बंगळुरूमधील उद्योजक वैभव अनंत यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापराकडे केवळ पर्यावरणीय संकट म्हणून पाहिले नाही, तर त्यामध्ये नव्या व्यवसायाची संधीही शोधली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे वाढणारा कचरा आणि त्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणपूरक पॅकेजिंग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘बॅम्ब्र्यू’ या कंपनीची सुरुवात झाली. ‘बॅम्ब्र्यू’मध्ये बांबू, लाकडाचा लगदा आणि नैसर्गिक तंतू यांसारख्या साहित्याचा वापर करून जैवविघटनशील …
Read More »TimeLine Layout
August, 2026
-
15 August
धनशक्तीची सावली
अमेरिकेतील न्यायव्यवस्था ही निष्पक्षता, स्वायत्तता आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीसाठी जगभरात आदर्श मानली जाते. मात्र अदानी समूहावरील लाचखोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणातून या व्यवस्थेतील काही अस्वस्थ करणारे पैलू समोर आले आहेत. अमेरिकी जिल्हा न्यायाधीश निकोलस गरौफिस यांनी हे प्रकरण रद्द करण्यास अखेर संमती दिली असली, तरी त्याच वेळी डॉनल्ड ट्रंप प्रशासनाच्या न्याय विभागाच्या कार्यपद्धतीवर केलेली त्यांची टिप्पणी अत्यंत महत्त्वाची आहे. न्यायाधीशांनी स्पष्ट …
Read More » -
15 August
सरकारची सत्त्वपरीक्षा
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स अर्थात सियामने ई-20 पेट्रोलच्या परिणामांविषयी सरकारला लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेला वाद आता केवळ वाहनांच्या कार्यक्षमतेपुरता मर्यादित राहिलेला नाही. वाहन उद्योगाची सर्वोच्च प्रतिनिधी संस्था असलेल्या सियामने प्रथम सरकारकडे तक्रार करून ई-20 इंधनामुळे वाहनांच्या सुट्या भागांमध्ये बिघाड वाढत असल्याचे निदर्शनास आणले आणि त्यानंतर काही दिवसांतच आपले पत्र मागे घेतले. कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आणखी माहितीची आवश्यकता असल्याचे …
Read More » -
15 August
राज्याच्या औद्योगिक प्रगतीच्या दाव्यांची पोलखोल
महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन असल्याचा दावा केला जात असताना, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने या दाव्यालाच मोठा धक्का दिला आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्या आहेत. लोकसभेत दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या नाशिक जिल्ह्यात तब्बल 840 कंपन्या बंद झाल्या, तर पुण्यात …
Read More » -
15 August
तंत्रज्ञान कपन्यांना दणका
डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. व्हॉट्सॲपवरील संदेश असोत, फेसबुकवरील मतप्रदर्शन असो किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स; या माध्यमांनी माणसाच्या विचारसरणीला व्यापून टाकले आहे; परंतु अलीकडच्या काळात या कंपन्यांची एकाधिकारशाही, त्यांची पारदर्शकता नसलेली कार्यप्रणाली आणि डिजिटल जगातील वाढता बेजबाबदारपणा हा लोकशाही व्यवस्थेसाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी एक गंभीर धोका बनत चालला आहे. सगळे नियंत्रणच त्यांच्या …
Read More » -
15 August
यशाला धक्का
केंद्र सरकारने संसदेत विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर बँकांना यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग खुला झाला आहे. ही बाब निश्चितच आक्षेपार्ह म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयच्या अभूतपूर्व यशाचे श्र्ेय सातत्याने घेतले आहे. डिजिटल व्यवहारांना वेग देणारी आणि देशातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करणारी ही व्यवस्था भारताच्या तंत्रज्ञानाधारित प्रगतीचे महत्त्वाचे उदाहरण …
Read More » -
9 August
‘पल भर के लिए’ झळकणार जागतिक पातळीवर
बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‘पल भर के लिए’ हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर (वर्ल्ड प्रिमियर) ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ म्हणजेच ‘आयएफएफएम 2026’ मध्ये होणार आहे. या चित्रपटात सैयमी खेर यांच्यासोबतच इष्वाक सिंग, ताहिर राज भसीन आणि विनीत कुमार सिंग हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार …
Read More » -
9 August
पडद्यावरचा ‘जननायक’ आणि समाज
सिनेमा आणि समाज यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. मोठा पडदा मनोरंजनाच्या गोष्टी सांगतानाच प्रशासकीय व्यवस्थेविरुद्ध आणि सामाजिक प्रश्नांविरुद्ध जागी होणाऱ्या चेतनेचंही प्रतिबिंब बनतो. जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार आणि द्वेषाचं वातावरण गडद होत गेलं, तेव्हा तेव्हा पडद्यावर एक काल्पनिक ‘जननायक’ जन्माला आला, ज्यानं सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पाऊल उचललं. दक्षिणेतील ‘जना नायकन’ सारखे चित्रपट स्त्री-सक्षमीकरणाचा संदेश देतात, तर हिंदीतील …
Read More » -
9 August
उद्योजक बनणाऱ्या तरुणांसाठी…
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र, कल्पना असणे आणि ती यशस्वी उद्योगात रूपांतरित करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय उभारताना योग्य नियोजन, बाजारपेठेची समज, नेतृत्वगुण, आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहकांची मानसिकता यांचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. अनुभवी उद्योजकांचे अनुभव, त्यांनी केलेल्या चुका आणि यशामागील सूत्रे समजून घेण्यासाठी पुस्तके हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतात. उद्योजकतेचा प्रवास सुरू करू …
Read More » -
9 August
तेलनिवड हवी केसांच्या प्रकारानुसार
रुक्ष आणि निर्जीव केस: तुमचे केस कोरडे दिसत असतील, तर त्यांना खोलवर ओलावा देण्याची गरज असते. अशा केसांसाठी खोबरेल तेल किंवा आर्गन तेल सर्वोत्तम आहे. नारळ तेल प्रथिनांचा ऱ्हास रोखते, तर आर्गन तेलातील जीवनसत्व ‘ई’ केसांना चकाकी देते. केस पातळ होणे आणि गळती : केस गळत असतील तर रक्ताभिसरण वाढवणे गरजेचे असते. अशा वेळी रोझमेरी तेल किंवा एरंडेल तेल वापरावे. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







