केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांची आणि पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचीदेखील घोषणा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचादेखील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी …
Read More »बॅक स्टोरी
भारताकडे येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
इराण आणि अमेरिकेतील युद्ध भडकलेले असतानाच, बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थायलंडच्या एका मालवाहू जहाजासह तीन जहाजांवर पुन्हा हल्ले झाले. या हल्ल्यामुळे एका जहाजाला भीषण आग लागली असून, जहाजावरील खलाशांना वाचवण्यासाठी तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली आहे, असे वृत्त ‘एएफपी’ने दिले. या व्यापारी जहाजावरील दोन भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक भारतीय बेपत्ता आहे. हा हल्ला इराणने केला असल्याचे मानले …
Read More »भारताच्या सीमेजवळ अमेरिकेचा हल्ला!
भारताच्या सागरी सीमेजवळ आणि हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी सकाळी एका इराणी युद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान 87 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 101 कर्मचारी बेपत्ता आहेत. या संदर्भात श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली. त्यानंतर, अमेरिकेनेच हा हल्ला करून युद्धनौका बुडवली असल्याचे …
Read More »राहुल गांधींचे मोदींना थेट आव्हान
गेल्या मंगळवारी, काँग्रेसने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या निषेधार्थ किसान महाचौपाल आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्ो राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हटले, ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर भारत-अमेरिका करार रद्द करा’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ‘मोदींनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले …
Read More »चिनी रोबोडॉग वादामुळे भारताची नाचक्की
दिल्लीत केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ‘एआय इम्पॅक्ट समिट 2026’ आयोजित करण्यात आली. या समिटमध्ये आधी भारतीय उद्योजकाच्या गॅझेट्सची चोरी आणि दुसऱ्या दिवशी चिनी कंपनीने तयार केलेला रोबोटिक डॉग स्वत: विकसित केल्याचा दावा एका भारतीय विद्यापीठाने केल्याने भारताची जगभरात नाचक्की झाली आहे. चीनने या ग्रेटर नोएडातील गलगोटिया विद्यापीठाच्या तंत्रज्ञान चोरीवर बातम्या जगभरात पोहोचवल्या आहेत. मोठा गाजावाजा करीत केंद्र सरकारच्या …
Read More »अविश्वास प्रस्तावानंतर विशेषाधिकार भंगाचा खेळ
पक्षपातीपणाचा आरोप करीत ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची सूचना सादर केली आहे. विरोधकांनी मंगळवारी सभापतींविरुद्ध ही सूचना सादर केली. त्यानंतरही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची पोलखोल करीत राहिले. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी खा. राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान झालेल्या ट्रेड डीलवर मोठा …
Read More »संसदेत महिला खासदारांचा रुद्रावतार
संसदेत महिला खासदार असण्याकडे दुर्लक्ष करून भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर संतापजनक व घाणेरडी वक्तव्ये केली. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता बोलणार होते. मात्र, विरोधी पक्षाच्या महिला खासदार पंतप्रधान मोदी यांच्या आसनाजवळ पोहोचल्या. या प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले आणि यावेळी पंतप्रधानांचे संबोधन टळले. …
Read More »अजित पवार यांना अखेरचा निरोप
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात गुरुवारी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह …
Read More »दावोसमध्ये 14.50 लाख कोटींचे करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी तब्बल 14 लाख 50 हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. …
Read More »अमरावतीत त्रिशंकु, नागपूर, अकोल्यात भाजप
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 87 जागांच्या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. निकालानुसार भाजपने सर्वाधिक 25 जागा जिंकत पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 11 जागांवर यश मिळवले आहे. अकोल्यात भाजप तर चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र