रणवीर-फरहान वादात सलमानची मध्यस्थी

‌‘डॉन 3‌’ चित्रपटावरून अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यात निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी सुपरस्टार सलमान खान आता मध्यस्थ म्हणून पुढे आला आहे. चित्रपटसृष्टीतील या मोठ्या वादाला माध्यमांमध्ये मोठे स्वरूप येऊ नये आणि दोन्ही बाजूंच्या हितसंबंधांचे रक्षण व्हावे, यासाठी सलमान खानने वैयक्तिक स्तरावर पुढाकार घेतला आहे. रणवीर सिंगने ‌‘डॉन 3‌’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने रणवीविरुद्ध असहकाराचा आदेश जारी केल्यामुळे हा वाद अधिक गंभीर बनला आहे. या वादात चित्रपटसृष्टी विभागली जात असल्याचे पाहून सलमान खानने दोघांमधील तणाव निवळण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याने रणवीर सिंग आणि फरहान अख्तर या दोघांशीही स्वतंत्रपणे फोनवरून सविस्तर संवाद साधला आहे. कोणत्याही तिसऱ्या पक्षाला किंवा कायदेशीर यंत्रणेला यात सामील न करता हा वाद आपापसात शांततेने मिटवावा, असा सल्ला सलमानने दोघांना दिला आहे.हा वाद निवळल्यानंतर भविष्यात दोघांनी मिळून एखाद्या दुसऱ्या प्रकल्पावर एकत्र काम करावे, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. सलमानच्या या मध्यस्थीला दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ते आता जाहीर वाद टाळून थेट संवादाद्वारे मार्ग काढण्याचा विचार करत आहेत. – आशिष जोशी

Check Also

अजय-अनुभवचे पॅचअप!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा तब्बल 18 वर्षांनंतर एका मोठ्या …