महाष्ट्राचे राज्यपाल सी. पी राधाकृष्ण यांची देशाच्या नव्या उपराष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली आहे. संसदेतील निवडणूक प्रक्रियेत त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांना ४५२ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. राधाकृष्णन यांनी त्यांचा १५२ मतांनी पराभव केला. त्यानंतर, त्यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एनडीएचे उमेदवार …
Read More »बॅक स्टोरी
मराठ्यांना आरक्षण, ओबीसींना उपसमिती
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. यानंतर बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही एका उपसमितीची स्थापना करण्यात आली. या उपसमितीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या उपसमितीमध्ये सहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून ही समिती ओबीसी समाजच्या प्रश्नांसंदर्भात उपाययोजना सुचवण्याचे काम करणार आहे. महसूलमंत्री …
Read More »लाडया बाप्पांचे आगमन
राज्यात बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाचा पहिला दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला असून ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात लाडया बाप्पांचे आगमन ठिकठिकाणी झाले. त्यानिमित्ताने घराघरांत तसेच विविध गणेश मंडळांत उत्साह ओसंडून वाहतो आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, असा गजर करीत मानाच्या गणपतींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. वाजत-गाजत गणरायांच्या आगमनाने भाविक भक्तिभावात न्हाऊन निघाले आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमधील संती गणपतीची सकाळी …
Read More »विरोधकांनी विधेयक फाडले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत संविधान १३०वी दुरुस्ती विधेयक- २०२५, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक-२०२५ तसेच जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, २०२५ सादर केले. या विधेयकांवर लोकसभेत जोरदार गोंधळ झाला. सरकारने गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक किंवा कोठडीत असलेल्या व्यक्तींना पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, किंवा केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री/मंत्री पदावरून हटवण्याची तरतूद या विधेयकांद्वारे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या विधेयकाची प्रत …
Read More »राज्यात १५ हजार पोलीस भरती
महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार कर्मचारी भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाने मांडलेल्या १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील हजारो तरुण या पोलीस भरतीची प्रतीक्षा करत होते. या निर्णयाद्वारे त्यांची एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार निर्णय घेण्यात आले …
Read More »दिवाळीनंतर पालिका निवडणुकीचा बार
राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅड मशीन वापरले जाणार नाहीत, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. ओबीसी आरक्षण लॉटरी पद्धतीने काढले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित होतील, या चर्चेने जोर धरला होता. परंतु मनुष्य बळाच्या अभावी निवडणुका एकत्रित निवडणूक घेणे शय नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. …
Read More »अमेरिकेचा भारतावर ‘टॅरिफ बाँब’
अमेरिका १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाक्तया उत्पादनांवर अतिरिक्त २५ टक्के कर लादेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. बुधवारी त्यांनी ‘ट्रुथ’ या सोशल प्लॅटफफॉर्मवर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, …
Read More »मुंबई बॉम्बस्फोट निकालाला आव्हान
२००६ मध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर ११ मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २०९ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणात १९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी ऐतिहासिक निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यातील १२ आरोपींपैकी एकाचा आधीच मृत्यू झालेला …
Read More »अंतराळवीर शुभांशू शुला पृथ्वीवर परतले
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुला आपल्या ऐतिहासिक अंतराळ यात्रेनंतर मंगळवारी दुपारी पृथ्वीवर परतले आहेत. देशाच्या या यशस्वी सुपुत्राचे स्वागत करण्यासाठी १४० कोटी भारतीय डोळे लावून बसले होते. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनार्यावर उतरले आहे. शुभांशू हे सुमारे १८ दिवस अवकाशात होते, या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले. शुभांशू शुला हे २५ जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन ९ …
Read More »अर्बन नक्षलवर प्रहार
काही सुधारणांसह महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले. शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे विधेयक मांडले. १२ हजार ५०० सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून सुधारित स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे सरकारला कडव्या विचारसरणीच्या संघटनांवर कठोर कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र