लेख-समिक्षण
  • 20 september 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

October, 2025

  • 26 October

    ‘असंभव’च्या रहस्यमय पोस्टरने वाढवली उत्सुकता

    टीझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलेल्या ‘असंभव’ या आगामी मराठी सस्पेन्स थ्रिलरच्या नव्या रहस्यमय पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेचे वण घेतले आहे. गडद लाल-काळ्या पार्श्वभूमी असलेले हे पोस्टर, नजरेतून जणू काही प्रश्न विचारत आहे की, ही कहाणी प्रेमाची आहे की सुडाची? सचित पाटील, मुता बर्वेआणि प्रिया बापट या तिघांचे भावदर्शी चेहरे, शांततेतली अस्वस्थता, आणि हलकं स्मित हे सगं गूढतेचे धागे …

    Read More »
  • 26 October

    वास्तववादी चित्रपटांची वानवा

    चित्रपट हे मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु मनोरंजनाचा अर्थ फक्त मन रमविणे, वेळ घालविणे इतकाच नसतो. प्रेमकथा, नाचगाणी आणि मारामारी यानंतर एखाद्या चित्रपटाचा सुखांत झाला की तेवढेच मनोरंजन असे होत नाही. जीवनाचे यथार्थ दर्शन, लोकांच्या वेदना, समाजातील सत्य आणि मानवी संघर्षाशी प्रेक्षकाला सामोरे नेणे हेही मनोरंजनाचे एक महत्वाचे अंग असते. सत्य दाखविणार्‍या चित्रपटांची कथानके म्हणूनच विशेष ठरतात, कारण …

    Read More »
  • 26 October

    समजून घ्या बिलिंग सायकल

    आजच्या काळात महिला केवळ घर सांभाळत नाहीत, तर आर्थिक निर्णयांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. खरेदी असो, शिक्षणाचा खर्च असो किंवा एखादं स्वप्न पूर्ण करायचं असो महिलांनी आता अर्थकारणावरही नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आहे. आज अनेक महिला क्रेडिट कार्डचाही वापर करताहेत. हे एक अतिशय उपयोगी साधन आहे. पण, याच्या चुकीच्या वापराने तोटा होण्याचीही शक्यता असते. क्रेडिट कार्डच्या सुयोग्य वापरामध्ये बिलिंग सायकल …

    Read More »
  • 26 October

    वक्तशीर दीपिका

    चित्रपटसृष्टीत दीपिका पदुकोण ही शिस्तप्रियतेसाठी ओळखली जाते. वेळेचं काटेकोर पालन, सेटवरचे वर्तन, ताणतणावातही शांत राहण्याची क्षमता ‡ हे सर्व तिच्या व्यावसायिक मूल्यांचे उदाहरण आहे. दीपिकाचे निवडलेले सिनेमे तिच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात. ‘छपाक’ या चित्रपटात तिने अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची भूमिका साकारली. पद्मावत, गोलियों की रासलीला, रामलीला, पिकू यांसारख्या चित्रपटांतून तिने स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवले; पण प्रत्येक भूमिकेत स्वतःचा आत्मसन्मान जपणारी …

    Read More »
  • 26 October

    फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव

    नोकरदार स्रियांसाठी दररोज दोन्ही जबाबदार्‍या सांभाळताना करावी लागणारी कसरत प्रचंड आव्हानात्मक असते. विशेषतः सध्या स्मार्टफोनमुळे ही कसरत अधिक तीव्र झाली आहे. फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव कधी कधी असे होते की आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की महत्त्वाचे कॉल देखील उचलणे आपल्याकडून राहून जाते. खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तो कॉल आपल्या जोडीदाराचा किंवा बॉसचा असतो. तुम्हीही अनेकदा …

    Read More »
  • 26 October

    ध्येयप्राप्तीसाठी डार्विनचा संदेश

    कोणतीही मोठी कलाकृती उभी राहिली किंवा आकाराला आली की लोक तिची प्रशंसा करतात. त्यातील गहन अर्थ शोधतात, तिच्या भव्यतेला सलाम करतात. पण बहुतेकदा त्या कलाकृतीच्या निर्मिती प्रक्रियच्या तळाशी जाऊन वेध घेत नाहीत. खरे म्हणजे तो वेध घेतला असता अत्यंत मोलाची सूत्रे आपल्याला मिळतात. चार्ल्स डार्विन यांच्या महान ग्रंथाची कहाणी अशीच मौलिक विचार देणारी आहे. चार्ल्स डार्विन यांनी आपल्या महान ग्रंथ …

    Read More »
  • 26 October

    ब्राह्मोसचा थरार

    पाकिस्तानचा प्रत्येक इंच आता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी त्या देशात कोठेही लपले तरी त्यांना टिपण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालवलेले ‘ऑपरेशन सिंदूर अभियान’ केवळ एक ट्रेलर आहे. हे अभियान संपविण्यात आलेले नाही. ते केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. कारण या अभियानाचा आतापर्यंतचा उद्देश सफल झालेला आहे …

    Read More »
  • 26 October

    रेड्डी सरकारला चपराक

    स्थानिक निवडणुकीवर लक्ष स्थानिक स्वराज निवडणुकीचे वेळापत्रक रेंगाळण्याबरोबरच आरक्षणाचा वाद आता राजकीय डावपेचाचा भाग ठरला. जातनिहाय सर्वेक्षण आणि सामाजिक न्याय देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या काँग्रेसला या निमित्ताने ओबीसीचे पाठबळ मिळवण्याची संधी मानली जात आहे. दुसरीकडे पराभवाच्या धयातून बीआरएस अजूनही सावरलेली नसताना या आदेशाचा आधार घेत रेड्डी सरकारवर हल्ला करण्याची संधी साधली जात आहे. यादरम्यान भाजप ओबीसीमध्ये मागास मुस्लिमांना सामील …

    Read More »
  • 26 October

    ६४८ कोटींचा आणखी निधी मंजूर

    राज्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील शेती, घरे, पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरूच असून राज्य सरकारकडून ६४८ कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापूर्वी, राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकर्‍यांसाठी ३१ हजार ६६५ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे राज्य सरकारने ६४८ कोटी रुपयांच्या वितरणाला …

    Read More »
  • 26 October

    महिलाहितैषी पाऊल

    कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्याचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच घेतला. काम करणार्‍या सर्व महिलांना दर महिन्याला एक दिवस पीरियड लीव मिळणार आहे. ही सुट्टी सरकारी कार्यालयाबरोबरच खासगी कंपनी, वस्त्रोद्योग, आयटी सेटर आणि मल्टीनॅशनल कंपन्यात काम करणार्‍या महिलांना मिळणार आहे. या निर्णयामागचा उद्देश महिलांच्या आरोग्यास प्राधान्य आणि कामाकाजाच्या ठिकाणी सुलभता देण्याचा आहे. भारताच्या काही राज्यांत पूर्वीपासूनच पेड पीरियड लीवची तरतूद …

    Read More »