महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातील बळीराजाला दिलासा देणारी एक घोषणा केली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी देण्याची ही घोषणा कर्जबाजारीपणामुळे त्रासलेल्या काही शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक असली, तरी सरसकट बळीराजा खूश होईल अशी परिस्थिती नाही. देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या काळात आम्ही सरसकट …
Read More »लेख-समिक्षण
युद्धाचे चटके
जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेली अमेरिका आणि नेहमीच लष्करी संघर्षाच्या तयारीत असलेला इस्रायल यांनी एकमेकांच्या साथीने इराणवर केलेल्या युद्ध हल्ल्यामुळे आधीच होरपळलेल्या जगाला युद्धाचे चटके अधिकच तीव्रतेने जाणवणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाने जगाला हादरवून सोडले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील छोटा लष्करी संघर्षही समोर आला होता. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील लष्करी संघर्ष दीर्घकाळ …
Read More »अविमुक्तेश्वरानंदांचा संघर्ष
प्रयागराजमधील माघ मेळ्याच्या वेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना तेथे स्नानास बंदी करून त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार घडला होता. त्यातून शंकराचार्य विरुद्ध योगी आदित्यनाथ असा संघर्ष निर्माण झालेला आहे. या संघर्षाने आता अधिक उग्र स्वरूप धारण केले आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी गो संरक्षणाचा मुद्दा पुढे करत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मोठा लढा हाती घेतला आहे. उत्तर प्रदेशात गाईचे रक्षण …
Read More »महागाईची टांगती तलवार
भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला असून, लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ, असे दावे सरकारी स्तरावरून केले जात आहेत. भक्कम देशांतर्गत उपभोग आणि धोरणात्मक सुधारणांमुळे हे यश मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, विकासाच्या या लखलखत्या आकड्यांच्या मागे सामान्य जनतेच्या जगण्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता, आर्थिक विकासाचे हे मोजमाप करताना महागाईच्या विळख्याकडे सोयीस्कर …
Read More »रीलवेडात हरवलेला विवेक
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला, तरी त्याचे भीषण परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. समाजमाध्यमांवर स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात माणूस कशा प्रकारे आपल्या विवेकाचा बळी देत आहे, याचे ज्वलंत उदाहरण उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडलेल्या घटनेतून दिसते. एका महिलेने केवळ रील बनवण्यासाठी गळफास घेण्याचे नाटक केले, परंतु दुर्दैवाने तिचा जीव खरोखरच गेला. ही घटना …
Read More »प्रश्नांचे मळभ कायम
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार शुल्कावरून (टॅरिफ) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला तणाव निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांच्या धोरणांमध्ये झालेला हा मोठा बदल जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा सूचक मानला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर असा दावा केला आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. या करारानुसार, अमेरिकेकडून आकारले जाणारे शुल्क 50 टक्क्यांवरून थेट …
Read More »इराणची पाठराखण: भारताचे धोरणात्मक पाऊल
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये इराणविरुद्ध मांडण्यात आलेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रस्तावाविरोधात मतदान करून भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची आणि इराणसोबतच्या धोरणात्मक संबंधांची प्रचिती पुन्हा एकदा जगाला दिली आहे. पाश्चात्य देशांनी आणलेला हा प्रस्ताव प्रामुख्याने इराणमध्ये गेल्या वर्षाच्या शेवटी सुरू झालेल्या देशव्यापी निदर्शनांशी संबंधित होता, ज्यामध्ये मानवी हक्कांच्या पायमल्लीचा आरोप करण्यात आला होता. या प्रस्तावात इराण सरकारने आंदोलकांवर केलेल्या अमानुष बलप्रयोगाचा आणि …
Read More »दूरगामी परिणाम करणारा निकाल
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब आणि वंचित मुलांसाठी 25 टक्के जागा मोफत राखीव ठेवण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यादरम्यान, न्यायालयाने मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या एका जुन्या विधानाचा उल्लेख केला. वंचित समूहातील मुले खाजगी शाळांच्या वातावरणात कशा प्रकारे जुळवून घेतील, अशी चिंता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. त्यावर भाष्य करताना न्यायालयाने म्हटले की, ही चिंता तेव्हाच दूर होऊ …
Read More »दुटप्पीपणाचे गौडबंगाल
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे एक शिष्टमंडळ भारत भेटीवर आले असून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात त्यांच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केली. एवढेच नव्हे तर या शिष्टमंडळाने संघाच्या मुख्यालयात जाऊन संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी दत्तात्रय होसबाळे यांचीही भेट घेतल्याची बातमी आहे. आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने चीनविषयी या देशातील जनतेच्या मनात टोकाची द्वेषभावना निर्माण केली. चिनीमालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले, चीनच्या ॲपवर बंदी …
Read More »महासत्तेची धोकादायक दंडेलशाही
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरोधात अमेरिकेने केलेली लष्करी कारवाई आणि त्यानंतर त्यांना अटक करून थेट अमेरिकेत नेण्याची घटना ही आधुनिक जागतिक राजकारणातील एका अत्यंत धोकादायक अध्यायाची नांदी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने ज्या पद्धतीने एका सार्वभौम राष्ट्राच्या सीमा ओलांडून तिथल्या राष्ट्राध्यक्षाला ताब्यात घेतले, ते पाहता आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम आता केवळ कागदावरच उरले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र