लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

कोण बनणार पक्षाध्यक्ष?

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उत्तराधिकार्‍याचा शोध जवळपास एक वर्षापासून चालू आहे. 2023 मध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर नड्डा यांना लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने मुदतवाढ मिळाली होती. नड्डा यांची जागा कोण घेणार, याचा शोध चालू असतानाच त्यांना 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिपदही देण्यात आले. साहजिकच ‘एक व्यक्ती एक पद’ हे सूत्रदेखील बासनात गुंडाळून ठेवण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार …

Read More »

औरंगजेबाचं राजकारण

संभाजीनगरपासून काही अंतरावर खुलताबाद येथे असणार्‍या औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटानंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम शासक होता, असे विधान केल्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. भाजपचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका, …

Read More »

मेलेली मने

ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारकांमुळे सोलापूरने स्वातंत्र्य प्राप्त केल्याचा इतिहास आजही जिवंत आहे. क्रांतिकारक आणि हुतात्म्यांच्या या शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. वस्त्रोद्योगामुळे सोलापूर हे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही ज्वलंत विषयावर पेटून उठण्याची येथील मानसिकता त्यावेळच्या लोकांमध्ये होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे वैभव आणखी वाढण्याऐवजी आता उतरतीला लागले आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोलापूर आणि परिसरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. काही …

Read More »

विरोधकांचे दमन

लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधक हे जनतेचा आवाज असतात. सत्ताधार्‍यांना वठणीवर आणून जनतेची कामे मार्गी लावण्यामध्ये विरोधकांचे योगदान महत्त्वाचे असते. अलीकडे निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय योजनांची घोषणा केली जाते. आश्वासनांना भुलून मतदार एका पक्षाला सत्तेवर आणतात. परंतु, सत्तेवर आले की निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधारी पक्षांना विसर पडतो. निवडणूक प्रचारात आश्वासने देण्यासाठी असतात ती पाळण्यासाठी नसतात, असे भाजपच्या आमदारांनीच केलेले विधान चर्चेत राहिले होते. …

Read More »

थरुर यांची खदखद

केंद्रात आणि बहुतांश राज्यांतील सत्ता हातातून गेल्यानंतर गांधी कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातूनच आव्हान देणार्‍यांची संख्या वाढली आहे. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी आजारी असताना कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ व सक्षम अध्यक्ष मिळावा म्हणून उठाव केला होता. त्यावेळी हा विषय काँग्रेस पक्षामध्ये फारच गाजला होता. उठाव केलेल्या नेत्यांना नोटिसा पाठविल्या गेल्या. परंतु, त्यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल …

Read More »

आव्हाने नव्या प्रदेशाध्यक्षांपुढील

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा निवडून आल्यानंतर हवेत असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जोरदार आपटले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नाना पटोले यांनी आपल्याला अध्यक्षपदावरुन मुक्त करावे, असे काँग्रेस नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या भेटी घेऊन सांगितले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे लांबणीवर टाकले. दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. …

Read More »

स्वागतार्ह पाऊल

राजकीय गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीचे होत असलेले वस्त्रहरण थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला यासंदर्भात जाब विचारुन लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद आणि विधानसभांच्या स्वच्छतेसाठीचे स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. देशातील खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी प्रकरणे तातडीने निकाली निघावी आणि दोषी नेत्यांवर आयुष्यभर निर्बंध लादण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली …

Read More »

झोपडपट्टयांची मुंबई

मुंबई कोणाला कधीच उपाशी झोपू देत नाही, असे म्हणतात. अनेक स्वप्ने उराशी बाळगलेले बेरोजगारांचे लोंढे देशाच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत येतात. ग्रामीण भागातून मुंबईत येण्याचा ओघ वाढल्याने मुंबईची बजबजपुरी झाली आहे. अनधिकृत झोपड्यांमुळे मुंबई समस्यांचे आगर बनले आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी मुंबईतल्या झोपडपट्ट्या म्हणजे बेकायदा वसुलींचे ‘एटीएम’च बनले आहे. कधीही जा आणि मनमानी वसुली करा, असा अधिकार्‍यांचा दृष्टिकोन इथल्या …

Read More »

सुरक्षेवर लक्ष कधी ?

प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभ 144 वर्षांनी आला. या महाकुंभात मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत स्नान होणार होते. त्यापूर्वी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर सकाळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. साधू, महंत आणि भाविक गंगा स्नान करत आहेत. भाविकांना काही अडचण होऊ नये म्हणून आखाड्यांनी त्यांच्या स्नानावर स्वतःहून बंदी आणली आहे. परंतु, ही चेंगराचेंगरी नेमकी …

Read More »

ट्रम्प आणि फडणवीस

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी यांचे पाच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदी पुनरागमन झाले. तसेच पुनरागमन अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे चार वर्षांनंतर झाले आहे. महाराष्ट्रात फडणवीस यांनी जाणीवपूर्वक नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारले आहे. तिकडे अमेरिकेत ट्रम्प यांनी पदग्रहणाआधीच कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य करण्याचा, ग्रीनलँड व पनामा कालव्यावर नियंत्रण मिळविण्याचा आणि मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात करण्याचा मनोदय जाहीरपणे त्यांनी …

Read More »