तोंड धुण्यासाठी साधा पाणीपुरताच पुरेसा नाही, कारण आपल्या त्वचेवर दिवसभर धूळ, घाम, तेल आणि प्रदूषणाचे थर बसतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करणे गरजेचे आहे.
फेसवॉशचे महत्त्व फेसवॉश हा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही, तर तो त्वचेची खोलवर निगा राखतो. योग्य फेसवॉशमुळे — चेहर्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते.
मुरूमांची समस्या नियंत्रणात राहते. त्वचा तजेलदार आणि हायड्रेटेड राहते. रक्ताभिसरण सुधारुन चेहर्यावर नैसर्गिक चमक येते.फेसवॉशचा योग्य वापर कसा करावा?
चेहरा धुण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. चेहर्यावर कोमट पाणी शिंपडून त्वचा ओलसर करा. थोडेसे फेसवॉश हातावर घेऊन हलया हातांनी चेहर्यावर मसाज करा. विशेषतः नाक, कपाळ आणि हनुवटी या भागांवर जास्त लक्ष द्या, कारण इथे तेलकटपणा अधिक असतो.
साधारण ३०-४५ सेकंद हलया वर्तुळाकार हालचालींनी मसाज करून नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. टॉवेलने चेहरा अलगद पुसा आणि मॉइश्चरायझर लावा.
फेसवॉश निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?
फेसवॉशची निवड त्वचेच्या प्रकारानुसार करावी. कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग फेसवॉश वापरा, ज्यामध्ये अॅलोवेरा, हायल्युरोनिक अॅसिड, ग्लिसरीन यांसारखे घटक असतील.
तेलकट त्वचेसाठी सालीसिलिक अॅसिड किंवा चारकोलयुक्त फेसवॉश निवडा, जे तेलकटपणा नियंत्रित ठेवतात. संवेदनशील त्वचेसाठी केमिकल फ्री, सौम्य घटक असलेला फेसवॉश निवडा.
मिश्र त्वचेसाठी जेल-बेस्ड फेसवॉश हा उत्तम पर्याय असतो.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र