जीवनात परिस्थिती जेव्हा माणसाला झुकवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा धैर्यच इतिहास लिहितं. महाराष्ट्रातील प्रतीक्षा तोंडवलकर यांची कहाणी हेच सिद्ध करते. ज्या बँकेत त्यांनी कधी काळी झाडू हातात घेतला होता, त्याच भारतीय स्टेट बँकेत त्या आज असिस्टंट रीजनल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. प्रतीक्षा यांचा जन्म पुण्याजवळील एका अतिशय गरिब कुटुंबात झाला. वडील मजुरी करत होते. त्यांच्या उत्पन्नावर कसंबसं घर चालायचं. त्यामुळे शिक्षण …
Read More »चिंतन – प्रबोधन
ध्येयप्राप्तीसाठी डार्विनचा संदेश
कोणतीही मोठी कलाकृती उभी राहिली किंवा आकाराला आली की लोक तिची प्रशंसा करतात. त्यातील गहन अर्थ शोधतात, तिच्या भव्यतेला सलाम करतात. पण बहुतेकदा त्या कलाकृतीच्या निर्मिती प्रक्रियच्या तळाशी जाऊन वेध घेत नाहीत. खरे म्हणजे तो वेध घेतला असता अत्यंत मोलाची सूत्रे आपल्याला मिळतात. चार्ल्स डार्विन यांच्या महान ग्रंथाची कहाणी अशीच मौलिक विचार देणारी आहे. चार्ल्स डार्विन यांनी आपल्या महान ग्रंथ …
Read More »४७ वेळा मिळाला नकार,पण हार मानली नाही
कोण म्हणतं स्वप्नं खरी होत नाहीत? मनापासून ठरवलं, तर प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरू शकतं. विचार करा तुम्ही एखादं असं काम करता आहात ज्यासाठी तुम्ही महिनोन्महिने मेहनत करता, तहान-भूक हरपून काम करता, आयुष्याचं सगळं लक्ष त्यावर केंद्रित करता पण ४७ वेळा अपयश येते; अशा वेळी कुणीही गतप्राण होऊन जाऊ शकतो. पण युको शिमिजु यांनी अशा परिस्थितीतही हार न मानता आपली संकल्पना …
Read More »जैविक शेतीची अनोखी यशोगाथा
दीपक सभरवाल यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम, आयसीएमए आणि एमबीए पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी टाटा, पेप्सी आणि जनरल इलेट्रिकसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केले. परंतु, कॉर्पोरेट मिटिंग्स आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमधील आयुष्य त्यांना पूर्ण समाधान देत नव्हते. २०१७ मध्ये दीपक यांनी आपले वीस वर्षांचे कॉर्पोरेट करिअर सोडले आणि ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवास राजस्थानातील पुष्कर येथे …
Read More »साहसी संशोधकाची ध्येययात्रा
महान संशोधक सर जेम्स लार्क रॉस यांची जीवनगाथा धैर्य, चिकाटी आणि ज्ञानलालसेचा महाग्रंथ आहे. स्कॉटलंडमध्ये जन्मलेला हा तरुण लहानपणापासून समुद्राकडे ओढला गेला. समुद्रावर जावे हेच त्याचे पहिले स्वप्ने होते. प्रसिद्ध आर्टिक संशोधक सर जॉन रॉस यांच्या साहसकथा ऐकत तो मोठा झाला आणि बारा वर्षांचा असतानाच त्याने नेव्हीत प्रवेश केला. त्यानंतर समुद्रच त्याचे विद्यापीठ ठरले. गणित, नौकानयन, भूचुंबकत्व यांचे धडे त्याने …
Read More »यशोकहाणी भूगर्भशास्त्रज्ञाची
लंडनजवळील ओल्ड सारम कॅम्प येथे डॉ. रॅडलिफ यांच्या शाळेतील काही नवीन मुले एका जुन्या बोगद्याच्या तोंडाशी थांबली होती. तो बोगदा प्राचीन काळी पाण्याकरिता वापरला जात असे. काळोख्या बोगद्यात शिरताना सगळ्यांची भीतीने थरथर कापणारी अवस्था होती. त्याच वेळी मोठ्या मुलांनी त्यांच्या टोप्या आत फेकून दिल्या. भीतीवर मात करून लहान मुले सरपटत त्या बोगद्यात शिरली. तेथे खूप अंधार होता, खडकावर पाणी ठिबकत …
Read More »एमिलिया क्लार्कची प्रेरणादायी कहाणी
तुम्हाला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेतून डेनेरिस टार्गेरियनची भूमिका करणारी एमिलिया लार्क परिचित असेल. परंतु तुम्हाला हे कदाचित ठाऊक नसेल की ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या सुरुवातीच्या सिझनदरम्यान तिला दोन भयानक मेंदूतील गाठी (ब्रेन अॅॅन्युरिझम) झाल्या होत्या ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकला असता. पहिल्या सिझनच्या अगोदरच, व्यायाम करताना तिच्या डोयात भोसकावे, कापल्यासारखे तीव्र वेदना होऊ लागल्या. तपासणीसाठी केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये अॅन्युरिझम असल्याचे …
Read More »संगणकविश्वातील ‘बग’ शोधणारी जननी
ग्रेस हॉपर या अमेरिकन संगणकतज्ज्ञ आणि नौदलातील अधिकारी होत्या. आज आपण कंप्यूटर प्रोग्रामिंग ही जी गोष्ट सहज मानतो, त्याचा पाया घालण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण त्यांच्याशी निगडित एक आगळावेगळा प्रसंग संगणक क्षेत्रातील संज्ञाचक्र बदलून गेला. १९४७ साली हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात मार्क-२ नावाचा एक भला मोठा संगणक वापरात होता. हा संगणक खोलीभर जागा व्यापून बसलेला, हजारो व्हॅयूम ट्यूब्सनी चालणारा …
Read More »प्रामाणिकपणाचा असाही आदर्श
सिंगापूरमधील एका मोठ्या घरात सिसिल ब्राउन नावाचे इंग्रज डॉटर एकटे राहत होते. त्यांनी अनेक प्राणी आणि पक्षी पाळले होते आणि त्यांच्यावर ते लहान मुलांसारखे प्रेम करत होते. त्यांच्या शेजारीच मिग नावाचा चौदा वर्षांचा गरीब मुलगा एकटा राहत होता. तो डॉटर ब्राउन यांचे कपडे धुत असे आणि इस्त्री करत असे. दरम्यान इंग्रज आणि जपानी यांच्यात युद्ध सुरू झाले. युद्धाच्या काळात मिग …
Read More »सायकल चोरीला गेली नसती तर….
१९५४ मध्ये जेव्हा कॅसियस फक्त बारा वर्षांचा होता, तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत लुईव्हिल येथील कोलंबिया सभागृहात ‘होम शो’ पाहायला गेला होता. प्रदर्शनात फर्निचर आणि घरगुती उपकरणांबरोबरच मुलांना मोफत पॉपकॉर्नसारख्या लहानसहान आनंददायी गोष्टी देखील मिळाल्या. पण जेव्हा कॅसियस बाहेर आला तेव्हा त्याची लाडकी लाल-पांढरी सायकल चोरीस गेली होती. हताश आणि रागावलेला कॅसियस तक्रार करण्यासाठी एका पोलिसाकडे गेला. त्याने रागाने त्या पोलिसाला …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र