लेख-समिक्षण

Tag Archives: चालू घडामोडी

निकाल लागला,पण…

राजकारणात एखाद्या नेत्याची प्रतिमा कशी मलिन होते आणि न्यायाचा प्रकाश पडून ती पुन्हा उजळ होण्यास किती काळ जावा लागतो, याचे ताजे आणि सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत दिलेला ऐतिहासिक निर्णय. 2012 च्या सुमारास ज्या ‌’कोलगेट (कोळसा खाणी वाटप) घोटाळ्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते आणि ‌’इंडिया अगेन्स्ट करप्शन‌’च्या नाऱ्याने दिल्ली तापली होती, …

Read More »

लवंग खा झोपण्यापूर्वी

स्वयंपाकघरात असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात, तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत, जे अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात. गरम मसाल्यांमधील एक म्हणजे लवंग. गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगेमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्‌‍यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने लवंग खाण्याचे फायदे सांगितले …

Read More »

स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश

जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, हे राजस्थानमधील 22 वर्षीय जसपाल सिंह सिंधल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बारावीचा विद्यार्थी असलेल्या जसपालकडे महागडा कॅमेरा किंवा संगणक नव्हता. केवळ स्मार्टफोनच्या मदतीने त्यांनी प्रेरणादायी भाषणे, टेड टॉक्स आणि विविध नामवंत व्यक्तींच्या भाषणांतील महत्त्वाचे भाग निवडून लहान व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात …

Read More »

नवीन टास्क फोर्सने काय साधणार?

भारतातील शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्था सध्या एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. देशातील लाखो होतकरू तरुणांचे भविष्य ज्या परीक्षांवर अवलंबून असते, त्या परीक्षांच्या विश्वासार्हतेवर गेल्या काही वर्षांत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार घडणारे पेपरफुटीचे प्रकार (पेपर लीक), परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, गैरप्रकार आणि यंत्रणेची दिरंगाई यामुळे तरुण पिढीच्या मनात तीव्र नैराश्य आणि संताप पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षा व्यवस्थेत …

Read More »

वाळवंटातील महादीर्घायुषी वनस्पती

जगातील काही झाडे दिसायला विचित्र असतात, तर काही त्यांच्या अनोख्या गुणधर्मांमुळे उठून दिसतात. वनस्पतीच्या जगात जोशुआ ट्री ही एक अनोखी प्रजाती आहे. याला युक्का ब्रेविफोलिया किंवा युक्का पाम इत्यादी नावांनीही ओळखले जाते. वाळवंटातील बुंध्यासारख्या दिसणाऱ्या या मोठ्या जीवाला पाहून असे वाटत नाही की ते खूप दीर्घायुष्यी असेल. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ॲरिझोना, उटाह आणि नेव्हाडामध्ये आढळणारे युक्का ब्रेविफोलिया 400 ते 1800 मीटर …

Read More »

अवकाश क्षेत्राला नवे क्षितिज देणारी जोडी.

भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात 18 जुलै 2026 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या ‌‘विक्रम-1‌’ या रॉकेटने यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी नवे पर्व सुरू केले. या ऐतिहासिक मोहिमेच्या केंद्रस्थानी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे दोन भारतीय अभियंते होते. पवन चंदना यांनी आयआयटी खरगपूरमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर 2012 ते …

Read More »

पार्थ विरुध्द रोहित?

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असला, तरी प्रत्यक्षात हा मार्ग अधिकच खडतर होत चालल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांचे पुनर्मिलन व्हावे, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्तेआणि नेते व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ‌‘घरवापसी‌’चे संकेतही वेळोवेळी मिळाले; मात्र आता या …

Read More »

एक हत्यार…किंमत पाच अब्ज!

काळाच्या ओघात शस्त्रास्त्रांचेही स्वरूप बदलत गेले. आधुनिक काळात अनेक प्रकारची शस्त्रे व अस्त्रे पाहायला मिळतात. जागतिक स्थरावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी बहुतांश देश अद्ययावत शस्त्रांची निर्मिती करीत आहेत. अनेक देश बजेट सादर करतानाच शस्त्र निर्मितीसाठी मोठी आर्थिक तरतूद करत आहेत. जगात एक असं हत्यार आहे ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये तब्बल 5 अब्जांपेक्षा अधिक रुपये आहे. हे पृथ्वीवरील सगळ्यात महागडं …

Read More »

दुर्गम गावातील तरुणाला अडीच कोटींचे पॅकेज

आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञानविश्वात जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवण्यासाठी ‌‘आयआयटी‌’सारख्या नामांकित संस्थेची पदवी आवश्यक मानली जाते. मात्र, कर्नाटकातील एका दुर्गम गावातून आलेल्या पृथ्वीराजने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेचा शिक्का नसतानाही केवळ स्वतःच्या कौशल्याच्या, सातत्यपूर्ण मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्याने जगातील आघाडीची चिप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कंपनी ‌‘एनव्हिडिया‌’मध्ये तब्बल 2.6 कोटी रुपयांच्या वार्षिक …

Read More »

हरित हायड्रोजन मोहिमेसमोरील आव्हाने

भारताने जानेवारी 2023 मध्ये ‌‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहीम‌’ सुरू केली. 2030 पर्यंत दरवर्षी किमान 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट देशाने ठेवले आहे. यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 8 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची अपेक्षा आहे. मात्र, मोहीम सुरू होऊन तीन वर्षेउलटल्यानंतरही जमिनीवरील वास्तव आणि कागदावरील उद्दिष्टे यात मोठी दरी असल्याचे संसदेत सादर …

Read More »