ज्येष्ठ अभिनेते गोविंदा आणि त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादळाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगत असतानाच, अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिचे नाव या प्रकरणात ओढले गेले. सोशल मीडियावर दोघांच्या नात्याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर या सर्व अफवा आणि उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी कोमल राणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विस्तृत भूमिका मांडत विरोधकांना चांगलेच खडे बोल …
Read More »TimeLine Layout
October, 2026
-
11 October
जीवलग मित्र हरपला!
नाना हा माझा अत्यंत जवळचा, जिवलग मित्र होता. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळापासून आमचं नातं होतं. त्याच्या अभिनयाची सुरुवात मी पाहिली होती. त्याने आपल्या कर्तृत्वावर मिळवलेलं यशही पाहिलं होतं. त्याचा स्पष्टवक्तेपणा, त्याचा सरळ स्वभाव आणि दुसऱ्याला मदत करण्याची त्याची आंतरिक तत्परता या सगळ्या गोष्टी मी जवळून अनुभवल्या होत्या. असा माणूस अचानक आपल्यातून निघून जाणं हे माझ्यासाठी फार मोठं दुःख आहे. नानासारखा मित्र …
Read More » -
11 October
मोबाईलमधील बॅक टॅप फिचर
आपण स्मार्टफोन वापरताना स्क्रीनवर वारंवार वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी आणि ॲप्स उघडण्यासाठी मोठा संघर्ष करत असतो. परंतु, आयफोन आणि काही आधुनिक अँड्रॉइड फोनमध्ये एक अत्यंत भन्नाट आणि लपलेले फिचर असते, ज्याचे नाव ‘बॅक टॅप’ असे आहे. यात मोबाईलच्या मागच्या बाजूस दोन किंवा तीन वेळा हलके बोटाने टॅप करून तुम्ही कोणताही हवा असलेला शॉर्टकट अगदी सहजपणे सेट करू शकता. समजा तुम्हाला वारंवार …
Read More » -
11 October
मुलांना सांगा सणवारांचे महत्त्व
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आपण त्यांना जसे घडवत जाऊ तसतसे ते आकार घेत जातात. आजकाल मुलांमध्ये खूप बदल झाला आहे, त्यांची निरागसता कमी होत चालली आहे आणि ते कुटुंबापासून दूर जात आहेत, असे बोलले जाते. यय परिस्थितीत त्यांना कुटुंबाची, आपल्या संस्कृतीची, परंपरांची ओळख करुन देणे गरजेचे आहे. हल्ली मुलांना सणांमागचा खरा अर्थच माहीत नसतो. त्यांना एवढेच कळते की, होळीमध्ये …
Read More » -
11 October
मेंदूविषयीच्या समजांना नवे वळण
तरुणपणी मेंदू तीक्ष्ण असतो, असे म्हटले जाते. तसेच ’साठी आणि बुद्धी नाठी’ अशीही एक म्हण आपल्याकडे आहे; पण हे काही खरे नाही! आजवर आपण सतत ऐकत आलो आहोत की, वेगाने शिकण्याची आणि विचार करण्याची क्षमता फक्त तारुण्यापर्यंतच मर्यादित असते आणि जसजसे वय वाढते, तसतशी आपली बुद्धी कमकुवत होऊ लागते. परंतु, आता विज्ञानाच्या दुनियेतून या विचाराला एक धक्का देणारा ’यूटर्न’ मिळाला …
Read More » -
11 October
इडली व्यवसायातून लाखोंची उलाढाल!
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील चित्तेम सुधीर यांनी अवघ्या 50 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या इडली व्यवसायाला आज मोठे यश मिळाले आहे. पारंपरिक इडलीला भरडधान्यांची जोड देऊन त्यांनी तयार केलेला आगळावेगळा पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायातून स्वतःची आर्थिक प्रगती साधतानाच त्यांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठीही उत्पन्नाचा नवा मार्ग खुला केला आहे. कृषी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सुधीर यांनी …
Read More » -
11 October
अपरिहार्य ‘कपात ’
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाप्रमाणे येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यात सर्वत्र दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. राज्यातील ग्रामीण भागाला सध्या दुष्काळाचा तीव्र चटका बसत असतानाच निर्णयाप्रमाणे आता राज्य सरकारच्या या राज्यातील नागरी भागांमध्येही पाणीकपात केली जाणार आहे. हा निर्णय अत्यंत व्यवहारी आणि स्वागतार्ह असाच मानावा लागेल. कारण राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जेव्हा राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, तेव्हा 75 टक्क्यांपेक्षा जास्त …
Read More » -
11 October
निर्भयतेची हमी कधी?
स्त्री ही समाजाचा अर्धा भाग आहे, हे केवळ भाषणात सांगण्याचे तत्त्व नाही; तर तिच्या दैनंदिन जगण्यात, प्रवासात आणि अस्तित्वात ते सुरक्षिततेच्या रूपात प्रतिबिंबित होणे ही कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीची पहिली अट असते. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच राजधानी दिल्ली-एनसीआरमधील महिलांवरील अत्याचारांच्या संदर्भात केलेली टिप्पणी केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित नसून, संपूर्ण देशाच्या व्यवस्थेला आरसा दाखवणारी आहे. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून चालणारी असो वा गर्दीच्या मेट्रो …
Read More » -
11 October
जंतर मंतरवर पुन्हा रणभूमी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांच्या राजीनाम्याची मागणी करीत देशातील सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने दिल्लीच्या जंतर मंतरवरून संघर्ष सुरू केला आहे. त्याआधीच तरुणांच्या कॉक्रोच जनता पक्षाने 2 ऑक्टोबरपासून रणशिंग फुंकले आहे. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी गनिमी कावा करीत आकाशवाणीमध्ये ठिय्या आंदोलन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ …
Read More » -
11 October
दुष्काळात दरवाढीचा तेरावा
उत्सवाचा हंगाम बाजारात नवी उमेद, उत्साहाचे वातावरण आणि घराघरांत आनंदाची पर्वणी घेऊन येतो. नागरिक खरेदीचे नियोजन आखतात, बाजारपेठा ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात आणि व्यापारी उलाढाल वाढण्याची आस धरून बसतात. परंतु यंदाच्या सणासुदीच्या आनंदावर वाढत्या महागाईचे सावट असतानाच आता महागणाऱ्या कर्जांमुळे नवा भार वाढणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची म्हणजे 0.25 टक्के वाढ करून …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







