ळांच्या शिक्षणावर आणि त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे हे प्रत्येक पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य असते. शाळेमध्ये मुलांच्या कामगिरीची योग्य माहिती मिळवण्यासाठी पालक-शिक्षक बैठक हा एक उत्तम पर्याय असतो. मात्र, अनेकदा पालकांना हे समजत नाही की शिक्षकांना कोणते प्रश्न विचारावेत जेणेकरून त्यांच्या मुलाच्या अभ्यास आणि वर्तनाची संपूर्ण माहिती मिळू शकेल. माझ्या मुलाची अभ्यासातील कामगिरी कशी आहे? या प्रश्नामुळे तुम्हाला हे समजू शकेल की …
Read More »TimeLine Layout
September, 2025
-
6 September
पुरातही तग धरणार बार्ली
जागतिक तपमानवाढीमुळे पृथ्वीवरील हवामान बदलत आहे, त्यामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणार्या अन्नधान्याच्या प्रजाती तयार करण्याचे काम सुरू आहे. अलीकडेच संशोधकांनी पुराच्या पाण्यातही वाढू शकेल, अशी बार्ली म्हणजे जवाची प्रजात तयार केली आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी यापूर्वी कमी ऑक्सिजनवर जगणारी वनस्पतींची प्रजात तयार केली होती. तीही प्रतिकूल …
Read More » -
6 September
प्रामाणिकपणाचा असाही आदर्श
सिंगापूरमधील एका मोठ्या घरात सिसिल ब्राउन नावाचे इंग्रज डॉटर एकटे राहत होते. त्यांनी अनेक प्राणी आणि पक्षी पाळले होते आणि त्यांच्यावर ते लहान मुलांसारखे प्रेम करत होते. त्यांच्या शेजारीच मिग नावाचा चौदा वर्षांचा गरीब मुलगा एकटा राहत होता. तो डॉटर ब्राउन यांचे कपडे धुत असे आणि इस्त्री करत असे. दरम्यान इंग्रज आणि जपानी यांच्यात युद्ध सुरू झाले. युद्धाच्या काळात मिग …
Read More » -
6 September
औद्योगिक क्षेत्रात भरारी घ्यायची तर…
भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्या दिशेने खर्या अर्थाने वाटचाल करायची असेल, तर केवळ वाढीचे टक्केवारी दाखवणारे आकडे किंवा अल्पकालीन उद्दिष्टे पुरेशी ठरणार नाहीत. औद्योगिक उत्पादनात शाश्वत गती निर्माण करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील आणि नव्या शयता उघडाव्या लागतील. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन ३.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे गेल्या चार …
Read More » -
6 September
सेमीकंडक्टर क्रांतीचे अवकाश
भारताने सेमीकंडटर क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. इस्रोच्या सेमीकंडटर लॅबमध्ये भारताचा पहिला पूर्णतः स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर विकसित करण्यात यश आले आहे. ‘मेड इन इंडिया’ या पहिल्या चिपचे उत्पादन गुजरातमधील साणंद येथील पायलट प्लांटमध्ये सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत तब्बल १८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या दहा सेमीकंडटर प्रकल्पांवर देशात काम सुरू आहे. त्यापैकी एक प्रकल्प पंजाबमधील मोहाली येथे …
Read More » -
6 September
मराठ्यांना आरक्षण, ओबीसींना उपसमिती
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. यानंतर बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही एका उपसमितीची स्थापना करण्यात आली. या उपसमितीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या उपसमितीमध्ये सहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून ही समिती ओबीसी समाजच्या प्रश्नांसंदर्भात उपाययोजना सुचवण्याचे काम करणार आहे. महसूलमंत्री …
Read More » -
6 September
करुया स्वदेशीचा जागर
रशिया-युक्रेन संघर्ष, हमास-इस्राईल संघर्ष, ट्रम्प यांचे शुल्क धोरण आणि चीनच्या भूमिकेवरून वाटणारी अनिश्चितता पाहता भारताने आता स्वदेशी धोरणावर व्यापक विचार करायला हवा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार्या भारताने आता स्वदेशीची मात्रा बहुतांश क्षेत्रावर लागू करावी, जेणेकरून देशहित साधले जाईलच, त्याचवेळी जगाला पर्यायी देशही मिळेल. आतापर्यतची भारताची प्रतिमा आणि भूमिका पाहता वसुधैव कुटुम्बकम अशीच राहिली असून ती जागतिक बाजारातील …
Read More » -
6 September
वेध ‘समुद्रयान मिशन’चा
भारतीय अवकाश संशोधनाने जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान, मंगळयान आणि गगनयानासारख्या प्रकल्पांमुळे भारत आज अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात अव्वल ठरला आहे. पण आता केवळ आकाशच नव्हे तर अथांग महासागराकडेही भारताचे लक्ष वेधले गेले आहे. ‘समुद्रयान मिशन’ही त्या दृष्टीने भारताची एक धाडसी झेप आहे. ६००० मीटर खोलीपर्यंत मानवाला समुद्राच्या तळाशी नेणारा हा प्रकल्प केवळ वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित नाही, तर देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्था, …
Read More »
August, 2025
-
31 August
संज्ाूबाबाचा दिलखुलास अंदाज
नव्वदच्या दशकातील रुपेरी पडद्यावर गाणे नृत्याचा जलवा असताना, अभिनेत्री सोमी अलीसाठी तो का कठीण होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंदोलन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान संजय दत्तसोबतचा अनुभव सांगतांना सोमी म्हणते, ‘माझ्याकडे कधीच नृत्याचे औपचारिक प्रशिक्षण नव्हते. भारतातील अनेक कलाकारांना लहानपणापासून नृत्य शिकवले जाते, कारण ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण माझ्यासाठी तो मोठा कस होता. सरोज खानसारख्या कोरिओग्राफरच माझ्याकडून नृत्य करवून …
Read More » -
31 August
रुपेरी पडद्यावरील गणेशोत्सव
घराघरांमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले की वातावरण मांगल्यदायी आणि ऊर्जादायी बनून जाते. गणपती ही बुद्धीची देवता आहे, तशीच ती कलेची देवता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा संदर्भ आहे आणि आज हा उत्सव सबंध देशभरात नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. त्यामुळे सिनेकलाकृतींमध्येही गणेशोत्सवाचे प्रतिबिंब उमटले आहे. वास्तव, सत्या, अग्निपथ, डॉन, शोर इन द सिटी, माय फ्रेंड गणेशा यांसारख्या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







