सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ’द व्वान’ हा आगामी पौराणिक आणि काल्पनिक (फोकलोर फँटसी) चित्रपट आता 25 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे एक अत्यंत रहस्यमय आणि आकर्षक पोस्टर देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. या नवीन पोस्टरमध्ये एका योद्ध्यासारखी आकृती एका वाघ आणि बैलाच्या मध्यभागी उभी असलेली दिसत असून, चित्रपटातील संघर्षाची ही एक झलक असल्याचे मानले जात आहे. हा चित्रपट भारतीय लोककथांवर आधारित असून यामध्ये फँटसी ॲक्शन, कॉमेडी आणि ॲडव्हेंचर यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि टीव्हीएफ मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.- राधिका बिवलकर
Check Also
लग्नानंतर गोविंदाची अनेक अफेअर्स ः सुनीता
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा हिने नुकत्याच सुरू झालेल्या ’लॉक अप: सच या सझा’ (सीझन …
पांचजन्य वृत्तपत्र