लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

April, 2026

  • 12 April

    अझीम प्रेमजींच्या जीवनप्रवासातून काय शिकावे?

    भारतीय उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे अझीम प्रेमजी हे यशस्वी उद्योजक आणि तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ओळखले जातात. यापलीकडे जाऊन ते महादानशूर म्हणूनही जगाला ते सुपरचित आहेत.आजच्या स्पर्धात्मक, वेगवान आणि अनेकदा गोंधळलेल्या जगात तरुणांनी नेमकी कोणती दिशा घ्यावी, याचे सूक्ष्म पण प्रभावी उत्तर त्यांच्या विचारांत सापडते. यशाची व्याख्या आज बहुधा पैशात, पदात किंवा प्रसिद्धीत मोजली जाते; मात्र प्रेमजी यांचा …

    Read More »
  • 12 April

    मुलांना क्रीम बिस्किट देताय ?

    आपल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणीत हमखास असणारी क्रीम बिस्किट ही त्याकाळाप्रमाणे कधी तरी खावयाची गोष्ट न राहता आजच्या पिढीतील कित्येक मुलांसाठी तो रोजचा आहारघटक बनला आहे. पण ज्या क्रीमवर इतकं प्रेम केलं जातं ते खरोखरीच दुधापासून बनवलेले असते का, याची खातरजमा किती जण करतात? सध्या सोशल मिडियावर एक व्हायरल व्हिडिओ फिरत असून त्यामध्ये या तथाकथित ‌‘क्रीम‌’ विषयी आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी समोर …

    Read More »
  • 12 April

    डिटोक्टिव्ह माश्या

    प्रथमग्रासे मक्षिकापातः म्हणजे पहिल्याच घासात माशी पडणं. एखाद्या कामात सुरुवातीलाच विघ्न येणं. ‌‘माशी शिंकणं‌’ या वाक्‌‍प्रचाराचा अर्थही जवळजवळ तोच. माश्या मारत बसणं म्हणजे निरुद्योगी बसून राहणं. ज्याच्या तोंडावरची माशीही उठत नाही, तो प्रचंड आळशी किंवा मंद. चांदोमामाला तूप रोटी खायला बोलवावं, तर तुपात नेमकी माशी पडते आणि चांदोबा उपाशी राहतो. एकंदरीत माशीविषयी चांगलं मत असणारा माणूस सापडणं अवघड. का सापडावा? …

    Read More »
  • 12 April

    शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम

    आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. आजीच्या शाश्वत जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन मान्याने ‌‘ग्रँडमाज्‌‍ ग्रीन वीव्ह‌’ नावाचा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे आतापर्यंत सुमारे 1.2 टन कापडी कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून वाचवण्यात तिला यश आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मान्याच्या आजीचे, व्ही. रुद्रम्मा यांचे निधन झाले. आजीच्या …

    Read More »
  • 12 April

    नवी आव्हाने

    निवडणुकीवर आधारित लोकशाहीत प्रतिनिधित्वाचा मूलभूत सिद्धांत हा लोकसंख्येच्या प्रमाणबद्धतेवर अवलंबून असतो. ‌‘एक व्यक्ती, एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य‌’ हे या व्यवस्थेचे मुख्य सूत्र आहे. मात्र, आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा जागांच्या परिसीमनावरून (डीलिमिटेशन) निर्माण झालेला वाद हा केवळ संख्याशास्त्राचा नसून तो राजकीय अस्तित्व आणि प्रादेशिक अस्मितेचा बनला आहे. विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये या प्रक्रियेबाबत मोठी साशंकता आणि अस्वस्थता …

    Read More »
  • 12 April

    डिजिटल दहशतीचे नवे आव्हान आणि तपासातील त्रुटी

    देशभरातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये, सरकारी इमारती आणि सार्वजनिक ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचे वाढते सत्र ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या उरलेली नाही, तर ती राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर तांत्रिक आव्हान बनली आहे. ई-मेल किंवा समाजमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या या धमक्यांमुळे जनमानसात घबराट पसरतेच, शिवाय सुरक्षा यंत्रणांचा अमूल्य वेळ आणि संसाधनेही मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतात. अलीकडेच चंदीगडमधील शाळा आणि सरकारी इमारतींना …

    Read More »
  • 12 April

    युद्धविरामानंतरही हल्ले

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होऊ शकणारे संभाव्य हल्ले आणि बॉम्बहल्ले सध्या दोन आठवड्यांंसाठी स्थगित करण्यात आले असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हा दोन्ही बाजूंनी लागू होणारा युद्धविराम (सीजफायर) असेल. म्हणजेच या कालावधीत ना अमेरिका हल्ला करेल, ना इराण कोणतीही आक्रमक कारवाई करेल. असले तरीही बुधवारी इराणच्या लवना बेटावरील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर आणि इराणने कुवेतमध्ये …

    Read More »
  • 12 April

    आखातात शांतता कधी नांदणार?

    अमेरिकेच्या या कोलांटउड्या आणि इस्राईलची युद्धखोरी लक्षात आल्यानंतर इराणने तात्काळ हार्मुझची सामुद्रधनी पुन्हा बंद केली. हा युद्धविराम म्हणजे युद्धाचा शेवट नाही. आमचे हात अजूनही शस्त्रांवर आहेत, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे हा युद्धविराम खरोखरच शांततेचा मार्ग प्रशस्त करणार की पुन्हा एकदा संघर्षाला आमंत्रण देणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे दोन्ही देशांच्या पुढील पावलांवर अवलंबून …

    Read More »
  • 12 April

    ‌‘टेराफॅब‌’ची धूम

    जगप्रसिद्ध अब्जाधिश आणि ‌‘टेस्लाकार‌’ एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश तंत्रज्ञान आणि प्रगत संगणनशक्ती यांचा संगम घडवून आणणाऱ्या एका अत्यंत मोठ्या औद्योगिक उपक्रमाची कल्पना त्यांनी मांडली आहे. या उपक्रमाचे नाव आहे ‌‘टेराफॅब.‌’ जगातील सर्वांत मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून या संकल्पनेची चर्चा सुरू आहे.भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, स्वयंचलित रोबोटस्‌‍, उपग्रह नेटवर्क आणि अवकाशाधारित संगणकीय व्यवस्था यांसाठी लागणाऱ्या प्रचंड प्रमाणातील …

    Read More »
  • 6 April

    इराणचा ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगलवर हल्ला

    जोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी जागतिक जहाजांच्या वाहतुकीसाठी पुन्हा उघडली जात नाही आणि ती ‌‘मुक्त आणि सुरक्षित‌’ राहत नाही, तोपर्यंत अमेरिका युद्धविरामाचा विचार करणार नाही, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले असताना इराणने बुधवारी रात्री बहरीनमधील अमेरिकन कंपनी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या डेटा सेंटरवर हल्ला केला. फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्‌‍यानंतर त्या ठिकाणी आग लागली. यापूर्वी, बहरीनच्या गृह मंत्रालयानेही कंपनीच्या …

    Read More »