सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ’द व्वान’ हा आगामी पौराणिक आणि काल्पनिक (फोकलोर फँटसी) चित्रपट आता 25 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे एक अत्यंत रहस्यमय आणि आकर्षक पोस्टर देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. या नवीन पोस्टरमध्ये एका …
Read More »मनोरंजन
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कसोटी
भारतीय चित्रपटसृष्टीने आपल्या स्थापनेपासून समाजाचे वास्तव, त्यातील संघर्ष, विसंगती आणि बदलत्या काळाचे प्रतिबिंब पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जेव्हा जेव्हा या माध्यमाने व्यवस्था, सत्ताकेंद्रे किंवा प्रस्थापित सामाजिक कथनांना प्रश्न विचारण्याचे धाडस केले, तेव्हा तेव्हा त्याला राज्यसत्ता, दबावगट आणि रूढीवादी शक्तींच्या विरोधाला सामोरे जावे लागले. अलीकडे अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्या ‘सतलुज’ या चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद हा अशाच …
Read More »48 तासांत ‘हटवला’ ‘सतलज’
दिग्दर्शक हनी त्रेहान यांच्या बहुप्रतिक्षित ’सतलज’ या चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊन अवघे 48 तास झाले असतानाच ’झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आपल्या लायब्ररीमधून अचानक हटवला आहे. शुक्रवार, 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता भारतात स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध नाही, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो अजूनही पाहता येत आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे भारतातील प्रेक्षक आणि …
Read More »आगळावेगळा आर. माधवन
बॉलीवूड अभिनेता आर. माधवन याला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संवेदनशील नागरिक आणि कुटुंबवत्सल पिता अशा अनेक भूमिका आर. माधवनने यशस्वीपणे पार पाडल्या. अभिनयातील सहजता, भूमिकांमधील वैविध्य, दर्जेदार चित्रपटांची निवड आणि प्रसिद्धीपेक्षा कामाला दिलेले महत्त्व यांमुळे त्याने समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि निर्मितीतही त्याने …
Read More »लग्नानंतर गोविंदाची अनेक अफेअर्स ः सुनीता
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा हिने नुकत्याच सुरू झालेल्या ’लॉक अप: सच या सझा’ (सीझन 2) या रिॲलिटी शोच्या प्रीमियरमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे केले आहेत. शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या फराह खान आणि रितेश देशमुख यांच्यासमोर सुनिताने खुलेपणाने कबुली दिली की, लग्नानंतर गोविंद्याचे अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध (अफेअर्स) होते. प्रीमियर दरम्यान फराह खानने सुनिता आहुजाशी संबंधित जुन्या हेडलाईन्स …
Read More »स्टारडमचे बदलते गणित
एकेकाळी एखाद्या चित्रपटाच्या यशाचे पहिले संकेत तिकीट खिडकीबाहेर लागलेल्या रांगांमधून मिळत असत. चित्रपटगृहांबाहेरील गर्दी, शहरभर लागलेले पोस्टर्स, चित्रपट मासिकांच्या मुखपृष्ठांवरील छायाचित्रे आणि दूरचित्रवाणीवरील मुलाखती यांमधून एखाद्या अभिनेत्याची लोकप्रियता मोजली जात असे. मात्र डिजिटल युगाने या सगळ्या समीकरणांना पूर्णपणे बदलून टाकले आहे. आज कोणत्याही चित्रपटाच्या यशाची पहिली चाहूल बॉक्स ऑफिसवर नव्हे, तर इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्टस् आणि एक्सवरील ट्रेंडिंग हॅशटॅगमधून लागते. …
Read More »करीना आणि पृथ्वीराजचा ‘दायरा’
करीना कपूर खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दायरा’ या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 18 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. ‘मुल्क’, …
Read More »बालपट हरवले कोठे?
आजकाल शाळकरी मुले मैदानावर खेळण्यापेक्षा किंवा पालकांसमवेत फिरायला जाण्यापेक्षा घरातच मोबाईलवर खेळणे पसंत करतात. अर्थात काही मुले अपवाद असू शकतात, मात्र बऱ्याच ठिकाणी असेच चित्र पाहवयास मिळते. पूर्वी उन्हाळी सुटी आली की लहान मुलांना जादुचे प्रयोग, लहान मुलांसाठीचे चित्रपट, भटकंती यासारखे उपक्रम दिसायचे. आता जादूच्या प्रयोगाला मुलांपेक्षा पालकांचीच गर्दी अधिक दिसते. दुसरीकडे लहान मुलांचे चित्रपट टॉकीजवर लागतातच असे नाही आणि …
Read More »ट्रेलरने वाढवली उत्सुकता
‘धमाल 4’या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्याचा मनोरंजक प्रवास अनुभवायला मिळणार आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट येत्या 10 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेळची कथा एका अथांग सोन्याच्या खजिन्याभोवती आणि रहस्यमय साहसाभोवती फिरते. यामध्ये नेहमीप्रमाणेच संभ्रम, स्पर्धा आणि अटीतटीची लढत पाहायला मिळेल. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे …
Read More »मोहिनी व्यवस्थेशी लढणाऱ्या नायकाची
हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला तर काही कथा अशा आहेत की त्या काळ बदलला, समाज बदलला, प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलल्या तरी पुन्हा पुन्हा नव्या रूपात समोर येत राहिल्या. त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकून राहिलेली कथा म्हणजे ‘एक माणूस विरुद्ध व्यवस्था’ ही. ही चित्रपटातील संघर्षाची चौकट सामान्य माणसाच्या मनातील असंतोष, अपेक्षा, न्यायाची आस आणि बदलाची आकांक्षा यांचे कलात्मक प्रतिबिंब आहे. म्हणूनच प्रत्येक …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र