लेख-समिक्षण

करीना आणि पृथ्वीराजचा ‌‘दायरा‌’

करीना कपूर खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‌‘दायरा‌’ या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 18 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. ‌‘मुल्क‌’, ‌‘आर्टिकल 15‌’ आणि ‌‘थप्पड‌’ यांसारख्या सामाजिक विषयांवर आधारित आणि विचार करायला लावणाऱ्या चित्रपटांसाठी अनुभव सिन्हा ओळखले जातात. त्यामुळे ‌‘दायरा‌’ हा चित्रपट देखील एका संवेदनशील आणि गंभीर विषयावर भाष्य करणारा थरारक ड्रामा असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सप्टेंबरया तिसऱ्या आठवड्यात गणेशोत्सवाच्या सांगते नंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
– वेदिका कुलकर्णी

Check Also

‌‘बंटवारा‌’साठी आमीरचा पुढाकार

आमिर खान, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या बहुप्रतीक्षित ‌‘लाहोर 1947‌’ या चित्रपटाच्या शीर्षकात …