लेख-समिक्षण

चिंतन – प्रबोधन

गांधीजी आणि करचोरी

महात्मा गांधी नेहमीच सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचे सांगत असत. पण धावपळीच्या जीवनात ही तत्त्वे फक्त बोलण्यापुरतीच राहतात. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांची अंमलबजावणी करणं कठीण वाटतं. मात्र, जर आपण ती मनापासून जगलो, तर ती आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात. याचं एक प्रत्यक्ष उदाहरण गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत दाखवून दिलं होतं. गांधीजी त्या काळी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते. एके दिवशी त्यांच्याकडे …

Read More »

अफाट चिकाटी,अपार यश

जुलिया चाइल्ड यांना लहानपणापासूनच विविध प्रकारच्या पदार्थांची आवड होती. त्यांच्या नव्या प्रयोगांमुळे पदार्थ अत्यंत चविष्ट बनत. एकेदिवशी त्यांनी ठरवले की त्यांनी शोधून काढलेल्या रेसिपी प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्यांनी आपल्या दोन महिला सहकार्‍यांसोबत मिळून एका पुस्तकाची योजना आखली. त्या पुस्तकाचे शीर्षक ठेवले ‘फ्रेंच कुकिंग फॉर द अमेरिकन किचन’ सहकार्‍यांसोबत त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून त्या पुस्तकावर पाच वर्षेकाम केले आणि ते …

Read More »

ऋणातून उतराई…

ही हृदयस्पर्शी घटना जरी १८७४ मधली असली, तरी तिचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने १९३० मध्ये झाला. जगप्रसिद्ध संगीतकार, पोलंडचे रहिवासी असलेले पेड्रेवस्की अमेरिकेच्या दौर्‍यावर होते. त्यांच्या दौर्‍याचा उद्देश होता‡संगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेणे. प्रत्येक वेळी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी चुरस असायची. मात्र, या वेळी त्यांनी एका साध्या लोहाराच्या तरुण मुलाकडे हे आयोजन करण्याची जबाबदारी दिली. हेतू असा होता की, या निमित्ताने …

Read More »

निःस्वार्थी मेहनत वाया जात नाही!

अ‍ॅलिस ऑगस्टा बॉल ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीस विज्ञानाच्या इतिहासात झळाळणारी संशोधिका. १८९२ मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या या तरुणीला अतिशय कमी आयुष्य मिळूनही मानवी समाजासाठी तिने अमूल्य कार्य करून दाखवले. लहानपणापासूनच ती हुशार, जिज्ञासू आणि परिश्रमी होती. रसायनशास्त्रातील तिला असलेली गोडी पाहता तिने आपल्या शिक्षणाचा संपूर्ण भर विज्ञानावरच ठेवला. हवाई विद्यापीठातून तिने मास्टर्स पदवी मिळवली आणि ती या विद्यापीठाची पहिली महिला तसेच …

Read More »

विणकामात क्रांती घडवणारा अवलिया

श्री मल्लेशम् यांचा जन्म आंध्रप्रदेशातील एका गरिब विणकर कुटुंबात झाला. त्यांना इयत्ता सहावी नंतर शिक्षण सोडावे लागले आणि मोठ्यांसोबत हातमाग विणकामाच्या कामात मदत करायला सुरुवात केली. मात्र शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी खाजगीरित्या ७ वी उत्तीर्ण केली आणि १० वी सुद्धा प्रयत्नपूर्वक तिसर्‍या प्रयत्नात पूर्ण केली. पोचंपल्ली रेशीम साडी विणकामाच्या परंपरेमध्ये ‘आसू’ ही एक अनिवार्य आणि अत्यंत श्रमसाध्य प्रक्रिया असते. या …

Read More »

अश्वेत अभिनेत्याची यशोगाथा

सिडनी पॉइटियर हे बहामासमधील हॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. वर्ण किंवा रंग माणसाच्या यशाच्या आड येऊ शकत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचा जीवनसंघर्ष. १९६४ मध्ये ‘लिलीज ऑफ द फील्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार (ऑस्कर ) मिळवणारे ते पहिले आफ्रिकन अमेरिकन होते. पण त्यांना हे यश सहजासहजी मिळाले नाही. यासाठी त्यांना अनेक अडथळे आणि निराशेवर मात करावी …

Read More »

विलक्षण क्षमतेचा दिव्यांग चित्रकार

स्टीफन विल्टशायर यांचा जन्म २४ एप्रिल १९७४ रोजी इंग्लंडमधील लंडन शहरात एका स्थलांतरित कुटुंबात झाला. तो जन्मतःच ऑटिझम स्पेट्रम डिसऑर्डर या न्यूरोलॉजिकल अडचणीने ग्रस्त होता. चार वर्षांचा होईपर्यंत स्टीफन बोलतही नव्हता. त्याला इतरांशी संवाद साधणे कठीण होते, आणि सामाजिक व्यवहारात तो सहभागी होऊ शकत नव्हता. त्याचे वडील स्टीफन लहान असतानाच एका अपघातात मृत्यूमुखी पडले. त्यानंतर त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवलं. …

Read More »

ऊर्जादायी यशोगाथा

विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरिब होते. घरात वीज नव्हती, शौचालय नव्हते आणि जगण्यासाठी शेती हाच एकमेव आधार होता. विल्यम लहानपणापासूनच जिज्ञासू होता, पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाले. २००१ साली मलावीत भीषण दुष्काळ पडला. अन्नधान्याचा तुटवडा झाला, हजारो लोक उपाशी राहू …

Read More »

संघर्षगाथा स्टॅलोनची

सिल्वेस्टर स्टॅलोन यांचा जन्म ६ जुलै १९४६ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. जन्माच्या वेळी डॉटरांच्या चुकीमुळे त्यांच्या चेहर्‍याच्या खालच्या बाजूला, विशेषतः ओठ आणि जिभेच्या भागात पक्षाघात झाला. त्यामुळे त्यांची बोलण्याची शैली अर्धवट झाली आणि चेहर्‍यावर कायमस्वरूपी लकवा राहिला. हे अपंगत्व त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या सोबत राहिले. पण त्यांनी कधीही तिला शरमेची बाब समजली नाही. स्टॅलोनचं बालपण खूप अशांत होतं. त्यांच्या …

Read More »

राजर्षी टंडन यांचा आदर्शवाद

राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन त्या काळात उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मनमिळावूपणामुळे त्यांच्या घरी नेहमीच पाहुण्यांचे येणे-जाणे चालू असायचे. त्या काळात देशात गहू आणि तांदळाचा तुटवडा होता. सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत (रेशन दुकानदारांमार्फत) गहू-तांदळाचा पुरवठा सुरू केला होता, जेणेकरून सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरात अन्नधान्य मिळू शकेल. टंडनजींच्या घरात गहू-तांदूळ आठवडाभरातच संपून जात असे. मग ज्वारी किंवा जवसारख्या धान्यांच्या भाकर्‍या बनवल्या जात. …

Read More »