लेख-समिक्षण

विक्रांतने आटोपले ‌‘व्हाईट‌’चे डबिंग

अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची मने जिंकणारा लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेसस्सी सध्या त्याच्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‌‘प्रीतम अँड पेड्रो‌’ आणि ‌‘मुसाफिर कॅफे‌’ यांसारख्या प्रोजेक्टस्‌‍नंतर आता तो ‌‘व्हाईट‌’या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या डबिंगचे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.
चित्रपटाबाबत बोलताना निर्माते महावीर जैन म्हणाले की, आजच्या काळात जेव्हा जग युद्ध आणि संघर्षांवर उपाय शोधत आहे, तेव्हा हा चित्रपट अगदी योग्य वेळी समोर येत आहे. आपल्या प्रभावी कथानकाच्या माध्यमातून हा चित्रपट पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो आणि ही भारताकडून संपूर्ण जगाला एक अमूल्य भेट आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, या चित्रपटात विक्रांत मैसीने जागतिक आध्यात्मिक गुरु श्र्ी श्र्ी रविशंकर यांची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे आणि त्याचा हा अभिनय जागतिक स्तरावर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.
कोलंबियाच्या अंतर्गत संघर्षावर आधारित हा चित्रपट मानवी नातेसंबंध आणि राजकीय पार्श्वभूमीवर उभा असलेला एक थ्रिलर आहे, ज्यावर एका भारतीय आध्यात्मिक गुरुंनी आपल्या ज्ञानाने यशस्वी मार्ग काढला होता. या चित्रपटात जॅन कार्लोस गिल (सिनेमॅटोग्राफर), मेक्सिकन अभिनेता डॅरियो याझबेक बर्नाल आणि पनामाचा अभिनेता जॅमी न्युबॉल यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग आहे. – स्वाती देसाई

Check Also

‌‘द व्वान‌’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ‌’द व्वान‌’ हा आगामी पौराणिक आणि …