लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

इंडोनेशियातील हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी बुधवारी इंडोनेशियातील योग्याकार्ता येथे असलेल्या जगप्रसिद्ध प्रम्बानन मंदिर परिसराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचा संयुक्तपणे शुभारंभ केला. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले हे मंदिर परिसर इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. भगवान शिवाला समर्पित असलेले हे 10व्या शतकातील ऐतिहासिक वारसा स्थळ भारत-इंडोनेशियाच्या सामायिक सांस्कृतिक संबंधांचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानले जाते. या प्रकल्पाच्या …

Read More »

आणखी एक आमदार फुटला

15 दिवसांपृर्वी शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर, शिवसेना (ठाकरे)ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर विधानपरिषद उपसभापतीपदाच्या मोबदल्यात शिंदेसेनेत सहभागी झाले आहेत. अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानतंर, त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सचिन अहिर हे ठाकरेंचे अत्यंत …

Read More »

कर्जमाफीवरून आ. बच्चू कडूंचा घरचा आहेर

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधान परिषद सभागृहात दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्यात हा वाद झाला. कर्जमाफीच्या मुद्यावर मंत्री बोलत असताना आ. कडू यांनी त्यांना प्रश्न केला. त्यावरून आ. दरेकर यांनी आक्षेप घेत आ. कडू यांना चागलेच सुनावले. त्यावर आ. कडू यांनी कर्जमाफीतील प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याचे सांगून घरचा …

Read More »

शिवसेनेत तिसरी फूट

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात षडयंत्र पूर्णत्वास नेण्यात आले, त्याला आठवडाही होत नाही, तोच महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‌‘ऑपरेशन टायगर‌’ अखेर यशस्वी करण्यात आले. पॅटर्न तोच होता. आधी पक्षातून फुटायचे, मग बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी करायची आणि लोकसभा …

Read More »

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. राज्यात आमदार फुटल्यानंतर आता टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी केली. या बंडखोर खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणाही केली आहे, ज्यामुळे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर हा …

Read More »

देशाची राजधानी दिल्लीत आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात हौज रानी भागात आज बुधवारी सकाळी एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे 21 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 37 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये बहुसंख्य परदेशी नागरिक आहेत. या आगीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. आग एवढी भयानक होती की, काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. …

Read More »

‌‘एसआयआर‌’ घटनाबाह्य नाही ः सर्वोच्च न्यायालय

बिहार, पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष तपासणीवरून सुरू असलेल्या मोठ्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी आपला अंतिम आणि ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, एसआयआर प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नव्हती. त्यामुळे त्याला घटनाबाह्य घोषित करता येणार नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले की, केवळ ही प्रक्रिया मतदार यादी सुधारण्याच्या सामान्य प्रक्रियेपेक्षा थोडी …

Read More »

नीट पेपरफुटी प्रकरणाचे विदर्भात पडसाद

देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता विदर्भातही वेगाने पोहोचला असून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील तपासाची व्याप्ती वाढविली आहे. नांदेड, लातूर, नाशिक आणि पुणे येथील कारवाईनंतर आता नागपूर आणि चंद्रपूर येथे छापे टाकण्यात आल्याने अमरावतीतही खळबळ उडाली आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशी समर्थक असलेले आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा कट पुण्यातील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी …

Read More »

मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांच्या ताफ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्याचा आकार मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन …

Read More »

पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित

पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्य विधानसभा विसर्जित केली आहे. या निर्णयामुळे नवीन सरकार स्थापन करण्याचा घटनात्मक मार्ग मोकळा झाला आहे. 7 मे 2026 पासून प्रभावी असलेल्या या आदेशामुळे 17 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला असून 18 व्या विधानसभेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीतील पराभवानंतरही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं घटनात्मक पेच निर्माण झाला. अखेर या पेच …

Read More »