काल-परवापर्यंत ज्या भारत- अमेरिका ऐतिहासिक करारावर 99 टक्के सहमती झाली म्हणून ढोल वाजवले जात होते, त्याच करारावरून भारताने अचानक पाऊल मागे घेतले. ही माघार नसून, अमेरिकेच्या अरेरावीला दिलेला एक सुस्पष्ट आणि कणखर धोरणात्मक संदेश अथवा चपराक आहे. ‘आम्हाला व्यापार करार हवा आहे, पण देशाचे हित धाब्यावर बसवून नाही, हा वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा संदेश आजच्या घडीला अत्यंत गरजेचा होता. …
Read More »लेख-समिक्षण
शहरांचे प्राक्तन
गेल्या काही वर्षांत पावसाळा हा सुखावणाऱ्या क्षणांपेक्षा विविध आपत्तींमुळे भयकारक बनला आहे. यंदाचा 2026 चा मान्सूनही त्याला अपवाद ठरलेला नाही. ‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट’ (ईआईयू) चा ताजा ‘ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स’ प्रसिद्ध झाला आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या देशातील एकही शहर जगातील पहिल्या 100 राहण्यायोग्य शहरांच्या यादीत स्थान मिळवू शकलेले नाही. देशाची राजधानी नवी दिल्ली या यादीत थेट 120 व्या स्थानावर आहे, तर …
Read More »विजयपर्व
देशातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक खेळ सुरू असताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून प्रथमच सत्तेवर आलेले नवोदित विजय यांच्या राज्यामध्ये मात्र बरेच काही चांगले सुरू आहे. मुख्यमंत्री विजय यांनी मात्र गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे निर्णय घेऊन आपली भविष्यातील दिशा निश्चित केलेली दिसते. अर्थात, कोणत्याही व्यक्तीला जेव्हा एखादे पद मिळते तेव्हा प्रारंभीचा उत्साह चांगला असतो, याच जाणिवेतून विजय यांनी …
Read More »महायुती सरसच; पण…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचाच बोलबाला राहिला. नाशिक तेवढे अपवाद ठरले. ज्या पद्धतीने महायुतीचे राज्यात तर त्यांच्या वरिष्ठ आवृत्तीचे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्रात वर्चस्व आहे ते पाहता विरोधकांना आता अशा निवडणुकांमध्ये किंवा कोणत्या निवडणुकांमध्ये वाव राहिला आहे असे दिसत नाही. तथापि, काही वेळा धक्कादायक निकालांचीही नोंद होते आहे. त्यामुळे एकूण महायुती अथवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रकृतीवर …
Read More »पारदर्शकतेला खिंडार
अयोध्येतील श्र्ीराम मंदिरातील दानपेट्यांमधील देणग्यांच्या रकमेत झालेल्या कथित अपहाराच्या प्रकरणाने देशभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर आणि अनेक पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर उभे राहिलेले श्रीराम मंदिर हे हिंदू समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराशी संबंधित कोणतीही अनियमितता ही केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून पाहता येत नाही. ती थेट भाविकांच्या विश्वासाशी जोडलेली बाब ठरते. म्हणूनच …
Read More »तपपूर्तीचे मूल्यमापन
नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली त्याला 9 जून रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आणि मोदी यांच्या एकूण पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला बारा वर्षे पूर्ण झाली. सलग बारा वर्षे पंतप्रधानपदाची कारकीर्द पूर्ण करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. सर्वसाधारणपणे भारतीय संस्कृतीमध्ये बारा वर्षांची तपश्चर्या सर्वमान्य आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीकडे पहावे लागणार आहे. 2014 मध्ये …
Read More »निर्वाळ्याचा अन्वयार्थ
विशेष मतदार यादी पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया कायदेशीरदृष्टया वैधच आहे, असा निर्वाळा अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिला. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी हे आवश्यकच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वरकरणी पाहता हे निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, या आदेशामुळे एसआयआरच्या विरोधात डझनभर याचिका दाखल करणाऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखी झाली आहे. लोकशाहीत न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखणे आणि तारतम्य …
Read More »तमिळनाडूतील राजकीय रंग
तामिळनाडूच्या राजकारणामध्ये सध्या अत्यंत अभूतपूर्व आणि वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध अभिनेते सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेट्री कषगम (टीव्हीके) पक्षाचे सरकार सत्तेवर येऊन अवघे 2 आठवडे उलटले आहेत. मात्र, या अत्यंत कमी कालावधीतच विजय यांच्या विजयाने तामिळनाडूतील तब्बल 2 दशके जुनी द्रमुक (डीएमके) आघाडी पूर्णपणे मोडीत काढली आहे. त्याच वेळी, राज्यातील 54 वर्षे जुना ऐतिहासिक …
Read More »रेल्वे दुर्घटनांची न संपणारी कहाणी
भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानले जाते. दररोज कोट्यवधी नागरिक या यंत्रणेवर विश्वास ठेवून प्रवास करतात. केंद्र सरकारकडून सध्या भारतीय रेल्वेला जागतिक दर्जाचे बनवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्याचे मोठे दावे केले जात आहेत. वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या रुळांवर धावत आहेत. मात्र, या चकचकाटाच्या मागे प्रवाशांच्या मूलभूत सुरक्षेचा प्रश्न कमालीचा गंभीर बनत चालला आहे. नुकत्याच देशाच्या विविध भागांत घडलेल्या रेल्वे दुर्घटना …
Read More »महिला सुरक्षिततेपुढील गंभीर आव्हाने
नवी दिल्लीतील नबी करीम परिसरातून नुकतीच एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे अक्षता पडल्याला अद्याप आठवडाही पूर्ण झाला नव्हता, तोच एका नवविवाहितेची हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह पलंगाच्या पेटीत लपवून आरोपी पती फरार झाला. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून ती आपल्या समाजातील प्रगत मानसिकतेच्या दाव्यांवर पडलेली एक मोठी चपराक आहे. या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र