लेख-समिक्षण

‌‘गोलमाल 5‌’ च्या चित्रीकरणाला उटीमध्ये सुरुवात

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी विनोदी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‌‘गोलमाल‌’चा पाचवा भाग सध्या चर्चेत आहे. अभिनेता अजय देवगणने उटी येथील चित्रीकरणाचा एक रंजक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये चित्रपटातील ‌‘द बॉईज‌’ आणि या मालिकेची ओळख असलेली ‌’पाच आसनी दुचाकी‌’ पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अजय देवगणने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‌‘गोलमाल‌’चे सिग्नेचर म्युझिक वापरण्यात आले आहे. यावेळेस सवारी मोठी आहे आणि मनोरंजन त्याहूनही मोठे असेल, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मूळ कलाकारांना पुन्हा एकत्र पाहणे ही पर्वणी ठरत आहे. यावेळच्या भागात काही जुन्या चेहऱ्यांचे पुनरागमन झाले असून काही नवीन कलाकारही सामील झाले आहेत.- चित्रा सावंत

Check Also

‌‘किरण अब्बावरम 15‌’ चे टीझर पोस्टर प्रदर्शित

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता किरण अब्बावरम याच्या आगामी भव्य पॅन-इंडिया चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित …