लेख-समिक्षण

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी व्हिडिओ कॉलचा आधार घेतात. मात्र, अशा प्रकारे लहान मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न पालकांच्या मनात अनेकदा येतो. बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांनी या संदर्भात पालकांच्या मतादीं शंकांचे निरसन केले असून काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
1) मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरक्षित आहे का?
अनेक पालक आपल्या मुलांना फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने योग्यच आहे. मात्र, जवळच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी व्हिडिओ कॉलचा वापर करणे सुरक्षित आहे का, यावर डॉक्टरांचे मत सकारात्मक आहे. तुम्ही तुमच्या मुलाला व्हिडिओ कॉलवर बोलू देऊ शकता, परंतु त्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहे.
2) व्हिडिओ कॉलसाठी योग्य वय कोणते?
डॉक्टरांच्या मते, बाळ 6 महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला व्हिडिओ कॉल करु शकता. या वयात बाळ संवादासाठी तयार होत असते. तुमचे बाळ ‌’पीकाबू‌’ (लपाछपीचा खेळ) सारख्या खेळांना प्रतिसाद देत असेल, तर ते व्हिडिओ कॉलवरील लोकांशी संवाद साधण्यास सज्ज आहे असे समजावे. तथापि, व्हिडिओ कॉलमुळे मुलाला त्याची सवय लागू नये किंवा डोळ्यांवर परिणाम होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
व्हिडिओ कॉलचा कालावधी अत्यंत कमी, म्हणजे साधारण 2 ते 5 मिनिटांचाच असावा. फोन बाळाच्या डोळ्यांपासून किमान 1 फूट अंतरावर धरावा. व्हिडिओ कॉल करताना खोलीतील दिवे (लाईटस्‌‍) सुरू असावेत; अंधारात कधीही व्हिडिओ कॉल करू नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बाळ झोपण्यापूर्वी त्याला व्हिडिओ कॉलवर कधीही बोलवू नका, कारण यामुळे त्याच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे योग्य काळजी घेतल्यास व्हिडिओ कॉल हा लांब असलेल्या प्रियजनांशी बाळाचा परिचय करून देण्याचा एक चांगला मार्ग ठरू शकतो. पण त्याचा अतिरेक टाळावा. तसेच बाळाच्या मर्जीनुसारच कॉल करावेत.

Check Also

‌‘वन साईज फिटस्‌‍ ऑल‌’चा भ्रम

फॅशन ही केवळ कपडे परिधान करण्याची बाब नाही, तर स्वतःची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास व्यक्त …