पाकिस्तानचा प्रत्येक इंच आता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी त्या देशात कोठेही लपले तरी त्यांना टिपण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालवलेले ‘ऑपरेशन सिंदूर अभियान’ केवळ एक ट्रेलर आहे. हे अभियान संपविण्यात आलेले नाही. ते केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. कारण या अभियानाचा आतापर्यंतचा उद्देश सफल झालेला आहे …
Read More »लेख-समिक्षण
खड्डे आणि ताशेरे
महाराष्ट्राची राजधानी मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील इतर महानगरे असोत किंवा देशाच्या कानाकोपर्यातील महानगरे आणि नगरे असोत, त्या ठिकाणी नेहमीच खराब रस्ते आणि खड्डे यांची चर्चा होत असते. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालाच्या दरम्यान खराब रस्त्यांवर आणि खड्ड्यांच्या संस्कृतीवर जे ताशेरे ओढले आहेत ते पाहता या रस्त्यांच्या विकासासाठी जबाबदार असलेली प्रशासन यंत्रणा डोळे उघडून जागी होईल अशी आशा करायला …
Read More »जड झाले ओझे
जागतिक बँकेकडून कर्ज घेणार्या देशांच्या यादीमध्ये भारताचा आता पहिला क्रमांक लागला असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या आहेत. यावरून आता भारत जगातला सगळ्यात मोठा कर्जबाजारी देश बनला असल्याची ओरड सोशल मीडियातून सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही तीच हाकाटी पिटायला सुरुवात केली आहे. एका माहितीनुसार, जागतिक बँकेचे भारतावरील एकूण कर्ज ३९.२८ अब्ज अमेरिकन डॉलर इतके झाले आहे, भारतीय रुपयात हे …
Read More »गळचेपी करणारी अटक
लडाखमधील सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना करण्यात आलेली अटक हा सध्याचा हॉट टॉपिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांच्या अटकेचा निषेध केला जात आहे. भारतातल्याही अनेक ज्येष्ठ विचारवंतांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वांगचुक यांच्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत सरकारला ही अटक महागात पडेल, असा इशारा दिला आहे. अगदी मोदी सरकारचे समर्थक समजले जाणारे काही विचारवंतसुद्धा या अटकेच्या विरोधात आपले …
Read More »नीतीमूल्यांची पायमल्ली
नेहमीच वादग्रस्त बोलणारे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील महायुती सरकारचे घटक असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा अशा प्रकारच्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाची दखल घेऊन गोपीचंद पडळकर यांना समज …
Read More »दिलासा देणारा निकाल
वक्फ (सुधारणा) कायदा-२०२५च्या घटनात्मक वैधतेवर अखेर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांनंतर अंतरिम निकाल दिला. या कायद्यात करण्यात आलेल्या दोन वादग्रस्त सुधारणा न्यायालयाने स्थगित केल्या. तसेच वफ बोर्डावर मुस्लिमांचेच वर्चस्व राहील असा निर्णय दिला. वफ बोर्डात गेली किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचे पालन केलेल्या व्यक्तीच्या नियुक्ती संदर्भातील तरतुदीचा समावेश आहे. घटनात्मकतेची रूपरेषा सांगणारा संपूर्ण कायदा स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला. वफ …
Read More »अधिकारी संवेदनशील का नसतात?
कोणत्याही बांधकाम स्थळी सुरक्षेची खात्री करणे ही सर्वात मूलभूत जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात तिथे उपस्थित अधिकारी किंवा कर्मचारी या जबाबदारीबाबत सजग आणि संवेदनशील का नसतात, हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला उघडे ठेवलेले गटार, खड्डे किंवा मॅनहोल यात जर एखादा व्यक्ती चुकून पडला तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात असे खड्डे वा गटार पाण्याने भरून जातात आणि त्यांचा …
Read More »औद्योगिक क्षेत्रात भरारी घ्यायची तर…
भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्या दिशेने खर्या अर्थाने वाटचाल करायची असेल, तर केवळ वाढीचे टक्केवारी दाखवणारे आकडे किंवा अल्पकालीन उद्दिष्टे पुरेशी ठरणार नाहीत. औद्योगिक उत्पादनात शाश्वत गती निर्माण करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील आणि नव्या शयता उघडाव्या लागतील. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन ३.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे गेल्या चार …
Read More »ग्राहकहितैषी निर्णय
शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये हॉटेल-रेस्तराँमध्ये जाऊन जेवणे हा आजकालच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. कुटुंबीय वा मित्रांसोबत बाहेर खाणे ही केवळ सामाजिक सवय नसून प्रतिष्ठेची बाब मानली जाते. परंतु या प्रवृत्तीचा फायदा घेत अनेक महागडे रेस्तराँ आपल्या मनमानी पद्धतीने दर ठरवतात. जेवणातील पदार्थांच्या मूळ किंमतीपेक्षा बरेच जास्त पैसे आकारणे ही आधीच ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारी बाब आहे. त्यातही एकूण खर्चावर आणखी वेगळा …
Read More »जलतांडवाच्या झळा
हवामानाची स्वतःची एक गती असते आणि सामान्य परिस्थितींमध्ये तो परिसंस्थेच्या चक्राला टिकवून ठेवण्याचा एक आवश्यक भाग असतो. पण गेल्या काही काळापासून हवामानाच्या चक्रात झपाट्याने बदल नोंदवला जात आहे. विशेषतः पावसामुळे होणार्या तडाख्यांमुळे स्थिती चित्र अधिकच बिघडत चालली आहे. प्रत्येक वर्षी संपूर्ण मान्सूनच्या हंगामात पावसामुळे देशाचे बहुतेक भाग कमीअधिक प्रमाणात प्रभावित होतात, पण आता आपत्तींची एक अखंड मालिकाच सुरू झाल्यासारखी स्थिती …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र