्वभाव गुणधर्मावरूनच कुठलीही व्यती भविष्यात काय घडणार आहे? ही बाब अब्राहम लिंकन यांच्या जीवनातील वरील प्रसंगातून दिसून येते.
Check Also
स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश
जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, …
पांचजन्य वृत्तपत्र