कधीकाळी देशाच्या शेतीसाठी आदर्श मानल्या गेलेल्या पंजाबमधील शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याने दबून पिचले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. सध्याच्या परिस्थितीत कृषी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याची नितांत गरज आहे. अलीकडेच लोकसभेत सादर झालेल्या नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या अहवालाने पंजाबमधील शेतकर्यांची गंभीर आर्थिक अवस्था उघड केली आहे. या अहवालानुसार देशातील …
Read More »लेख-समिक्षण
वाघांचे भविष्य धोक्यात
देशभरातील जंगलांमध्ये ज्या प्रकारे अतिक्रमण, खाणकाम आणि मानवी हस्तक्षेपाचा कहर सुरू आहे. यामुळे जंगलांमधील वाघांचे सुरक्षित अधिवास धोयात आले आहेत. जंगलांची सतत होत असलेली कत्तल त्यांच्या आहाराच्या समस्याही वाढवत आहे. जंगलाच्या आत रस्त्यांचे जाळे, पर्यटनामुळे होणारा गोंगाट आणि मानवी हालचालींमुळे नैसर्गिक वातावरणाचे संतुलन बिघडले आहे. याचा थेट परिणाम असा झाला आहे की, आता वाघ जंगलाबाहेर पडू लागले आहेत. पाणी व …
Read More »खर्या अर्थाने स्वच्छता दूत
शहरामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की रस्त्यात, पदपथावर, टेकड्यांवर, डोंगरावर, मोकळ्या जागेत, नदीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पुढे त्या कचर्याचे ढीग साचलेले दिसतात. कचरावेचक स्वतःचे आरोग्य आणि आयुष्य धोयात टाकून हाच कचरा साफ करताना दिसतात. यांची समाजात केवळ ‘कचरावाला’ किंवा ‘कचरा कामगार’ एवढीच एक दुर्दैवी ओळख. मग तो दारूच पितो, तो बेवडाच आहे, तो तंबाखूच खातो, तो …
Read More »राजीनाम्याचा अन्वयार्थ
उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिध्द सभापती असलेल्या अचानक प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत राजीनामा दिल्याची घोषणा संसद अधिवेशनाच्या प्रारंभी केली. यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ही केवळ व्यक्तिगत पातळीवरील वैद्यकीय बाब नसून भाजप सरकारने सर्वोच्च घटनात्मक पदांबाबत दाखविलेल्या असहिष्णुतेचे आणि अधिनायकी वृत्तीचे लक्षणीय उदाहरण म्हणून ही घटना ओळखली जाईल. सत्ताधारी भाजपने धनखड यांच्याशी असलेल्या तणावाच्या रेषा आधीच अधोरेखित केल्या होत्या. …
Read More »वृक्षारोपणाचा नको दिखावा
वृक्षारोपण हा आता उत्साही कार्यक्रम झाला आहे. ज्या उत्साहात वृक्षारोपण केले जाते तेवढे त्या रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. मग पुन्हा पुढच्या वर्षी उत्साहात वृक्षारोपण केले जाते. मानव इतर सजीवांपेक्षा बुध्दिमान असला तरी तोसुध्दा पर्यावरणाचाच एक घटक आहे. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ आहे. मानवाकडेच त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करणे व त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. …
Read More »गिलचा झंझावात
इंग्लंडविरुध्दच्या दुसर्या कसोटी सामन्यात भारताच्या शुभमन गिलने ऐतिहासिक झंझावात करीत २६९ धावांचा विक्रम नोंदविला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याने एक नवीन सोनेरी पान लिहून ठेवले. २६९ धावांची त्याची ही चमकदार खेळी केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे तर संपूर्ण संघासाठी प्रेरणास्थान आहे. गिलने धावांचा डोंगर उभा करताना अनेक दिग्गज फलंदाजांचे रेकॉर्ड मोडीत काढले. या खेळात त्याने सचिन तेंडुलकरची इंग्लंडविरुध्द कसोटीतली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या …
Read More »‘डेटा लिक’चा वाढता धोका
काळानुसार सायबर गुन्हेगारांनी हॅकिंग आणि चोरी करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला आहे. त्यामुळे या हल्ल्यापासून कोणीही वाचू शकत नाही, असे म्हटले जात आहे. मग एखाद्याने चूक केलेली असो किंवा नसो. एवढेच नाही तर या सायबर गुन्हेगारांनी पोलिसांना देखील सोडलेले नाही. खात्यातून पैसे गायब करण्याबरोबरच संवेदनशील माहिती चोरण्यासाठी अहोरात्र काम करणारे सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सजगता हवीच, त्याचवेळी ऑनलाइन असताना …
Read More »‘लालपरी’ला गरज आर्थिकदृष्ट्या सक्षमतेची
राज्यात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार्या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. आर्थिक संकटात सापडलेले हे महामंडळ गत ४५ वर्षांत फक्त ८ वेळाच नफ्यात होते. ‘गाव तेथे एसटी’, ‘रस्ता तेथे एसटी’ या घोषवाक्यांसह मिरवणारे हे महामंडळ सध्या १० हजार कोटींच्या वर संचित तोटा सहन करत आहे. महामंडळाची प्रकृती सुधारण्यासाठी, महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शविणारी श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली …
Read More »‘चोकर्स’चा शिक्का पुसला
यश मिळविण्यासाठी माणूस जंगजंग पछाडत असतो. अगदी ओठापर्यंत आलेला घास हिरावला जातो तेव्हा तो निराश होणे साहजिक आहे. अशा वेळी त्याला यश हे पा-यासारखे आहे असे वाटत असते. अनेकवेळा अंतिम रेषेपर्यंत मजल मारूनही अंतिम रेषा ओलांडणे जमत नाही तेव्हा ‘चोकर्स’चा शिक्का बसतो. चोकर्स म्हणजे ऐनवेळी हातपाय गाळणे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने हा अनुभव अनेकवेळा घेतला आहे. सुमारे तीन दशके ‘चोकर्स’ची …
Read More »पद पाकिस्तानला, धक्का भारताला
संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदावर पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याच वेळेस संयुक्त राष्ट्रांच्या तालिबान विरोधातील समितीचे प्रमुखपदही पाकिस्तानला देण्यात आले आहे. या दोन्ही बातम्या भारतासाठी धक्कादायक अशासाठी ठरल्या आहेत की, भारतीय खासदारांची सात शिष्टमंडळे जगभरातल्या विविध देशांमध्ये पाकिस्तान कसा दहशतवादाला आश्रय देतो हे त्यांना पटवून देण्यासाठी तिकडे गेली होती, त्यांचे हे दौरे सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र