जीमेल हे भारतातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा प्लॅटफॉर्म आहे. आज स्मार्टफोन वापरणार्या जवळपास प्रत्येकाकडे जीमेलचे अकौंट आहे. काही जण १०-१५ वर्षांपासून जी-मेल वापरत आहेत. काही वेळा असा प्रसंग येतो की, आपल्याला खूप वर्षांपूर्वीचा एखादा मेल शोधायचा असतो. यासाठी तुम्ही सतत जुने मेल्स स्क्रोल करत बसता, पण तो सापडत नाही. खूप वेळ यात निघून जातो. पण जीमेलची एक खास ‘सिक्रेट ट्रिक’ वापरल्यास अनेक वर्षांपूर्वीचा मेलही काही सेकंदांत शोधू शकता.
जीमेलवर जुने ईमेल शोधण्यासाठी तुम्हाला आता प्रत्येक मेल स्क्रोल करत बसण्याची गरज नाही. फक्त एक छोटीशी कमांड सर्च बारमध्ये टाका, आणि तुमचा हवा तो जुना ईमेल तुमच्या स्क्रीनवर हजर होईल.
यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये जीमेल अॅप उघडा.
वरच्या बाजूला असलेल्या सर्च बार वर टॅप करा.
आता येथे एक खास कमांड टाका —
उदाहरणार्थ, जर तुम्हाला ५ वर्षांपूर्वीचा मेल पाहिजे असेल तर ‘ओल्डर अंडरस्कोअर (चिन्ह) दॅन ५ ईअर्स’ ही कमांड लिहा आणि सर्च करा. तुम्हाला जितका जुना मेल पाहिजे असेल, त्या वर्षांच्या आकड्यानुसार ५ ईअर्सऐवजी ३,७,९ असे लिहू शकता. यानंतर सर्च केल्यानंतर लगेचच त्या वर्षांपूर्वीचे सगळे मेल्स तुमच्यासमोर दिसतील.
त्यामुळे जीमेलमध्ये जुने ईमेल शोधण्यासाठी आता वेळ वाया घालवायची गरज नाही.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र