लेख-समिक्षण
  • 21 jun 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4209

TimeLine Layout

June, 2025

  • 1 June

    रेफ्रिजरेट वापराचे तंत्र

    रेफ्रिजरेट किंवा फ्रिजचा योग्य वापर केल्याने तो दीर्घकाळ टिकतो आणि अन्नाचा ताजेपणा कायम राहतो. काही तांत्रिक गोष्टींचे पालन केल्यास फ्रिज अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. १. फ्रिजचे योग्य तापमान सेटिंग: फ्रिजचा मुख्य भाग: १ ते ४ अंश सेल्सियस दरम्यान तापमान ठेवा. फ्रीजर विभाग: -१८ अंश किंवा त्याहून कमी तापमानावर ठेवा. विविध खाद्यपदार्थांसाठी: दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, आणि उरलेले अन्न योग्य तापमानात …

    Read More »
  • 1 June

    शास्त्रीय संगीत मेंदूस्नेही

    संगीत ही केवळ एक कला नाही. त्यामध्ये त्यापेक्षाही अधिक काही तरी निश्चितच आहे. आपल्याकडे नादब्रह्म ही संकल्पना आहे. सृष्टीचा प्रारंभच ओंकार नामक नाद शब्दाने झाला, असे आपल्याकडे मानले जाते. भारतीय अभिजात संगीताचा उगमच सामवेदातून झालेला आहे. अलीकडच्या काळात संगीतकलेकडे एक थेरपी म्हणूनही पाहिले जाते. भारतातील असो किंवा परदेशातील, मनाला सुखावणारे अभिजात किंवा शास्त्रीय संगीत आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. दररोज वीस मिनिटे …

    Read More »
  • 1 June

    एका चहावाल्याची प्रेरणादायी कहाणी

    बेरोजगार किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही गोष्ट थक्क करणारी आहे. बेंगळुरूतील एका चहावाल्याची मासिक कमाई तब्बल तीन लाख रुपये आहे! पण खरं आश्चर्य त्याचं कमावणं नसून, त्याचं प्रत्येक दिवस आनंदाने जगणं आहे. मुनिस्वामी डॅनियल, एक चौथीतून शाळा सोडलेला तरुण, पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करत असे. आज तो भारतातील सगळ्यांत लोकप्रिय पेय असलेला चहा विकून ’लखपती’ झाला आहे. त्याने …

    Read More »
  • 1 June

    ‘टीम इंडिया’ गरजेचीच

    जून महिन्यामध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय क्रिकेट संघाची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर करत असतानाच राजधानी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाची बैठक होऊन या बैठकीत पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यांनी आणि केंद्र सरकारने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्व राज्यांना केंद्र सरकारच्या साथीने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करण्याचे आवाहन केले असले, तरी …

    Read More »
  • 1 June

    बाटलीतलं भूत

    भस्मासुराला वर देणं आत्मघातकी ठरतं, हे आपल्याला पुराणकथेमधून समजलेलं आहे. परंतु तरीही आधुनिक काळात आपण असंख्य भस्मासुर जन्माला घातले; पोसले. नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणं म्हणजे मानवजातीच्या कल्याणाला विरोध करणं, ही आधुनिक अंधश्रद्धा थोडा वेळ दूर ठेवून विचार करून काही प्रश्न आता आपल्याला पडायलाच हवेत. त्यातील महत्त्वाचा प्रश्न असा, की आधुनिक तंत्रज्ञानाने खरोखर अखिल मानवजातीचं कल्याण होतंय की मूठभरांचं उखळ पांढरं …

    Read More »
  • 1 June

    राज्यात अतिवृष्टीने २१ जणांचा मृत्यू

    मुंबईत सोमवारला दिवसभर पडलेला मुसळधार पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे दाणादाण उडाली असताना या वाईट हवामानाचा फटका मुंबई-अमरावती फ्लाईटला बसला. त्याच वेळी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने केवळ पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये पाण्यात बुडून, वीज कोसळून, भिंत पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय सुमारे २२ प्राण्यांचाही पावसामुळे मृत्यू झाला आहे. पावसाने निर्माण झालेल्या …

    Read More »
  • 1 June

    तिसर्‍या स्थानाकडे जाताना…

    जगातील आघाडीच्या पाच प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांत भारताचा समावेश झाला आहे. आता तो तिसर्‍या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळतो का? हे देखील पाहिले पाहिजे.यासाठी प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. तरच ‘विकसीत भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. यादृष्टीने सरकारने आणि नागरिकांनी आणखी व्यापकपणे काम करणे महत्त्वाचे आहे. १९९० च्या आसपास भारत आणि चीनच्या …

    Read More »
  • 1 June

    रणरागिणी रणांगणात…

    शुक्रवार,३० मे,२०२५ हा भारतीय लष्कर आणि त्याचे खडकवासलामधील मूलभूत गुरुकुल म्हणजेच एनडीए या दोघांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी एकूण १७ महिला कॅडेटसच्या पहिल्या बॅचने, ३०० समकक्ष पुरुष कॅडेट्सबरोबर एनडीएच्या विस्तीर्ण परेड ग्राउंडमधून मार्च करत आपला अंतिम पग मेन ब्लॉकमध्ये टाकला. एनडीएसाठी हा खूप अभिमानास्पद, ऐतिहासिक क्षण आहे. या महिला कॅडेट्सनी एनडीएचा झेंडा उंच फडकवला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं …

    Read More »

May, 2025

  • 25 May

    बोले तो एकदम झकास

    सध्या शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण काम करणार असल्याची बातमी झळकली. आता या चित्रपटात अनिल कपूरही काम करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सिध्दार्थ आनंदचा ‘किंग’ अनेक अर्थाने वेगळा चित्रपट ठरणार आहे. यात शाहरुख सोबत त्याची कन्या सुहानासुध्दा दिसणार आहे. अभिषेक बच्चन आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अरशद …

    Read More »
  • 25 May

    ओटीटीचं बदलतं स्वरूप

    मनोरंजनाचे नवीन माध्यम असलेल्या ओटीटीबाबत अशी प्रतिमा तयार झाली होती की, या प्लॅटफॉर्मवर केवळ गुन्हेगारी कथाच दाखवल्या जातात. काही वर्षांपर्यंत ही बाब खरेही वाटली. मात्र, जेव्हा प्रेक्षक कंटाळू लागले, तेव्हा यात बदल घडवून आणला गेला. आता ओटीटीवर सामाजिक पार्श्वभूमीवर तयार झालेल्या कथा आणि नातेसंबंधांचं गुंतागुंतीचं जाळं अधिक दाखवलं जात आहे. प्रेक्षकांना ओटीटीचं हे नवं रूप आवडू लागलं आहे. ‘राजश्री’ची पहिली …

    Read More »