लेख-समिक्षण

ट्रेलरने वाढवली उत्सुकता

‌‘धमाल 4‌’या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्याचा मनोरंजक प्रवास अनुभवायला मिळणार आहे. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट येत्या 10 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेळची कथा एका अथांग सोन्याच्या खजिन्याभोवती आणि रहस्यमय साहसाभोवती फिरते. यामध्ये नेहमीप्रमाणेच संभ्रम, स्पर्धा आणि अटीतटीची लढत पाहायला मिळेल. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे या प्रवासात समुद्री चाच्यांची टोळी (ज्याचे नेतृत्व रवी किशन करत आहेत) आणि काही थरारक स्टंट्स पाहायला मिळतील. ट्रेलर लाँच दरम्यान अर्शद वारसी आणि जावेद जाफरी यांनी सांगितले की, चित्रपटातील डोंगरकड्याचा एक महत्त्वाचा आणि अत्यंत धोकादायक स्टंट महाराष्ट्रातील माळशेज घाट येथे प्रत्यक्ष लोकेशनवर शूट करण्यात आला आहे. कोणतीही संगणकीय ग्राफिक्स न वापरता हा सीन अत्यंत जोखमीचा होता आणि अजय देवगणच्या मदतीने हा स्टंट नियोजित वेळेपेक्षा खूपच कमी वेळात पूर्ण करण्यात आला. एकंदरीत, स्लॅपस्टिक कॉमेडी, भन्नाट संवाद आणि गोंधळातून निर्माण होणारा विनोद या सूत्राचा वापर करून ‌’धमाल 4‌’ प्रेक्षकांसाठी कौटुंबिक मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत असल्याचे स्पष्ट होत आहे.- जगदीश काळे

Check Also

रणवीर-फरहान वादात सलमानची मध्यस्थी

‌‘डॉन 3‌’ चित्रपटावरून अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यात निर्माण झालेला वाद …