बॉलीवूड अभिनेता आर. माधवन याला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संवेदनशील नागरिक आणि कुटुंबवत्सल पिता अशा अनेक भूमिका आर. माधवनने यशस्वीपणे पार पाडल्या. अभिनयातील सहजता, भूमिकांमधील वैविध्य, दर्जेदार चित्रपटांची निवड आणि प्रसिद्धीपेक्षा कामाला दिलेले महत्त्व यांमुळे त्याने समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि निर्मितीतही त्याने …
Read More »सिने समिक्षण
स्टारडमचे बदलते गणित
एकेकाळी एखाद्या चित्रपटाच्या यशाचे पहिले संकेत तिकीट खिडकीबाहेर लागलेल्या रांगांमधून मिळत असत. चित्रपटगृहांबाहेरील गर्दी, शहरभर लागलेले पोस्टर्स, चित्रपट मासिकांच्या मुखपृष्ठांवरील छायाचित्रे आणि दूरचित्रवाणीवरील मुलाखती यांमधून एखाद्या अभिनेत्याची लोकप्रियता मोजली जात असे. मात्र डिजिटल युगाने या सगळ्या समीकरणांना पूर्णपणे बदलून टाकले आहे. आज कोणत्याही चित्रपटाच्या यशाची पहिली चाहूल बॉक्स ऑफिसवर नव्हे, तर इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्टस् आणि एक्सवरील ट्रेंडिंग हॅशटॅगमधून लागते. …
Read More »बालपट हरवले कोठे?
आजकाल शाळकरी मुले मैदानावर खेळण्यापेक्षा किंवा पालकांसमवेत फिरायला जाण्यापेक्षा घरातच मोबाईलवर खेळणे पसंत करतात. अर्थात काही मुले अपवाद असू शकतात, मात्र बऱ्याच ठिकाणी असेच चित्र पाहवयास मिळते. पूर्वी उन्हाळी सुटी आली की लहान मुलांना जादुचे प्रयोग, लहान मुलांसाठीचे चित्रपट, भटकंती यासारखे उपक्रम दिसायचे. आता जादूच्या प्रयोगाला मुलांपेक्षा पालकांचीच गर्दी अधिक दिसते. दुसरीकडे लहान मुलांचे चित्रपट टॉकीजवर लागतातच असे नाही आणि …
Read More »मोहिनी व्यवस्थेशी लढणाऱ्या नायकाची
हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला तर काही कथा अशा आहेत की त्या काळ बदलला, समाज बदलला, प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलल्या तरी पुन्हा पुन्हा नव्या रूपात समोर येत राहिल्या. त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकून राहिलेली कथा म्हणजे ‘एक माणूस विरुद्ध व्यवस्था’ ही. ही चित्रपटातील संघर्षाची चौकट सामान्य माणसाच्या मनातील असंतोष, अपेक्षा, न्यायाची आस आणि बदलाची आकांक्षा यांचे कलात्मक प्रतिबिंब आहे. म्हणूनच प्रत्येक …
Read More »गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र रहस्य, थरार आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम हा त्यांचा स्थायीभाव राहिला. देव आनंद यांच्या शैलीदार गुप्तहेरापासून ते आधुनिक काळातील जागतिक मोहिमा पार पाडणाऱ्या उच्च-तंत्रसज्ज नायकांपर्यंतचा हा प्रवास भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतला. रहस्याचा धूसर पडदा, शत्रूच्या छावणीतून येणारे गुप्त संदेश, प्रत्येक क्षणी बिंग फुटण्याचा धोका आणि …
Read More »पुनर्निमितीला उधाण
बॉलीवूडमध्ये जुन्या चित्रपटांची पुनर्निर्मिती, रीमेक, रिक्रिएशन किंवा पुनर्कल्पना ही आता अपवादात्मक गोष्ट राहिलेली नाही. गेल्या दोन दशकांत अनेक लोकप्रिय चित्रपट नव्या कलाकारांसह, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि बदललेल्या प्रेक्षकवर्गाला लक्षात घेऊन पुन्हा साकारले गेले. काहींनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले, तर काहींना प्रेक्षकांनी सपशेल नाकारले. प्रत्येक पिढीची स्वतःची अभिरुची, सामाजिक वास्तव आणि मनोरंजनाची भाषा असते. त्यामुळे जुन्या कथा नव्या काळाच्या संदर्भात …
Read More »यशापयाची भरती-ओहोटी
हिंदी चित्रपटसृष्टीत स्टारडम ही कधीच कायमस्वरूपी गोष्ट नव्हती. येथे प्रत्येक शुक्रवार एखाद्या अभिनेत्याचे नशीब बदलते आणि प्रत्येक सोमवार एखादा सुपरस्टार अचानक मागे पडलेला दिसतो. एक काळ असा होता की सलग काही यशस्वी चित्रपट एखाद्या अभिनेत्याला दशकभर उद्योगाच्या सर्वोच्च स्थानी ठेवत असत; मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज एका मोठ्या यशाने अभिनेता आकाशात पोहोचतो, तर दोन अपयशी चित्रपट त्याला पुन्हा …
Read More »‘स्टार पॉवर’चे वलय आणि चित्रपट
हिंदी चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शक असे झाले, ज्यांनी केवळ चित्रपट बनवले नाहीत तर त्यांनी काळाची अभिरुची घडवली. सुभाष घई हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव. ‘ताल’, ‘परदेस’, ‘हीरो’, ‘राम लखन’ किंवा ‘खलनायक’ यांसारखे चित्रपट पाहताना केवळ मोठे कलाकार दिसत नाहीत, तर त्यामागे उभा असलेला एक ठाम दिग्दर्शकीय दृष्टिकोन जाणवतो. म्हणूनच सुभाष घई यांनी अलीकडे केलेले विधान महत्त्वाचे ठरते. फक्त स्टार पॉवरवर चित्रपट …
Read More »सिनेमा ते राजकारण
दक्षिण भारताच्या राजकारणात सिनेमा आणि सत्तेचे नाते अनेक वर्षांपासून आहे. लोकप्रियतेपलीकडे जात ते सामाजिक भावनांशी, प्रादेशिक अस्मितेशी आणि जनमानसाच्या मानसिकतेशी घट्ट जोडलेले राहिले आहे. पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा नायक, गरीबांचा तारणहार किंवा जनतेसाठी जीव धोक्यात घालणारा नेता ही प्रतिमा दक्षिणेतील प्रेक्षकांनी कमालीची उचलून धरताना अनेकदा त्या प्रतिमेलाच त्यांनी वास्तवातील नेतृत्व मानले. त्यामुळेच दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीतून थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचणाऱ्या नेत्यांची परंपरा …
Read More »‘प्रौढपटांचे’ सुवर्णयुग
भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात काही काळापूर्वीपर्यंत ’ए’ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी असलेले प्रमाणपत्र लाभलेला चित्रपट म्हणजे एक संकुचित, वादग्रस्त आणि मुख्य प्रवाहापासून तुटलेला विषय मानला जायचा. अशा चित्रपटांच्या नावाभोवती अलीलता किंवा टोकाच्या हिंसेचे वलय असायचे, ज्यामुळे सामान्य प्रेक्षक चित्रपटगृहात जाण्यास कचरत असे. कुटुंबासोबत बसून असे चित्रपट पाहणे तर दूरची गोष्ट, पण अशा चित्रपटांचे नाव काढणेही टाळले जाई. मात्र, काळाच्या ओघात समाजमनाची संवेदनशीलता …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र