इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एका विनोदी कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली नक्कल सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, राहुल गांधी यांनी एका विनोदी कलाकाराला पाचारण करून देशाच्या प्रमुखांची नक्कल करण्यास प्रोत्साहन देणे आणि स्वतः त्यात सहभागी …
Read More »लेख-समिक्षण
ट्रम्पना दणका, भारताला दिलासा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका आणखी मनमानी निर्णयाला तेथील फेडरल न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे नवे नियम लागू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण आदेश आला आहे. ट्रम्प प्रशासनाला परदेशी विद्यार्थी, संशोधक आणि पत्रकारांच्या अमेरिकेतील मुक्कामाच्या कालावधीवर मर्यादा घालायची होती. परंतु न्यायालयाने सरकारचे हे दावे अत्यंत कमकुवत असल्याचे सांगत ते फेटाळून लावले आहेत. हा निर्णय भारतीय …
Read More »विश्वासाची कसोटी
निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, यापेक्षा तो निकाल ज्या प्रक्रियेतून आला त्या प्रक्रियेवर पराभूत पक्षाचाही विश्वास असणे लोकशाहीसाठी अधिक महत्त्वाचे असते. भारतात ही जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे ईव्हीएम असो किंवा मतदारयादीचे पुनरीक्षण, निवडणूक प्रक्रियेविषयी वारंवार शंका उपस्थित होत असतील तर त्यांना केवळ राजकीय आरोप म्हणून झटकून टाकण्याऐवजी त्यांचे निरसन करणे हे आयोगाचे कर्तव्य ठरते. ईव्हीएममधील मतमोजणीसाठी ‘टोटलायझर’ वापरण्याच्या मागणीवर …
Read More »काटकसरीचे वास्तव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा सर्वांना काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. 2047 पर्यंत जर देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर काटकसरीच्या उपायांची गरज आहे. हा विषय त्यांनी पुन्हा एकदा समोर आणला आहे. यापूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सर्वोच्च पातळीवर असताना त्यांनी भारतीयांना बचत करण्याचा आणि काटकसर करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हाची परिस्थिती समजण्यासारखी …
Read More »स्वाईन फ्लूचा वाढता विळखा
देशात सध्या स्वाईन फ्लूचा प्रसार वेगाने होत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही आरोग्य यंत्रणेसाठी धोक्याची घंटा आहे. अवघ्या 24 तासांत 138 नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 2,446 वर पोहोचली आहे. स्वाईन फ्लूचे तुरळक रुग्ण दरवर्षी आढळतात; मात्र यंदा रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारकडून परिस्थितीचा नियमित …
Read More »प्रचाराच्या पलीकडचे वास्तव
भाजपच्या राजकारणातील ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ला धक्का बसण्यामागे केवळ प्रचारयंत्रणेची कमजोरी हे कारण नाही. प्रचार आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यात वाढत गेलेली दरी हे त्यामागचे अधिक महत्त्वाचे कारण आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे संदेश, घोषणा आणि समाजमाध्यमांवरील मोहिमा तेव्हाच प्रभावी ठरतात, जेव्हा त्या जनतेच्या अनुभवांशी सुसंगत असतात. प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव मात्र वेगळे असतील, तर कोणतेही प्रभावी प्रचारतंत्र फार काळ जनमताला आपल्या बाजूने वळवू शकत …
Read More »धनशक्तीची सावली
अमेरिकेतील न्यायव्यवस्था ही निष्पक्षता, स्वायत्तता आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीसाठी जगभरात आदर्श मानली जाते. मात्र अदानी समूहावरील लाचखोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणातून या व्यवस्थेतील काही अस्वस्थ करणारे पैलू समोर आले आहेत. अमेरिकी जिल्हा न्यायाधीश निकोलस गरौफिस यांनी हे प्रकरण रद्द करण्यास अखेर संमती दिली असली, तरी त्याच वेळी डॉनल्ड ट्रंप प्रशासनाच्या न्याय विभागाच्या कार्यपद्धतीवर केलेली त्यांची टिप्पणी अत्यंत महत्त्वाची आहे. न्यायाधीशांनी स्पष्ट …
Read More »पीडितेला न्याय कधी?
भारतीय कुस्ती महासंघाराचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या न्यायालयाने महिला मल्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातून निर्दोष मुक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या या निकालामुळे आरोपी पक्षाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी न्याय मागणाऱ्या पीडित महिलांचा संघर्ष संपलेला नाही. या प्रकरणी इतर पीडितांनी आता उच्च न्यायालयात अपील करण्याचा …
Read More »दिलासादायक निर्णय; पण…
सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च 2026 रोजी ‘हरिष राणा’ प्रकरणासंदर्भात दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक संवेदनशील पाऊल उचलले आहे. आतापर्यंत केवळ शासकीय व निमशासकीय रुग्णालयांपुरती मर्यादित असलेली ‘पॅसिव्ह युथेनेशिया’ म्हणजेच निष्क्रीय इच्छामरणाची कायदेशीर प्रक्रिया आता खासगी रुग्णालयांमध्येही राबविण्यास राज्य सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि द्वितीय वैद्यकीय मंडळ स्थापन …
Read More »भारत-अमेरिका व्यापार करारावर टांगती तलवार
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध सध्या एका विचित्र आणि पेचप्रसंग निर्माण करणाऱ्या वळणावर येऊन ठेपले आहेत. एकीकडे दोन्ही देश व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे अमेरिकेने रशियाकडून तेल आयात करणाऱ्या देशांवर, ज्यात भारताचाही समावेश आहे, तब्बल 100 टक्के आयात शुल्क लादण्याची तयारी चालवली आहे. ही बाब द्विपक्षीय व्यापार वार्ता आणि धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र