लेख-समिक्षण

ओपन किचनला पार्टीशन हवंय ?

आजकालच्या आधुनिक घरांमध्ये ‌‘ओपन किचन‌’ची फॅशन असली तरी अनेकदा काम करताना मोकळेपणा न वाटल्यामुळे किंवा पाहुण्यांसमोर स्वयंपाक करताना संकोच वाटल्यामुळे ते झाकण्याची गरज भासते. यासाठी भिंत बांधण्याऐवजी काही पर्याय वापरता येतील:
1. मणी किंवा काचेच्या माळा (ग्लास बीड्स) ः तुम्हाला किचन पूर्णपणे बंद करायचे नसेल आणि आधुनिक लूक कायम
ठेवायचा असेल, तर प्लास्टिक, लाकूड किंवा काचेच्या मण्यांच्या माळा वापरणे हा उत्तम पर्याय आहे. यामुळे किचन अंधारलेले वाटत नाही आणि एक प्रकारची पारदर्शकताही राहते. हे दिसायला अत्यंत सुबक आणि कलात्मक वाटते.
2. मॅक्रेम झालर पडदे ः जर तुम्हाला मण्यांच्या माळा महाग वाटत असतील, तर सुती धाग्यांपासून विणलेले ‌’मॅक्रेम‌’ (चरलॲराश) झालर पडदे लावता येतील. हे वजनाने हलके असतात आणि धुण्यास सोपे असतात. किचनला क्लासिक लूक देण्यासाठी पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगाच्या पडद्यांची निवड करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
3. स्लायडिंग फॅब्रिक चॅनेल ः कमी खर्चात किचनला बंद लूक देण्यासाठी स्लायडिंग फॅब्र्रिक पॅनल हा एक प्रभावी मार्ग आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वयंपाकाचा धूर आणि उग्र वास (फोडणीचा वास) घराच्या इतर भागात पसरत नाही. एक्झॉस्ट फॅनच्या मदतीने गरम हवा बाहेर जाण्यास यामुळे मदत होते आणि पाहुण्यांनाही त्रास होत नाही.
4. प्लांट पार्टिशन ः किचनला नैसर्गिक आणि ताजेतवाने रूप देण्यासाठी रोपांचा वापर करून ‌‘ग्रीन पार्टिशन‌’ तयार करता येते. तुम्ही हँगिंग मनी प्लांट किंवा कृत्रिम वेलींचा वापर करू शकता. यामुळे घराचे वातावरण प्रसन्न राहते आणि किचनला एक वेगळी ओळख मिळते. मात्र, जिवंत रोपे लावताना त्यांची नियमित छाटणी आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

Check Also

संशोधन प्रकल्प सादर करताना…

पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प (रिसर्च प्रोजेक्ट) हा केवळ अभ्यासाचा …