लेख-समिक्षण
  • 10 May 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4208

TimeLine Layout

March, 2026

  • 1 March

    वाढत्या बंडखोरीची काँग्रेसला डोकेदुखी

    एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या दहा राज्यांतील 37 जागा रिक्त होत असून यासाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहिल्यास अलीकडच्या काळात भाजपच्या स्थितीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. खरी समस्या तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आहे. काही जागांवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकू शकतो, परंतु क्रॉस व्होटिंग म्हणजेच मतविभाजनामुळे काही जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर मागील काळातही ओढवली आहे. …

    Read More »
  • 1 March

    राहुल गांधींचे मोदींना थेट आव्हान

    गेल्या मंगळवारी, काँग्रेसने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या निषेधार्थ किसान महाचौपाल आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्ो राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हटले, ‌‘जर तुमच्यात हिंमत असेल तर भारत-अमेरिका करार रद्द करा‌’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ‌‘मोदींनी शेतकऱ्यांना उद्ध्‌‍वस्त केले …

    Read More »
  • 1 March

    एकात्मतेचा ‌‘रंग‌’ सोहळा

    भारतात सर्व प्रांतात साजरा होणारा सर्वात चैतन्यमयी सण म्हणजे होळी. एकीकडे वसंतागमनाच्या ओढीने आतूर झालेली सृष्टी वातावरणात चैतन्य पसरत असते, त्याच वेळी फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीला रंगांची उधळण करत मानवी मने आनंदाने न्हाऊन निघतात. प्रेम, जिव्हाळा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा हाभव्य सोहळा भारतीय णसंस्कृतीतील विविधता आणि एकात्मता दर्शवणारा आहे. ‌‘वाईटावर चांगल्याचा विजय‌’ हे या सणाचे मुख्य सूत्र आहे. या काळात …

    Read More »
  • 1 March

    आव्हानांच्या बोजाखाली आयटी क्षेत्र

    भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. देशाची माहिती तंत्रज्ञान उद्योगव्यवस्था अनेक दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिली आहे; मात्र …

    Read More »

February, 2026

  • 22 February

    रणवीरची एक्झिट आणि 40 कोटींचा वाद

    ‌‘धुरंधर‌’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंग याने ‌‘डॉन 3‌’ मधून अधिकृतपणे माघार घेतल्याचे वृत्त आहे. रणवीरने तांत्रिक मतभेदांचे कारण देत हा चित्रपट सोडला आहे. मात्र, यामुळे निर्मात्यांचे (एक्सेल एंटरटेन्मेंट) मोठे नुकसान झाले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीरकडे 40 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. प्री-प्रॉडक्शनवर झालेला खर्च रणवीरने भरून द्यावा, असा निर्मात्यांचा दावा आहे. रणवीर …

    Read More »
  • 22 February

    नवोदित चेहऱ्यांच्या प्रेमकथा आणि यशाचे समीकरण

    चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत प्रेमकथा हा असा एक विषय आहे, ज्याला काळाचे बंधन नसते. एखाद्या भव्य प्रेमकाव्यावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी पडद्यावर नेहमीच बड्या महानायकांची गरज भासते असे नाही, तर नवोदित कलाकारांच्या फ्रेश जोड्याही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात. गेल्या वर्षातील ‌‘सैयारा‌’ या चित्रपटाचे अभूतपूर्व यश हे याचेच जिवंत उदाहरण मानले पाहिजे. चित्रपटसृष्टीचा इतिहास चाळला तर आपल्या असे लक्षात येते की, नामचीन …

    Read More »
  • 22 February

    ‌‘सेबी‌’मध्ये करिअर करायचंय?

    वेतन आणि आर्थिक लाभ : आर्थिकदृष्ट्‌‍या हे पद अत्यंत सक्षम आहे. सर्व भत्ते धरून महिन्याला साधारण दीड लाख रुपयांच्या आसपास मिळणारे वेतन हे कोणत्याही तरुण करिअरप्रेमीसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय राहण्यासाठी घर (एचआरए), वैद्यकीय विमा आणि सवलतीच्या दरात मिळणारी कर्जेयामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहते. यशाचा मंत्र : सेबी ग्रेड ए परीक्षेचा अभ्यास करताना केवळ पुस्तकी कीडा होऊन चालणार नाही. तुम्हाला …

    Read More »
  • 22 February

    डोअरमॅट घसरतोय?

    अँटी-स्लिप मॅटिंग किंवा पॅड वापरा : डोअरमॅट घसरू नयेत यासाठी हा सर्वात परिणामकारक आणि सुरक्षित उपाय आहे. बाजारात सहज मिळणाऱ्या अँटी-स्लिप मॅटिंग किंवा रग पॅड खास डोअरमॅटखाली घालण्यासाठी डिझाइन केलेले असतात. हे पॅड तुम्ही डोअरमॅटच्या आकारानुसार कापून वापरू शकता. ते डोअरमॅटला जमिनीशी घट्ट पकड देतात, त्यामुळे तो सरकत नाही. हे पॅड वॉशेबल असल्यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येतात. डबल-साइडेड टेप वापरा …

    Read More »
  • 22 February

    केळीचे फुलही आरोग्यदायी

    अरोग्यासाठी केळाचे सेवन आरोग्यदायी असते हे आपल्याला माहिती आहेच; पण केळफूलही आरोग्यदायी असते याची अनेकांना कल्पना नसते. केळीच्या फुलांमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटामिन ईसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. हे फूल कच्चे किंवा शिजवून, तसेच सूप, कोशिंबीर आणि तळूनदेखील खाल्ले जाऊ शकते. याशिवाय केळीच्या फुलाचा हेअर पॅक किंवा फेस पॅक म्हणूनही वापर करता येतो. अनेक …

    Read More »
  • 22 February

    विचारांची ‌‘विराट‌’ शिदोरी

    काही माणसे आपल्या कार्यक्षेत्रात केवळ नाव कमवत नाहीत, तर इतिहास घडवतात. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा-जेव्हा विक्रमांची चर्चा होते, तेव्हा विराट कोहली हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विराटचे हे यश केवळ नशिबाचा भाग नसून, त्यामागे अफाट कष्ट, शिस्तबद्ध सराव आणि तंदुरुस्तीसाठीचा कठोर डाएट यांचा मोठा वाटा आहे. आयुष्यात कितीही उतार-चढाव आले तरी विराटने आपला सकारात्मक दृष्टिकोन कधीही सोडला नाही. विराटच्या मते, कष्टाला …

    Read More »