आपण अनेकदा ऐकले असेल की, आपल्याकडे दुर्मीळ बँक नोट किंवा नाणे असल्यास, ते विकून श्रीमंत होऊ शकता. दुर्मीळ नाणे मिळाल्यानंतर त्याच्या लिलावाचे वृत्त अनेकदा येत असते. सध्या अशाच एका दुर्मीळ नाण्याची जोरदार चर्चा आहे. हे नाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले जात आहे, ज्याला ते मिळेल तो करोडपती होईल. हे नाणे आहे अमेरिकेचे ‘गोल्ड डबल ईगल’ नाणे.
डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ‘गोल्ड डबल ईगल गोल्ड कॉईन’ हे नाणे 1933 मध्ये बनवले गेले होते. टिकटॉकवर एका युजरने याबद्दल माहिती दिली आहे. आता एक लक्षात येईल की, हे नाणे फार जुने नाही, मग ते इतके दुर्मीळ का आहे? खरं तर, महामंदीच्या काळात अशी जवळपास साडेचार लाख नाणी बनवण्यात आली होती; पण ती अमेरिकेच्या अधिकृत चलनात समाविष्ट नव्हती.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी त्यावेळी सोन्याच्या नाण्यांचे उत्पादन बंद केले होते. त्यांनी नागरिकांना त्यांच्याकडील कोणतीही नाणी परत करण्यास सांगितले होते. तोपर्यंत सुमारे 6 लाख नाणी तयार झाली होती; पण एका टांकसाळ कर्मचाऱ्याच्या चतुराईमुळे अशी 10 नाणी चलनात येऊ शकली नाहीत. हे नाणे त्यापैकी एक आहे आणि म्हणूनच ते अत्यंत दुर्मीळ आहे. असे मानले जाते की शिल्लक असलेली सर्व नाणी कोणा ना कोणाकडे आहेत; पण लोक ती लपवून ठेवतात. सीएनएनच्या 2021 च्या रिपोर्टनुसार, त्यावर्षी न्यूयॉर्कमध्ये एक डबल ईगल गोल्ड कॉईन 161 कोटी रुपयांना विकले गेले. या नाण्याची किंमत 20 डॉलर्स इतकी होती. होती. 1944 मध्ये, सिक्रेट सर्व्हिसने घोषित केले होते की, जर कोणाकडे हे नाणे सापडले, तर त्याच्यावर चोरीचे म्हणून कारवाई केली जाईल. पण, तरीही चोरीछुपे असे व्यवहार होतच राहतात आणि आता या नाण्याची 161 कोटींच्या घरात पोहोचते आहे.
Check Also
सात अपयशांनंतर स्वप्नाल गवसणी
वर्षाला 46 लाख रुपयांचे पॅकेज, जगातील नामांकित कंपनीत नोकरी आणि पुढे उज्ज्वल करिअरची हमी… इतके …
पांचजन्य वृत्तपत्र