पावसाळा म्हणजे हिरवाई, गारवा आणि नवचैतन्याचा बहारदार ऋतू. मात्र या ऋतूसोबत अनेक अडचणीही येतात. अचानक कोसळणारा पाऊस, चिखल, घसरडे रस्ते, ओले होणारे कपडे, खराब होण्याची भीती असलेला मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची चिंता अशा अनेक गोष्टींना दररोज सामोरे जावे लागते. त्यामुळे या दिवसांत हवामानाला साजेशा ॲक्सेसरीजची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. योग्य ॲक्सेसरीजमुळे पावसाळ्यातील दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर …
Read More »TimeLine Layout
July, 2026
-
26 July
ओपन किचनला पार्टीशन हवंय ?
आजकालच्या आधुनिक घरांमध्ये ‘ओपन किचन’ची फॅशन असली तरी अनेकदा काम करताना मोकळेपणा न वाटल्यामुळे किंवा पाहुण्यांसमोर स्वयंपाक करताना संकोच वाटल्यामुळे ते झाकण्याची गरज भासते. यासाठी भिंत बांधण्याऐवजी काही पर्याय वापरता येतील: 1. मणी किंवा काचेच्या माळा (ग्लास बीड्स) ः तुम्हाला किचन पूर्णपणे बंद करायचे नसेल आणि आधुनिक लूक कायम ठेवायचा असेल, तर प्लास्टिक, लाकूड किंवा काचेच्या मण्यांच्या माळा वापरणे हा …
Read More » -
26 July
वाळवंटातील महादीर्घायुषी वनस्पती
जगातील काही झाडे दिसायला विचित्र असतात, तर काही त्यांच्या अनोख्या गुणधर्मांमुळे उठून दिसतात. वनस्पतीच्या जगात जोशुआ ट्री ही एक अनोखी प्रजाती आहे. याला युक्का ब्रेविफोलिया किंवा युक्का पाम इत्यादी नावांनीही ओळखले जाते. वाळवंटातील बुंध्यासारख्या दिसणाऱ्या या मोठ्या जीवाला पाहून असे वाटत नाही की ते खूप दीर्घायुष्यी असेल. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ॲरिझोना, उटाह आणि नेव्हाडामध्ये आढळणारे युक्का ब्रेविफोलिया 400 ते 1800 मीटर …
Read More » -
26 July
अवकाश क्षेत्राला नवे क्षितिज देणारी जोडी.
भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात 18 जुलै 2026 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या ‘विक्रम-1’ या रॉकेटने यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी नवे पर्व सुरू केले. या ऐतिहासिक मोहिमेच्या केंद्रस्थानी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे दोन भारतीय अभियंते होते. पवन चंदना यांनी आयआयटी खरगपूरमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर 2012 ते …
Read More » -
26 July
भारत-अमेरिका व्यापार करारावर टांगती तलवार
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध सध्या एका विचित्र आणि पेचप्रसंग निर्माण करणाऱ्या वळणावर येऊन ठेपले आहेत. एकीकडे दोन्ही देश व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे अमेरिकेने रशियाकडून तेल आयात करणाऱ्या देशांवर, ज्यात भारताचाही समावेश आहे, तब्बल 100 टक्के आयात शुल्क लादण्याची तयारी चालवली आहे. ही बाब द्विपक्षीय व्यापार वार्ता आणि धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करत …
Read More » -
26 July
पार्थ विरुध्द रोहित?
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असला, तरी प्रत्यक्षात हा मार्ग अधिकच खडतर होत चालल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांचे पुनर्मिलन व्हावे, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्तेआणि नेते व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ‘घरवापसी’चे संकेतही वेळोवेळी मिळाले; मात्र आता या …
Read More » -
26 July
जंतरमंतरवर पुन्हा लाठीचार्ज
कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्त्वात संसद भवनावर 20 जुलैला काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच आंदोलनकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी झालेल्या दगडफफेकीत काही आंदोलक आणि पोलीस जखमी झाले. या आंदोलकांनी जंतरमंतरवरून संसद भवनाकडे कूच करताना जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनात पुन्हा एकदा 22 तारखेला मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिस आणि …
Read More » -
26 July
प्रतीक्षा निर्णायक निकालाची
लोकशाहीत मतदाराचा कौल हा अंतिम मानला जातो. मात्र, निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने पक्ष बदलून सत्तेची समीकरणे बदलत असतील, तर तो कौल खऱ्या अर्थाने अबाधित राहतो का? हा मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांच्या विलीनीकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील आगामी सुनावणी पक्षांतरविरोधी कायद्याच्या भवितव्याचा आणि भारतीय लोकशाहीतील मतदारांच्या विश्वासाचा कस लावणारी ठरणार आहे. ठाकरेसेनेच्या सहा खासदारांचे एकनाथ …
Read More » -
26 July
प्रश्न पोलिसांच्या कारवाईचा
दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेला संघर्ष लोकशाही व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. एका बाजूला आपली भूमिका मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलेले नागरिक होते, ज्यांच्यात मतदानाचा अधिकारही अद्याप न मिळालेले अनेक तरुण सहभागी होते; तर दुसऱ्या बाजूला त्यांचे संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीस होते. लोकशाहीत या दोघांमधील विश्वासाचे नाते अत्यंत महत्त्वाचे असते. ते तुटणे ही कोणत्याही समाजासाठी चांगली …
Read More » -
19 July
‘द व्वान’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ’द व्वान’ हा आगामी पौराणिक आणि काल्पनिक (फोकलोर फँटसी) चित्रपट आता 25 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे एक अत्यंत रहस्यमय आणि आकर्षक पोस्टर देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. या नवीन पोस्टरमध्ये एका …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







