पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कळवडी गावच्या प्रणिता वामन यांनी ‘एमबीए इन ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट’चे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात चांगले करिअर करण्याचा पारंपरिक मार्ग त्यांच्यासमोर खुला होता. मात्र त्यांनी वेगळी वाट निवडली. नोकरी करण्याऐवजी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला. फूड प्रोसेसिंग कंपनीत इंटर्नशिप करताना त्यांना आधुनिक शेतीतील बदल आणि कृषी व्यवसायातील संधी जवळून …
Read More »चिंतन – प्रबोधन
उष्ण हवामानातील ‘केशरयुक्त’ यशोगाथा
केशर म्हटले की डोळ्यांसमोर काश्मीरची थंड हवा आणि जांभळ्या फुलांनी बहरलेली शेती येते. विशिष्ट तापमान आणि हवामानाची गरज असल्यामुळे केशराचे उत्पादन प्रामुख्याने काश्मीरशी जोडले गेले आहे. मात्र नागपूरच्या उष्ण हवामानातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केशराचे उत्पादन घेता येते, हे अक्षय होले आणि दिव्या लोहकरे होले या दाम्पत्याने दाखवून दिले आहे. ‘शाया एंटरप्रायझेस’च्या माध्यमातून त्यांनी नियंत्रित वातावरणात केशर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला. …
Read More »सात अपयशांनंतर स्वप्नाल गवसणी
वर्षाला 46 लाख रुपयांचे पॅकेज, जगातील नामांकित कंपनीत नोकरी आणि पुढे उज्ज्वल करिअरची हमी… इतके मिळाल्यानंतर बहुतेक जण दुसऱ्या पर्यायाचा विचारही करणार नाहीत. मात्र लखनौच्या 27 वर्षीय शारदेंदू तिवारी यांच्यासाठी हे अंतिम ध्येय नव्हते. त्यांना भारतीय लष्कराची वर्दी खुणावत होती. त्यासाठी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडली, 7 वेळा आलेले अपयश पचवले आणि आठव्या प्रयत्नात लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. …
Read More »तंत्रज्ञानातून शेतीकडे..
शेतीतील आर्थिक अस्थिरता जवळून पाहत मोठे झालेले शशी कुमार यांनी आयुष्याची सुरुवात मात्र शेतीतून केली नाही. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शशी यांनी संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कारकीर्द घडवली. विप्रोमध्ये 13 वर्षे आणि एकूण 17 वर्षेतंत्रज्ञान उद्योगात काम केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कारकीर्द सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामागे एकच प्रश्न होताशेतकऱ्याला शेतीतून स्थिर आणि सन्मानजनक उत्पन्न कसे मिळेल? याच प्रश्नातून …
Read More »25 हजारांपासून सुरुवात आता 22 हजार कोटी
व्यवसाय उभा करण्यासाठी मोठे भांडवल, भव्य कारखाना आणि विस्तीर्ण वितरण व्यवस्था सुरुवातीपासूनच हवी, हा समज आर. जी. चंद्रमोगन यांच्या वाटचालीने खोटा ठरवला. काही हातगाड्यांवरून आईस्क्रीम विकण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या डेअरी उद्योगापर्यंत पोहोचला आहे. आर. जी. चंद्रमोगन यांनी 1970 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आईस्क्रीम व्यवसायात पाऊल ठेवले. सुरुवातीचे भांडवल होते सुमारे 25 …
Read More »टेरेसवरील शेतीपासून 20 एकरांच्या बेरी फार्मपर्यंत
मुंबईच्या केया सालोट यांचा व्यवसायाचा प्रवास वेगळ्या वाटेने जाण्याची प्रेरणा देणारा आहे. लहानपणापासूनच घरातील व्यवसायाचे वातावरण पाहिल्यामुळे उद्योजकतेची ओढ त्यांच्या मनात होती. मात्र, सुरुवातीला त्यांनी कॉर्पोरेट कायदा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतातील मोठ्या कायदेविषयक कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले. काही वर्षांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याची इच्छा अधिक तीव्र झाली आणि 2018 मध्ये त्यांनी नोकरीतून ब्रेक घेतला. मुंबईतील …
Read More »कचऱ्यातून संधी शोधणारा उद्योजक
बंगळुरूमधील उद्योजक वैभव अनंत यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापराकडे केवळ पर्यावरणीय संकट म्हणून पाहिले नाही, तर त्यामध्ये नव्या व्यवसायाची संधीही शोधली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे वाढणारा कचरा आणि त्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणपूरक पॅकेजिंग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘बॅम्ब्र्यू’ या कंपनीची सुरुवात झाली. ‘बॅम्ब्र्यू’मध्ये बांबू, लाकडाचा लगदा आणि नैसर्गिक तंतू यांसारख्या साहित्याचा वापर करून जैवविघटनशील …
Read More »पर्यावरणपूरक यशोगाथा
दरवर्षी टिश्यू पेपर, स्वयंपाकघरातील कागदी पुसणी आणि इतर कागदी वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड केली जाते. वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण लक्षात घेता पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारे पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचारातून 2019 मध्ये अलय पटेल आणि अनिरुद्ध शर्मा या दोन मित्रांनी ‘बेको’ या उद्योगाची स्थापना केली. त्यांचे उद्दिष्ट केवळ नवा उद्योग उभारणे नव्हते, तर …
Read More »स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश
जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, हे राजस्थानमधील 22 वर्षीय जसपाल सिंह सिंधल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बारावीचा विद्यार्थी असलेल्या जसपालकडे महागडा कॅमेरा किंवा संगणक नव्हता. केवळ स्मार्टफोनच्या मदतीने त्यांनी प्रेरणादायी भाषणे, टेड टॉक्स आणि विविध नामवंत व्यक्तींच्या भाषणांतील महत्त्वाचे भाग निवडून लहान व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात …
Read More »अवकाश क्षेत्राला नवे क्षितिज देणारी जोडी.
भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात 18 जुलै 2026 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या ‘विक्रम-1’ या रॉकेटने यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी नवे पर्व सुरू केले. या ऐतिहासिक मोहिमेच्या केंद्रस्थानी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे दोन भारतीय अभियंते होते. पवन चंदना यांनी आयआयटी खरगपूरमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर 2012 ते …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र