काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जी ’ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केली ती निश्चितच अभिनंदनीय असली, तरी आता या कारवाईचा धुरळा खाली बसल्यानंतर संशयाचे जे नवीन धुके निर्माण होऊन पहात आहे त्याचाही विचार करावा लागणार आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये देशातील सर्वच राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली, तरी काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने …
Read More »लेख-समिक्षण
‘टीम इंडिया’ गरजेचीच
जून महिन्यामध्ये इंग्लंडच्या दौर्यावर जाणार्या भारतीय क्रिकेट संघाची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर करत असतानाच राजधानी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाची बैठक होऊन या बैठकीत पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यांनी आणि केंद्र सरकारने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्व राज्यांना केंद्र सरकारच्या साथीने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करण्याचे आवाहन केले असले, तरी …
Read More »विज्ञानयुगातील दीपस्तंभ
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असून खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे कार्य कायम स्मरणात राहील. डॉ. नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे एक थोर भौतिकशास्त्रज्ञ …
Read More »उपहासमर्यादेची आठवण
हास्य हा उत्स्फूर्त मानवी भावनाविष्कार आहे. मानवी जगणे आनंददायी बनण्यासाठी हास्य ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. पण आपल्याला किंवा इतरांना हसू यावे यासाठी एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा, परिस्थितीचा समाजघटकाचा किंवा ओळखीचा उपमर्द करणे, अवहेलना करणे किंवा अश्लील शेरेबाजी करणे याचा अधिकार कोणालाही दिलेला नाहीये. ही बाब आपल्या कुटुंबाच्या आणि भवतालातल्या संस्कारांमधून मनावर आपोआपच रुजलेली असते. सुसंस्कृत समाजात लोकांमध्ये याबाबतची जाण महत्त्वाची असते. …
Read More »ऑपरेशन सिंदूरचे वैशिष्ट्य
‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कारवाईबाबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच माहितीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे. या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, हवाई दलातील अधिकारी व्योमिका सिंह आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी उपस्थित राहून जनतेसमोर अधिकृत माहिती मांडली. हे तिघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी अधिकारी असून, त्यांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत …
Read More »चतुरस्र विज्ञानयात्री
भारताच्या अवकाश विज्ञान क्षेत्राला आंतरराष्ट्रीय उंचीवर नेणार्या डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन या विज्ञानयात्रीची प्राणज्योत नुकतीच मालवली. 1994 ते 2003 या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष म्हणून काम करताना डॉ. कस्तुरीरंगन यांनी भारताचा अंतराळ कार्यक्रम आत्मनिर्भरतेकडे गेला. पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल चं यशस्वी प्रक्षेपण आणि जीसॅट मालिका उपग्रहांच्या माध्यमातून कम्युनिकेशन क्षेत्रातील क्रांती, ही याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आयआरएस …
Read More »जीवघेणे ठरतायेत फटाक्याचे कारखाने
भारतात शोभेची दारू, फटाके तयार करणारे कारखाने कामगारांच्या मुळावर येत आहेत. प्रामुख्याने परवानगी न घेता काम करणारे किंवा नियम ओलांडत फटाक्यांची निर्मिती करणार्या कारखान्यातील कामगारांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. यावर्षी फटक्यांच्या कारखान्यातील स्फोटांत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नियमांचे पालन न करणे. एक एप्रिल रोजी गुजरातच्या बेकायदापणे काम करणार्या फटाक्याच्या कारखान्यात …
Read More »वाहनविक्रीचा टॉप गिअर
नवरात्र, गुढी पाडवा आणि ईद यांसारख्या सणांमुळे निर्माण झालेली सणासुदीची मागणी, वाहनांच्या किमतींवर ऑटोमोबाइल कंपन्यांनी दिलेली सवलत, आगामी काळात दरवाढ होण्याची शक्यता, नव्या मॉडेल्सचे लोकार्पण आणि अधिक दर्जेदार पर्याय उपलब्ध होण्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस वाहनविक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. मागील आर्थिक वर्षात देशाच्या किरकोळ बाजारांतील प्रवासी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत ग्रामीण भागाच्या सशक्त कामगिरीमुळे भारतातील खेड्यांमध्ये वाढत असलेल्या आर्थिक …
Read More »बनावट डॉक्टरांचे आव्हान
भारतातील आरोग्य व्यवस्था ही अनेक आव्हानांनी ग्रासलेली आहे. त्यात सर्वाधिक गंभीर आणि धोकादायक बाब म्हणजे बनावट डॉक्टरांचे वाढते प्रमाण. ग्रामीण भागांपासून ते शहरांतील झोपडपट्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणी वैद्यकीय शिक्षण, परवाना किंवा पात्रता नसलेले लोक ‘डॉक्टर’ म्हणून रुग्णांवर उपचार करताना आढळतात. या प्रकारामुळे रुग्णांचे आरोग्य, जीवन आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था धोक्यात येते आहे. बनावट डॉक्टरांविषयी अनेकदा चिंता व्यक्त केली गेली आहे. मात्र …
Read More »कर्जमाफीला ठेंगा
शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात वर केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारवासारवीचे प्रयत्न चालू झाले आहेत. यंदा आणि पुढच्या वर्षी देखील शेतकर्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे आता अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. महायुतीच्या नेत्यांनी ठिकठिकाणी जाहीर सभा घेताना देखील …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र