आखातात अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष सात महिने पूर्ण होत आले तरी संपण्याचे नाव घेत नाही. उलट आता तो अधिक तीव्र बनताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका होईपर्यंत इराणयुद्ध संपणार नाही, अशी स्पष्टोक्ती दिल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या दरांनी शंभरी ओलांडल्यामुळे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तेलआयातदार असणाऱ्या भारतापुढील आव्हान अधिक बिकट झाले आहे. एप्रिल …
Read More »TimeLine Layout
September, 2026
-
13 September
पाऊस अपुरा, पण पुराचा विळखा!
देशाच्या मध्य आणि उत्तर भागात सध्या पावसाने विचित्र पेच निर्माण केला आहे. एका प्रदेशात नद्या पात्र सोडून वस्त्यांमध्ये शिरत आहेत, तर त्याच राज्याच्या दुसऱ्या भागात पावसाची तूट भरून निघालेली नाही. उत्तर प्रदेशात गंगा, यमुना, मंदाकिनी आणि घाघरा यांच्या वाढत्या पाणीपातळीने सुमारे 26 जिल्ह्यांना फटका बसला आहे. बिहारमध्ये गंगा, गंडक आणि कोसीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पाटण्यासह 14 जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट आहे. …
Read More » -
6 September
अल्लू अर्जुनचा ट्रिपल रोल
दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘राका’ या चित्रपटाची सध्या सिनेविश्वात प्रचंड चर्चा सुरू आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अल्लू अर्जुन एका अत्यंत वेगळ्या आणि भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, रश्मिका मंदाना आणि जान्हवी कपूर या आघाडीच्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता वेग आला …
Read More » -
6 September
रुपेरी पडद्यावरची कृष्णगीते
गोकुळाष्टमी आली की मंदिरांतील आरत्या, दहीहंडीचा जल्लोष आणि गोविंदांच्या आरोळ्यांबरोबरच मनात नकळत काही चित्रपटगीतेही जागी होतात. कृष्णाच्या बाललीला, राधा-कृष्णाचे प्रेम, भक्ती, खोडकरपणा आणि लोकउत्सव यांना हिंदी चित्रपटसृष्टीने इतक्या विविध रंगांत टिपले आहे की, ही गीते केवळ पडद्यापुरती राहिलेली नाहीत; ती लोकपरंपरेचाच एक भाग बनली आहेत.- सोनम परब हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासूनच भक्तिगीतांना विशेष स्थान होते. त्यात श्रीकृष्ण हा तर गीतकार, …
Read More » -
6 September
एआयच्या जगात व्हिडिओ एडिटर बनताना…
कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक व्यवसायांचे स्वरूप बदलले आहे. त्यात चित्रफित संपादनाचे (व्हिडिओ एडिटिंग) क्षेत्रही अपवाद नाही. काही वर्षांपूर्वी एखादी चित्रफीत तयार करण्यासाठी चित्रीकरण, संपादन, ध्वनिसंयोजन, रंगसुधारणा आणि अंतिम रूप देण्यासाठी स्वतंत्र व्यक्तींची गरज भासत असे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने यातील अनेक कामे काही मिनिटांत करून देतात. त्यामुळे ‘आता चित्रफित संपादकांची गरजच राहणार नाही’, असा समज अनेक तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. …
Read More » -
6 September
भुवयांची ठेवण हवी चेहऱ्याच्या आकारानुसार
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी भुवयांचा आकार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. भुवयांना दिलेला योग्य आकार चेहऱ्यावरील हावभाव अधिक स्पष्ट करतो. तज्ज्ञांच्या मते, जर आपण चेहऱ्याच्या रचनेनुसार भुवयांचा आकार निवडला, तर त्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ आणि उठावदार दिसण्यास मदत होते. मात्र, चुकीचा आकार निवडला गेला, तर संपूर्ण लूक बिघडू शकतो. ब्यूटी एक्स्पर्ट पूजा गोयल यांनी विविध फेसकटनुसार भुवयांचे कोणते प्रकार उठावदार दिसतात, यावर …
Read More » -
6 September
रक्तवाहिन्यांमधील ‘झोंबी’ चा धोका
एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, जसजसे वय वाढते तसतसे रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या ‘झोंबी झालेल्या’ पेशी मधुमेहासारख्या चयापचय विकारांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. या ‘झोंबी पेशींना’ नष्ट करणे, भविष्यातील उपचारांसाठी एक प्रभावी मार्ग असू शकते. सामान्यतः, पेशी जेव्हा तणावामुळे ‘जीर्ण’ होतात, तेव्हा त्या कायमस्वरूपी विभाजन करणे थांबवतात; परंतु शरीरात टिकून राहतात. या जीर्ण झालेल्या पेशींची काही उपयुक्त कार्येअसू शकतात; …
Read More » -
6 September
तंत्रज्ञानातून शेतीकडे..
शेतीतील आर्थिक अस्थिरता जवळून पाहत मोठे झालेले शशी कुमार यांनी आयुष्याची सुरुवात मात्र शेतीतून केली नाही. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शशी यांनी संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कारकीर्द घडवली. विप्रोमध्ये 13 वर्षे आणि एकूण 17 वर्षेतंत्रज्ञान उद्योगात काम केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कारकीर्द सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामागे एकच प्रश्न होताशेतकऱ्याला शेतीतून स्थिर आणि सन्मानजनक उत्पन्न कसे मिळेल? याच प्रश्नातून …
Read More » -
6 September
काटकसरीचे वास्तव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा सर्वांना काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. 2047 पर्यंत जर देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर काटकसरीच्या उपायांची गरज आहे. हा विषय त्यांनी पुन्हा एकदा समोर आणला आहे. यापूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सर्वोच्च पातळीवर असताना त्यांनी भारतीयांना बचत करण्याचा आणि काटकसर करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हाची परिस्थिती समजण्यासारखी …
Read More » -
6 September
महिला आरक्षण आणि परिसीमनाची कोंडी
संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी निगडित परिसीमनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावू शकते, अशी चर्चा आहे. सरकारकडून तसे संकेत दिले जात असतानाच काँग्रेससह विरोधी पक्षांनी परिसीमनाच्या प्रश्नावर आधी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली आहे. विशेष अधिवेशन प्रत्यक्षात बोलावले जाते की नाही, यापेक्षा महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणखी लांबणीवर पडणार नाही, याची …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







