जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्योगपती सत्यनारायण नुवाल. राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर स्फोटक आणि संरक्षण क्षेत्रातील एका महाकाय साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. सत्यनारायण नुवाल यांचा जन्म 25 जुलै …
Read More »चिंतन – प्रबोधन
शेतकऱ्याच्या लेकीची भरारी
जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्वप्नांना गवसणी कशी घालता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आश्रिता. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आश्र्तािने आपल्या कष्टाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ज्योतिषमती इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर तिने आपल्या आवडीच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, जो तिच्या अनेक सोबत्यांनी निवडलेल्या वाटेपेक्षा वेगळा होता. आश्रिताचा हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या ‘गेट’ …
Read More »120 दिवसांच्या तयारीत बनल्या सनदी अधिकारी
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. लाखो तरुण या परीक्षेसाठी वर्षानुवर्षेकठोर परिश्र्म करतात, तरीही यशाची खात्री नसते. मात्र, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या जिद्दीपुढे नियतीलाही झुकावे लागते. 32 वर्षीय तरुणी पांडे यांची यशोगाथा अशाच अदम्य साहसाचे प्रतीक आहे. आयुष्याच्या अशा वळणावर जिथे वयोमर्यादेमुळे त्यांच्याकडे शेवटची संधी उरली होती, तिथे त्यांनी कोणत्याही …
Read More »चिलकूरच्या मातीतून जागतिक क्षितिजाकडे
हैदराबादच्या कोलाहलापासून दूर, चिलकूर गावातील एक एकर शेतात झाडांच्या सावलीत आणि खुल्या आकाशाखाली एक वेगळीच सृष्टी आकाराला येत आहे. जहाजाच्या जुन्या ‘कंटेनर’ला कल्पकतेने घराचे रूप देऊन तिथे राहणारा एक तरुण कलाकार आज जागतिक कलाविश्वात आपली मोहोर उमटवत आहे. हर्ष दुरूगड्डा असे या शिल्पकाराचे नाव असून, त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. सध्या त्यांच्या कार्याचा गौरव होत …
Read More »विचारांची ‘विराट’ शिदोरी
काही माणसे आपल्या कार्यक्षेत्रात केवळ नाव कमवत नाहीत, तर इतिहास घडवतात. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा-जेव्हा विक्रमांची चर्चा होते, तेव्हा विराट कोहली हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विराटचे हे यश केवळ नशिबाचा भाग नसून, त्यामागे अफाट कष्ट, शिस्तबद्ध सराव आणि तंदुरुस्तीसाठीचा कठोर डाएट यांचा मोठा वाटा आहे. आयुष्यात कितीही उतार-चढाव आले तरी विराटने आपला सकारात्मक दृष्टिकोन कधीही सोडला नाही. विराटच्या मते, कष्टाला …
Read More »मुंबईच्या तरुणाची मिलानपर्यंत भरारी
मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या 24 वर्षीय शुभम वाडकर या तरुणाने जागतिक फॅशन विश्वात केलेली कामगिरी केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी आहे. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अवघ्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून त्याने ’रॅम्प’वर पाऊल ठेवले आणि आज तो जागतिक ब्रँड्सचा चेहरा बनला आहे. शुभमने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका बांधकाम कंपनीत नोकरी स्वीकारली होती, जिथे त्याला वार्षिक …
Read More »पाच रुपयांच्या सॉफ्टीतून 300 कोटींचे साम्राज्य
आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. पण 90 च्या दशकात, जेव्हा स्त्रियांनी घराबाहेर पडणेही सोपे नव्हते, तेव्हा एका महिलेने बँकेतील सुरक्षित नोकरी सोडून उद्योजकतेच्या अनिश्चित वाटेवर पाऊल ठेवले. ही जिद्दीची कहाणी आहे दीपा पाई यांची, ज्यांनी 5 रुपयांच्या सॉफ्टीपासून सुरुवात करून आज 300 कोटी रुपयांचे ’हँग्यो’ आईस्क्रीमचे साम्राज्य उभे केले आहे. मंगळुरूमध्ये जन्मलेल्या दीपा पाच भावंडांमध्ये …
Read More »बालपणीच्या धक्क्यातून जन्मले ‘द मार्ग इनिशिएटिव्ह’
बेंगळुरू येथील 14 वर्षीय सूर्य उत्कर्ष याने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी एका मोठ्या रस्ते अपघाताचा अनुभव घेतला होता. या अपघाताने सूर्याला भारतात रस्ते सुरक्षेबाबत पुरेशी जागरूकता आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. कालांतराने इतर अपघातग्रस्तांच्या संपर्कात आल्यावर त्याला याबाबत काहीतरी ठोस करावे असे वाटू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी, वयाच्या 12 व्या वर्षी त्याने ‘द मार्ग इनिशिएटिव्ह’ ही …
Read More »छोट्या प्रयोगातून 300 कोटींचे साम्राज्य!
मनीष चौधरी हे नाव स्किन सायन्स या नामांकित ब्रँडचे सह-संस्थापक आहेत. भारतातील सर्वात विश्वासार्ह डी 2 सी (डायरेक्ट टू कंज्यूमर) पर्सनल केअर ब्रँड्समध्ये आज या कंपनीची गणना होते. त्यांचा हा प्रवास एका रात्रीत मिळालेल्या यशाचा नाही. हा प्रवास आहे शिकण्याचा, प्रयोग करण्याचा, अपयशाचा आणि स्वतःला बदलून हळूहळू एक असा ब्रँड उभा करण्याचा, जो आज जगभरातील लाखो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. …
Read More »प्रामाणिकपणाचा असाही आदर्श
चेन्नईमध्ये स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत असलेल्या पद्मा यांनी आपल्या प्रामाणिकपणाने संपूर्ण देशासमोर मानवतेचा एक नवा आदर्श उभा केला आहे. कचरा साफ करत असताना पद्मा यांना सुमारे 45 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडले. एवढी मोठी मालमत्ता हाती लागूनही, त्याचा एक छोटासा भागही स्वतःकडे न ठेवता त्यांनी ते दागिने पूर्णपणे परत केले. त्यांच्या या कृत्याने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. मला …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र