लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

विमान कोसळून २६१ जण ठार

गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी १.३८ वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवासी आणि तीन बी. जे. मेडिकल कॉलेजचे २० डॉटर व स्थानिक नागरिक असे २६१ जण ठार झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने रमेश विश्वकुमार नावाचा केवळ एक प्रवासी विमानातून …

Read More »

चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू

१८ वर्षांत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आयपीएलचे विजेतेपद जिंकले. मात्र हा विजय मृत्यूचे तांडव घेऊन आला. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल २०२५ च्या विजयाच्या जल्लोषादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी सायंकाळी चेंगराचेंगरी झाली. त्यात किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ हून अधिक लोक जखमी झाले. अनेकजण गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शयता व्यक्त करण्यात आली होती. या दुर्दैवी …

Read More »

राज्यात अतिवृष्टीने २१ जणांचा मृत्यू

मुंबईत सोमवारला दिवसभर पडलेला मुसळधार पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे दाणादाण उडाली असताना या वाईट हवामानाचा फटका मुंबई-अमरावती फ्लाईटला बसला. त्याच वेळी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने केवळ पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये पाण्यात बुडून, वीज कोसळून, भिंत पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय सुमारे २२ प्राण्यांचाही पावसामुळे मृत्यू झाला आहे. पावसाने निर्माण झालेल्या …

Read More »

छत्तीसगडमध्ये २७ नक्षली ठार

छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात ही चकमक झाली. अबूझमाड परिसरातील या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यात सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस नंबला केशव राव, ज्यांना बसवराजू म्हणून ओळखले जाते, ते २६ इतर नक्षलवाद्यांसह ठार झाले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. …

Read More »

अमरावतीच्या सुपुत्राने घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे मंगळवार १३ मे रोजी निवृत्त झाले. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. न्या. गवई यांना सरन्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी …

Read More »

भारताने घेतला पहलगामचा बदला

पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, २६/११ मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलिस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यामध्ये …

Read More »

देशात जातीनिहाय जनगणना होणार

केंद्र सरकार देशात जातीनिहाय जनगणना करणार आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज, बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केले. पण याचवेळी त्यांनी केंद्र सरकारकडे आणखी एक मोठी आणि महत्त्वाची मागणी केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 …

Read More »

दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना कळताच मोठी खळबळ उडाली. तेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. या हल्ल्यात 28 लोकांचा जीव गेला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन काश्मिरी मुस्लिमांचाही समावेश आहे. सर्व जखमींना त्यांच्या गावांना हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली. जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदू व मुसलमानांनी पाकिस्तानच्या निषेधार्थ कडकडीत …

Read More »

अमरावती विमानतळ उद्घाटनाचा पंतप्रधानांना आनंद

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती विमानसेवेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विमानाचे बुकिंग हाऊसफूल होते. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. व्यापार आणि संपर्क वाढवण्याबद्दल मोदी बोलले. तर …

Read More »

40 हजारांसाठी मृतदेह 6 तास अडवला

पुण्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही रुग्णासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह 40 हजार रुपयांच्या बिलासाठी रोखून ठेवल्याचा प्रकार मलकापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये बुधवारी घडला. शिवसेना (उबाठा) पदाधिकार्‍यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय 68) या 5 एप्रिल रोजी घरात पाय घसरून …

Read More »