अमेरिकेच्या या कोलांटउड्या आणि इस्राईलची युद्धखोरी लक्षात आल्यानंतर इराणने तात्काळ हार्मुझची सामुद्रधनी पुन्हा बंद केली. हा युद्धविराम म्हणजे युद्धाचा शेवट नाही. आमचे हात अजूनही शस्त्रांवर आहेत, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे हा युद्धविराम खरोखरच शांततेचा मार्ग प्रशस्त करणार की पुन्हा एकदा संघर्षाला आमंत्रण देणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे दोन्ही देशांच्या पुढील पावलांवर अवलंबून …
Read More »TimeLine Layout
April, 2026
-
12 April
‘टेराफॅब’ची धूम
जगप्रसिद्ध अब्जाधिश आणि ‘टेस्लाकार’ एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश तंत्रज्ञान आणि प्रगत संगणनशक्ती यांचा संगम घडवून आणणाऱ्या एका अत्यंत मोठ्या औद्योगिक उपक्रमाची कल्पना त्यांनी मांडली आहे. या उपक्रमाचे नाव आहे ‘टेराफॅब.’ जगातील सर्वांत मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून या संकल्पनेची चर्चा सुरू आहे.भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, स्वयंचलित रोबोटस्, उपग्रह नेटवर्क आणि अवकाशाधारित संगणकीय व्यवस्था यांसाठी लागणाऱ्या प्रचंड प्रमाणातील …
Read More » -
6 April
इराणचा ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगलवर हल्ला
जोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी जागतिक जहाजांच्या वाहतुकीसाठी पुन्हा उघडली जात नाही आणि ती ‘मुक्त आणि सुरक्षित’ राहत नाही, तोपर्यंत अमेरिका युद्धविरामाचा विचार करणार नाही, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले असताना इराणने बुधवारी रात्री बहरीनमधील अमेरिकन कंपनी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या डेटा सेंटरवर हल्ला केला. फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर त्या ठिकाणी आग लागली. यापूर्वी, बहरीनच्या गृह मंत्रालयानेही कंपनीच्या …
Read More » -
6 April
बस्तरची नवी पहाट: एका संघर्षाची यशोगाथा
‘बस्तर फायटर्स’: मातीतील सुपुत्रांचा लढा बस्तरचा 42 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग केरळ राज्यापेक्षाही मोठा आहे. घनदाट जंगले, डोंगरदऱ्या आणि नद्यांनी व्यापलेल्या या दुर्गम भागात बाहेरील दलांना काम करणे सुरुवातीला अत्यंत आव्हानात्मक होते. यावर उपाय म्हणून आम्ही ‘डीआरजी’ (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) आणि ‘बस्तर फायटर्स’ या दलांची उभारणी केली. यात 100 टक्के स्थानिक तरुणांची भरती करण्यात आली. या जवानांना इथल्या भौगोलिक परिस्थितीची …
Read More » -
6 April
सायबरस्पेस: आधुनिक अदृश्य रणक्षेत्र
आजच्या काळात युद्धाचे स्वरूप केवळ सीमा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. डिजिटल रुपात आता एक नवीन आघाडी उघडली गेली असून ती अदृश्य असूनही सातत्याने सक्रिय आहे. या युद्धामध्ये गोळ्यांचा आवाज येत नाही, परंतु त्याचे परिणाम तितकेच विनाशकारी असतात. आता कोणताही देश सीमा ओलांडल्याशिवाय शत्रूची अर्थव्यवस्था, ऊर्जा व्यवस्था किंवा दळणवळण यंत्रणेला थेट लक्ष्य करू शकतो. आधुनिक युद्ध आता दोन समांतर …
Read More »
March, 2026
-
29 March
‘हेराफेरी-3’चे भवितव्य टांगणीला
हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपट मालिकेच्या तिसऱ्या भागावरून सध्या मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. चित्रपट निर्माते विजय कुमार यांनी या मालिकेच्या बौद्धिक संपदा अधिकारांवर आपला पूर्णतः हक्क असल्याचे सांगत निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘हेरा फेरी’ या फ्रँचायझीचे सर्व अधिकार त्यांच्याकडेच आहेत. या मालिकेचा …
Read More » -
29 March
सिनेसृष्टीला ‘संजीवनी’ देणारा ‘धुरंधर’
हिंदी चित्रपटसृष्टी गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याच्या आव्हानाचा सामना निकराने करत आहे. जुन्याच सूत्रांवर आधारित चित्रपट आणि थंडावलेला प्रतिसाद यामुळे 2026 च्या आर्थिक वर्षाचा चौथा तिमाही काळ काहीसा चिंतेत होता. अशा परिस्थितीत दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या भागाप्रमाणेच या सिक्वेलनेही सुपरडुपर हिटच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला. परिणामी, संपूर्ण …
Read More » -
29 March
अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या घातक सवयी
अँड्रॉइड फोन गेल्या दोन दशकांपासून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, तंत्रज्ञान कितीही पुढारले असले तरी, सुरुवातीच्या काळातील काही चुकीच्या सवयी आणि गैरसमज आजही वापरकर्त्यांमध्ये कायम आहेत. संगणकाप्रमाणे फोन वापरण्याच्या नादात आपण नकळतपणे आपल्या महागड्या उपकरणाचे आणि वैयक्तिक माहितीचे नुकसान करत असतो. टास्क किलर ॲप्सचा अनावश्यक वापर अनेक वापरकर्त्यांना असे वाटते की पार्श्वभूमीवर (बॅकग्राउंड) सुरू असलेले ॲप्स वारंवार बंद …
Read More » -
29 March
जपा त्वचेवरचे मायक्रोबायोम
निरोगी आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यासाठी आपण स्क्रबिंग, साबण, लोशन आणि विविध प्रकारची उत्पादनं वापरत असतो. पण त्वचा म्हणजे केवळ एक आवरण नाही, तर ती एक सजीव यंत्रणा आहे आणि तिच्यावर जिवाणूंचे (बॅक्टेरिया) एक स्वतंत्र जग वसलेले आहे. आपल्या आतड्यांत असतात असे सूक्ष्म जीव असतात, तसेच ते त्वचेवरही असतात. हे मायक्रोबायोम (सूक्ष्मजीवजगत) त्वचेचे नैसर्गिक रक्षण करते. यामध्ये बरेच ’गुड बॅक्टेरिया’ असतात …
Read More » -
29 March
आरोग्यदायी चक्रफूल
भारतीय आहार आणि विविध मसाले यांचे हजारो वर्षांपासूनचे एक अतूट समीकरणच आहे. हे मसाले अन्नाची केवळ चवच वाढवतात असे नाही तर ते आरोग्याला विविध प्रकारे सहाय्यही करीत असतात. आधुनिक विज्ञानानेही अशा अनेक मसाल्यांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. त्यामध्ये तीन हजार वर्षांपासून भारतीय आहारात असलेला एक मसाला म्हणजे स्टार ॲनिज किंवा चक्र फूल. हा एक असा मसाला आहे जो तुमच्या जेवणाची …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







