स्वच्छ आणि चकाकणारे स्वयंपाक घर हे केवळ घराचे सौंदर्यच खुलवते असे नाही; तर ते त्या घरातील माणसांच्या, खास करुन महिलेच्या शिस्तीचे, टापटीपपणाचे निदर्शक असते. काळवंडलेल्या गाळण्यावरुन तुमच्या एकंदर शिस्तीचे मूल्यमापन केले जाते. हे टाळण्यासाठी काही सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या टिप्स वापरून तुम्ही तुमचे गाळणे चकाचक ठेवू शकता. गरम पाणी आणि डिशवॉश ः गाळणे थोडावेळ गरम पाण्यात भिजत ठेवा. यामुळे त्यावर साठलेली चिकट मळ मऊ होतो. नंतर डिशवॉश लिक्विड(भांडी धुण्याचा लिक्विड) आणि ब्रशचा वापर करून हलक्या हाताने रगडा. यामुळे चहा पत्तीचे डाग आणि चिकटपणा निघून जातो.
बेकिंग सोडा ः एक चमचा बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळा. गाळणे 15 मिनिटांसाठी या पाण्यात भिजत ठेवा. नंतर ब्रशने स्वच्छ करा. बेकिंग सोडा चिकटपणा, डाग आणि वास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
व्हिनेगर ः व्हिनेगर आणि पाणी एकास दोन या प्रमाणात घेऊन एक मिश्रण बनवा. आता गाळणे 20 मिनिटे या मिश्रणात भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. व्हिनेगर जिद्दी डाग आणि जीवाणू दूर करतो.
लिंबाचा रस ः लिंबाचा रस थेट गाळण्यावर लावा आणि 10 मिनिटे ठेवा. नंतर ब्रशने रगडून स्वच्छ करा. लिंबाचा रस नैसर्गिक डाग हटवणारा आहे.
उकळते पाणी ः पाणी उकळू लागल्यावर त्यात गाळणे 10 मिनिटांसाठी टाका. यामुळे कठीण डाग सैल होतात. नंतर ब्रशने स्वच्छ करा.
टूथपेस्ट ः टूथपेस्ट लावून हलक्या हाताने ब्रशने घासल्यास गाळण्याला चांगली चमक येते.
डिटर्जंट ः रात्री पाण्याच्या भांड्यात डिटर्जंट मिसळून गाळणे भिजत ठेवा. सकाळी ब्रशने घासून धुवा. यामुळे गाळणे काळसर होत नाही.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र