प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की त्याने आपल्या करिअरमध्ये अकल्पनीय उंची गाठावी, पण बहुतांश तरुण हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. ते मेहनत आणि योग्य दिशेने काम करण्याच्या बाबतीत अनेकदा मागे पडतात. अनेकदा तर प्रतिभावान व स्मार्ट तरुणसुद्धा योग्य संधी गमावतात. अखेर या समस्येपासून वाचण्याचा मार्ग काय आहे? करिअर तज्ज्ञांच्या मते जर ८० टक्के विरुद्ध २० टक्के या फॉर्म्युल्यानुसार चालले गेले, …
Read More »TimeLine Layout
November, 2025
-
9 November
दागिन्यांचे लेअरींग करताना…
स्टायलिश दिसण्यासाठी फक्त आउटफिटच नव्हे तर दागिन्यांवरही तितकंच लक्ष देणे गरजेचे असते. दागिन्यांचा साज चढवताना ज्वेलरी लेयरिंग हा एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. अगदी साध्या कपड्यांनाही ही स्टाइल एक नवीन ट्विस्ट देऊन, तुमच्या पर्सनॅलिटीला आकर्षक बनवते. पण हे लेयरींग अधिक आकर्षक दिसण्यासाठी काही टिप्स नक्कीच कामी येतील. एस्टेटमेंट पीस निवडा ः लेयरिंग करताना एक असा दागिना निवडा जो सर्वांचं लक्ष …
Read More » -
9 November
बटू ग्रहावर बर्फाच्छादन
प्लूटोला एकेकाळी आपल्या ग्रहमालिकेत एक ग्रह म्हणून स्थान होते. मात्र, काही वर्षांपूर्वीच खगोलशास्त्रज्ञांनी त्याला ‘खुजा, बटू ग्रह’ (द्वार्फ प्लॅनेट) ठरवून ग्रहमालिकेतून बाहेर काढले. अर्थात, तरीही त्याच्याविषयीचे कुतूहल शमलेले नाही. प्लूटोबाबत सातत्याने संशोधने होत असतात. प्लूटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे नासाच्या न्यू होरायझन्स यानाने पाठवलेली असून, त्यात बर्फाळ बटू ग्रहावर निळे आकाश दिसत आहे. प्लूटोच्या पृष्ठभागावर बर्फ दिसत आहे. कोलोरॅडोतील साऊथवेस्ट …
Read More » -
9 November
महिला क्रिकेटसंघाला लाभलेले ‘अमोल’ रत्न
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या अमोल मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून जागतिक मंचावर भारतीय क्रिकेटचा डंका वाजवला आहे. ऑटोबर २०२३ मध्ये बीसीसीआयने अमोल मजूमदार यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीमुळे संघाने तांत्रिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर विलक्षण प्रगती साधली. अमोल यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण न …
Read More » -
9 November
बिगुल वाजला; पण…
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सर्व ठिकाणी २ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे वगैरे तारखाही जाहीर केल्या गेल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यात केवळ नगरपालिका किंवा नगरपरिषदा यांच्या निवडणुकाच प्रलंबित नाहीत तर, जिल्हा …
Read More » -
9 November
विजय एका स्वप्नाचा
जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं खेळणं म्हणजे वडिलांची क्रिकेटची बॅट होती. ती बॅट माझ्यापेक्षा उंच, जड आणि मला हाताळायलाही अवघड वाटायची. पण तीच बॅट माझं पहिलं स्वप्न बनली. मला अजून आठवतं, मी अंगणात उभी राहून ती बॅट दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करायचे आणि वडिलांना म्हणायचे की मी सुद्धा भारतासाठी खेळणार आहे. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की …
Read More » -
9 November
अखेर नगरपालिकांची निवडणूक घोषित
राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ४ नोव्हेंबर रोजी २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य …
Read More » -
9 November
उत्कंठा शिगेला
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहा नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता दुसर्या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांतच बिहारच्या जनतेचा कौल कळणार आहे. पहिल्या टप्प्यात १३१४ उमेदवारांसाठी बिहारी जनतेने मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातील निकालातूनच बिेहारचा मुख्यमंत्री ठरणार आहे. उमेदवारांची संख्या आणि मतदान याचे आकलन …
Read More » -
9 November
न्यायविलंबाचे आव्हान
आरोप निश्चिती ही न्यायाची पहिली पायरी आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहणार्या खटल्यामुळे आरोपींना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षेकच्चे कैदी म्हणून तुरुंगात राहणार्यांची स्थिती तर या प्रलंबित प्रकरणांमुळे आणखीच बिकट होते. भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार देशातील तुरुंगात ७६ टक्के कैदी कच्चे आहेत. ‘जस कॉर्पस लॉ जर्नल’मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, कच्च्या कैद्यांची संख्या वाढण्यामागचे कारण म्हणजे अपुरी कायदेशीर मदत …
Read More » -
2 November
आलिया झळकणार ‘चामुंडा’मध्ये
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एकामागून एक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या दोन भव्य चित्रपटांचे शूटिंग ती सध्या करत आहे. मात्र, या दोन्ही प्रोजेट्सच्या दरम्यान आलिया आता आणखी एका मोठ्या चित्रपटाशी जोडली जाऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. असं सांगितलं जातंय की, स्पाय यूनिव्हर्सनंतर आलिया आता …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







