लेख-समिक्षण

कार्तिकचे क्रोएशियामधील वेळापत्रक पूर्ण

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. गेला महिनाभर क्रोएशियात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. यात त्याने चित्रपटाची स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्ससोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चित्रपटाचे क्रोएशियातील वेळापत्रक पूर्ण झाले आहे. गणपती बाप्पा मोरया’. या चित्रपटात अनन्या पांडे नायिकेच्या मुख्य भूमिकेत आहे. समीर विङंस दिग्दर्शित हा चित्रपट धर्मा प्रॉडशन आणि नम: पिचर्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे. कार्तिकशिवाय अनन्यानेही इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘क्रोएशियामध्ये खूप मजा आली’. हा चित्रपट पुढील वर्षी व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने १३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन दोघेही यापूर्वी ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात झळकले आहेत. – विधिषा देशपांडे

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …