जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, हे राजस्थानमधील 22 वर्षीय जसपाल सिंह सिंधल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बारावीचा विद्यार्थी असलेल्या जसपालकडे महागडा कॅमेरा किंवा संगणक नव्हता. केवळ स्मार्टफोनच्या मदतीने त्यांनी प्रेरणादायी भाषणे, टेड टॉक्स आणि विविध नामवंत व्यक्तींच्या भाषणांतील महत्त्वाचे भाग निवडून लहान व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
नवीन टास्क फोर्सने काय साधणार?
भारतातील शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्था सध्या एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. देशातील लाखो होतकरू तरुणांचे भविष्य ज्या परीक्षांवर अवलंबून असते, त्या परीक्षांच्या विश्वासार्हतेवर गेल्या काही वर्षांत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार घडणारे पेपरफुटीचे प्रकार (पेपर लीक), परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, गैरप्रकार आणि यंत्रणेची दिरंगाई यामुळे तरुण पिढीच्या मनात तीव्र नैराश्य आणि संताप पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षा व्यवस्थेत …
Read More »वाळवंटातील महादीर्घायुषी वनस्पती
जगातील काही झाडे दिसायला विचित्र असतात, तर काही त्यांच्या अनोख्या गुणधर्मांमुळे उठून दिसतात. वनस्पतीच्या जगात जोशुआ ट्री ही एक अनोखी प्रजाती आहे. याला युक्का ब्रेविफोलिया किंवा युक्का पाम इत्यादी नावांनीही ओळखले जाते. वाळवंटातील बुंध्यासारख्या दिसणाऱ्या या मोठ्या जीवाला पाहून असे वाटत नाही की ते खूप दीर्घायुष्यी असेल. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ॲरिझोना, उटाह आणि नेव्हाडामध्ये आढळणारे युक्का ब्रेविफोलिया 400 ते 1800 मीटर …
Read More »अवकाश क्षेत्राला नवे क्षितिज देणारी जोडी.
भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात 18 जुलै 2026 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या ‘विक्रम-1’ या रॉकेटने यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी नवे पर्व सुरू केले. या ऐतिहासिक मोहिमेच्या केंद्रस्थानी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे दोन भारतीय अभियंते होते. पवन चंदना यांनी आयआयटी खरगपूरमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर 2012 ते …
Read More »पार्थ विरुध्द रोहित?
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असला, तरी प्रत्यक्षात हा मार्ग अधिकच खडतर होत चालल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांचे पुनर्मिलन व्हावे, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्तेआणि नेते व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ‘घरवापसी’चे संकेतही वेळोवेळी मिळाले; मात्र आता या …
Read More »एक हत्यार…किंमत पाच अब्ज!
काळाच्या ओघात शस्त्रास्त्रांचेही स्वरूप बदलत गेले. आधुनिक काळात अनेक प्रकारची शस्त्रे व अस्त्रे पाहायला मिळतात. जागतिक स्थरावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी बहुतांश देश अद्ययावत शस्त्रांची निर्मिती करीत आहेत. अनेक देश बजेट सादर करतानाच शस्त्र निर्मितीसाठी मोठी आर्थिक तरतूद करत आहेत. जगात एक असं हत्यार आहे ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये तब्बल 5 अब्जांपेक्षा अधिक रुपये आहे. हे पृथ्वीवरील सगळ्यात महागडं …
Read More »दुर्गम गावातील तरुणाला अडीच कोटींचे पॅकेज
आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञानविश्वात जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवण्यासाठी ‘आयआयटी’सारख्या नामांकित संस्थेची पदवी आवश्यक मानली जाते. मात्र, कर्नाटकातील एका दुर्गम गावातून आलेल्या पृथ्वीराजने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेचा शिक्का नसतानाही केवळ स्वतःच्या कौशल्याच्या, सातत्यपूर्ण मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्याने जगातील आघाडीची चिप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कंपनी ‘एनव्हिडिया’मध्ये तब्बल 2.6 कोटी रुपयांच्या वार्षिक …
Read More »हरित हायड्रोजन मोहिमेसमोरील आव्हाने
भारताने जानेवारी 2023 मध्ये ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहीम’ सुरू केली. 2030 पर्यंत दरवर्षी किमान 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट देशाने ठेवले आहे. यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 8 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची अपेक्षा आहे. मात्र, मोहीम सुरू होऊन तीन वर्षेउलटल्यानंतरही जमिनीवरील वास्तव आणि कागदावरील उद्दिष्टे यात मोठी दरी असल्याचे संसदेत सादर …
Read More »दीडशे कोटींचे नाणे
आपण अनेकदा ऐकले असेल की, आपल्याकडे दुर्मीळ बँक नोट किंवा नाणे असल्यास, ते विकून श्रीमंत होऊ शकता. दुर्मीळ नाणे मिळाल्यानंतर त्याच्या लिलावाचे वृत्त अनेकदा येत असते. सध्या अशाच एका दुर्मीळ नाण्याची जोरदार चर्चा आहे. हे नाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले जात आहे, ज्याला ते मिळेल तो करोडपती होईल. हे नाणे आहे अमेरिकेचे ‘गोल्ड डबल ईगल’ नाणे. डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या …
Read More »हळद शेतीतील यशस्वीनी
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील सोमालीवाडा खुर्द गावातील कंचन वर्मा या महिला शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला छेद देत हळद लागवडीच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन केले आहे. गव्हाचे बंपर उत्पादन होणाऱ्या या भागात कंचन यांनी कृषी विज्ञान केंद्रातून अवघ्या सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले आणि 2020 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर हळदीची लागवड सुरू केली. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला असून 2023 मध्ये त्यांनी तब्बल …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र