लेख-समिक्षण

मनोरंजन

कतरीनाच्या ट्रोलिंगवरुन खळबळ

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर होत असलेल्या अवाजवी ट्रोलिंगमुळे चर्चेत आली आहे. नोव्हेंबर महिन्यात पती विकी कौशल आणि कतरिनाने आपल्या पहिल्या बाळाचे जगात स्वागत केले होते. बाळ झाल्यानंतर नुकतीच कतरिना एका सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील तिचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर काही विकृत नेटकऱ्यांनी तिच्या शरीरयष्टीवर आणि वाढलेल्या वजनावर अत्यंत …

Read More »

प्रतिमा बदलणारे कलाकार

चित्रपटसृष्टीत एकदा ‌‘इमेज‌’ तयार झाली की ती कलाकाराला यशाच्या शिखरावर नेते; पण कालांतराने तीच त्याच्या पायातील बेडीही ठरू शकते. म्हणूनच खरा कस लागतो तो स्वतःची लोकप्रिय प्रतिमा मोडून पूर्णपणे विरुद्ध भूमिका स्वीकारताना. हिंदी चित्रपटसृष्टीत प्राण यांनी खलनायकातून चरित्र अभिनेत्यापर्यंतचा प्रवास केला, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा खलनायकी भूमिकांतून नायक झाले, तर सैफ अली खान आणि संजय दत्त यांनी नायकाच्या चौकटीबाहेर …

Read More »

दोन कोटींत बनलेल्या चित्रपटाची ‌‘हनुमान‌’उडी!

चित्रपटसृष्टीत भव्यदिव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि कोट्यवधींचा बजेट म्हणजेच सिनेमा हिट होण्याचे सूत्र, असा एक समज वर्षानुवर्षेचालत आला आहे. मात्र, आशयघन कथा आणि सशक्त अभिनय यांच्या जोरावर अल्प बजेटमध्ये तयार झालेले चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात, हे ‌‘हनुमान अंश‌’ या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले आहे. 7 ऑगस्ट रोजी अत्यंत शांततेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत धीम्या गतीने सुरुवात …

Read More »

रुपेरी पडद्यावरचा बाप्पा

गणपतीच्या आरतीचा स्वर, ढोल-ताशांचा वाढता गजर, गुलालाने भरलेले रस्ते आणि ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’च्या जयघोषात पुढे सरकणारी विसर्जन मिरवणूकहे दृश्य महाराष्ट्राच्या उत्सवसंस्कृतीइतकेच भारतीय चित्रपटांच्या पडद्यावरही परिचित झाले आहे. कधी नायकाच्या आयुष्यातील निर्णायक वळणाचा साक्षीदार, कधी संकटात श्र्द्धेचा आधार, तर कधी मुंबईच्या चाळी-वस्त्यांतील सामूहिक जगण्याचा उत्सव म्हणून गणराया सिनेमात भेटत राहिला. गणेशोत्सवाने सिनेमातील गाणी, नृत्य आणि भव्यतेला आपलेसे केले. यातून गणेशोत्सव आणि …

Read More »

अभिनय बेर्डेचा ‌‘अल्पविराम‌’

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तरुण अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनय बेर्डेने आपल्या अभिनय कारकिर्दीतून काही काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे एक अतिशय रंजक आणि वेगळे कारण असल्याचे समोर आले आहे. दिवंगत दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा असलेल्या अभिनयने ‌‘ती सध्या काय करते‌’ या चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. यानंतर त्याने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करत …

Read More »

रुपेरी पडद्यावरील ‌‘झुला‌’

हिरवाईने नटलेली बाग, झाडाच्या फांदीला बांधलेला झुला आणि त्यावर झुलणारी नायिका… हिंदी चित्रपटातील हे दृश्य कधीकाळी इतके परिचित होते, दर पाच चित्रपटांपैकी एकामध्ये त्याचे दर्शन घडत असे. प्रेमाची चाहूल असो, प्रियकराची प्रतीक्षा असो, माहेरच्या आठवणी असोत किंवा तरुण मनाचा बेधुंद बहर असो; आनंदझुला या सगळ्याचा साक्षीदार होता. काळ बदलला, चित्रपटांची भाषा बदलली आणि या बदलात झुल्याच्या तालावर डोलणारी गाणीही हळूहळू …

Read More »

अल्लू अर्जुनचा ट्रिपल रोल

दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‌‘राका‌’ या चित्रपटाची सध्या सिनेविश्वात प्रचंड चर्चा सुरू आहे. ‌‘पुष्पा‌’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अल्लू अर्जुन एका अत्यंत वेगळ्या आणि भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, रश्मिका मंदाना आणि जान्हवी कपूर या आघाडीच्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता वेग आला …

Read More »

रुपेरी पडद्यावरची कृष्णगीते

गोकुळाष्टमी आली की मंदिरांतील आरत्या, दहीहंडीचा जल्लोष आणि गोविंदांच्या आरोळ्यांबरोबरच मनात नकळत काही चित्रपटगीतेही जागी होतात. कृष्णाच्या बाललीला, राधा-कृष्णाचे प्रेम, भक्ती, खोडकरपणा आणि लोकउत्सव यांना हिंदी चित्रपटसृष्टीने इतक्या विविध रंगांत टिपले आहे की, ही गीते केवळ पडद्यापुरती राहिलेली नाहीत; ती लोकपरंपरेचाच एक भाग बनली आहेत.- सोनम परब हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासूनच भक्तिगीतांना विशेष स्थान होते. त्यात श्रीकृष्ण हा तर गीतकार, …

Read More »

कंगना-तापसी वाद पुन्हा पेटला

कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काही काळ शांत असलेला हा वाद तापसीच्या एका मुलाखतीनंतर पुन्हा चर्चेत आला. तापसीने केलेल्या वक्तव्याचा संबंध आपल्या आई-वडिलांशी आणि संगोपनाशी जोडत कंगनाने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‌‘गांधारी‌’ चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका कार्यक्रमात तिला कंगना रणौतसोबत असलेला जुना …

Read More »

फाळणीच्या वेदनेचे रुपेरी प्रतिबिंब

स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी देशाच्या फाळणीने लाखो माणसांचे आयुष्य उद्ध्‌‍वस्त केले. त्या काळातील दंगली, निर्वासितांचे लोंढे, ताटातूट आणि धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या भिंतींचे चित्रण हिंदी चित्रपटांनी वेगवेगळ्या काळात केले. ‌‘धर्मपुत्र‌’ आणि ‌‘गरम हवा‌’पासून ‌‘तमस‌’, ‌‘ट्रेन टू पाकिस्तान‌’, ‌‘1947 अर्थ‌’, ‌‘पिंजर‌’ आणि ‌‘गदर‌’पर्यंत अनेक कलाकृतींनी या विषयाला आपापल्या पद्धतीने हात घातला.- सोनम परब ———————- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला; …

Read More »